Serious car accident near Kala Ganapati Temple in CIDCO area Chhatrapati Sambhajinagar News
छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगरमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. सिडको परिसरामध्ये हा भीषण अपघात झाला असून यामध्ये वाहन चालक फरार झाला आहे. सिडको परिसरामध्ये असणाऱ्या काळा गणपती परिसरामध्ये हा अपघात झाला आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर या चालकाने गाडी घातली. यामध्ये चार ते पाच भाविक गंभीररित्या जखमी झाले आहेत.
काळा गणपती मंदिराच्या परिसरामध्ये भीषण अपघात झाला आहे. यामध्ये चालकाने भाविकांना चिरडल्याचा प्रकार घडला आहे. अपघातानंतर चालक हा तिथून फरार झाला. यामध्ये भाविक गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र अपघातावेळी गाडीचे वेग जास्त असल्यामुळे जखमी भाविकांची प्रकृती गंभीर जखमी झाले आहेत. तसेच या घटनेमध्ये मृत्यू झाल्याची देखील शक्यता आहे. जखमींवर सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या अपघातावेळी भरधाव गाडी असल्यामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. भाविक काळा गणपती मंदिरामध्ये जात होते. मंदिराच्या पायऱ्या चढत असताना भाविकांचा हा अपघात झाला आहे. भरधाव गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले यामुळे गाडी पायऱ्यांवर चढली. यामध्ये भाविक चिरडले गेले. मीडिया रिपोर्टनुसार, काळा गणपती मंदिरांमधील या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या भीषण अपघाताच्या घटनेनंतर कारचालक फयार झाला. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, पोलीस फरार कारचालकाचा शोध घेत आहेत. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
काकाच्या प्रेमात आकंठ बुडाली पुतणी
बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली. जिथे नवविवाहित पत्नीने तिच्या प्रियकर काकाच्या मदतीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. औरंगाबादचे पोलीस अधीक्षक अम्ब्रीश राहुल यांनी संपूर्ण प्रकरण उघड केले. २४ जून रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील नबीनगर ब्लॉकमधील लेंबोखाप गावातील रहिवासी प्रियांशू कुमार सिंग यांची दोन अज्ञात गोळीबार करणाऱ्यांनी हत्या केली. त्यानंतर पोलीस प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. हे संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेत औरंगाबाद पोलिसांनी एसआयटी टीम तयार करून तपास सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी मृत प्रियांशूशी संबंधित लोकांची चौकशी सुरू केली. पोलिसांनी मृताचे कॉल डिटेल्स काढले आणि सीसीटीव्ही फुटेज काढले. ज्यामध्ये प्रियांशूची पत्नी गुंजा देवी हिच्या संभाषणावर पोलिसांना संशय आला.