Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण; CM Relief Fund मधून मिळाला ‘आर्थिक आधार’

मागील अनेक दिवसांपासून त्यांची मुलगी देवांशी पोटदुखी, ताप, मळमळ होणे आदींमुळे सतत आजारी पडत होती. पालकांनी सुरूवातीला मंगरूळपीर आणि अकोला येथे तिच्यावर उपचार केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 17, 2025 | 09:40 PM
आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण; CM Relief Fund मधून मिळाला ‘आर्थिक आधार’

आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण; CM Relief Fund मधून मिळाला ‘आर्थिक आधार’

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: सात वर्षांची देवांशी गेल्या अनेक महिन्यांपासून यकृताच्या गंभीर आजाराशी झुंज देत होती. डॉक्टरांनी अखेर ‘यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया’ हा एकमेव पर्याय असल्याचे सांगितले. तसेच उपचारासाठी 20 लाख रूपये खर्च येणार असल्याचे सांगितले. मात्र, भाजीपाला विक्रीचा छोटा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबापुढे या उपचाराचा खर्च परवडणारा नव्हता. या कठीण काळात ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष’चा कुटूंबीयांना आर्थिक आधार मिळाला. तसेच देवांशीच्या आईने तिला यकृत दिल्यानंतर तिच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले.

वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील वरूड (बु) येथे राहणारे रवींद्र गावंडे हे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मागील अनेक दिवसांपासून त्यांची मुलगी देवांशी पोटदुखी, ताप, मळमळ होणे आदींमुळे सतत आजारी पडत होती. पालकांनी सुरूवातीला मंगरूळपीर आणि अकोला येथे तिच्यावर उपचार केले. परंतु तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने अखेर तिला नागपूर येथे हलविण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर, तज्ज्ञ डॉक्टरांनी तिचे यकृत गंभीर स्वरूपात बाधित झाल्याचे निदान केले. तसेच यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया’ गरजेचे असल्याचे सांगितले. शस्त्रक्रियेसाठी 20 लाख रुपये खर्चाचा अंदाज त्यांनी वर्तविला होता.

CM Relief Fund: रुग्णांसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ ठरतोय आधार; 3,542 रुग्णांना 32 कोटींची मदत

दरम्यान, देवांशीच्या वडिलांना मित्रांकडून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीबाबत माहिती मिळाली. त्यांनी कक्षाकडे धाव घेतली. त्यासोबतच समाज माध्यमावर मदतीकरिता आवाहन केले. कक्षाच्या पुढाकाराने देवांशीवर पुढील उपचार मुंबईतील वाडिया हॉस्पिटलमध्ये सुरू झाले. या उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष, टाटा ट्रस्टच्या माध्यमातून उपचाराची मोठी रक्कम उभी राहिली. उर्वरित रक्कम इतर काही सामाजिक संस्था आणि गावकऱ्यांच्या वर्गणीतून गोळा करण्यात आली. देवांशीची आई मीनाक्षी गावंडे यांनी यकृत दिले. तिच्यावर 7 जुलै 2025 रोजी यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.

देवांशीची प्रकृती आता स्थिर असून तिच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. आता तिला डिस्चार्ज मिळाला आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष आणि टाटा ट्रस्टच्या मदतीमुळेच आमच्या मुलीचे प्राण वाचले, असे देवांशीचे वडील रवींद्र गावंडे यांनी सांगितले.

CM Relief Fund: ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ रुग्णांसाठी ठरतोय वरदान; १,५८२ रुग्णांना ‘इतक्या’ कोटींचं मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार प्रत्येक गरजू, गरीब रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी कक्षाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत. देवांशी त्याचे एक उदाहरण आहे.  आम्ही वेळेवर मदत करू शकलो याचा आम्हाला आनंद आणि समाधान आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

Web Title: Seven year old girl underwent liver transplant surgery help of the cm relief fund devendra fadnavis marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 09:39 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Health News
  • Liver

संबंधित बातम्या

“मालवणी परिसरातील झोपडपट्ट्यांचा…”; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश
1

“मालवणी परिसरातील झोपडपट्ट्यांचा…”; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश

“… असं सरकारला वाटत नाही?” लहान मुलांच्या बेपत्ता प्रकरणावर राज ठाकरे संतापले ; CM फडणवीसांना लिहिले पत्र 
2

“… असं सरकारला वाटत नाही?” लहान मुलांच्या बेपत्ता प्रकरणावर राज ठाकरे संतापले ; CM फडणवीसांना लिहिले पत्र 

“MMRDA अन्  ब्रुकफिल्ड च्या नेतृत्वात आशियातील सर्वात मोठे…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे भाष्य
3

“MMRDA अन् ब्रुकफिल्ड च्या नेतृत्वात आशियातील सर्वात मोठे…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे भाष्य

Maharashtra Politics: CM फडणवीस तातडीने मुंबईत दाखल; ‘या’ कंपनीसोबत करार, तब्बल १५ लाख…
4

Maharashtra Politics: CM फडणवीस तातडीने मुंबईत दाखल; ‘या’ कंपनीसोबत करार, तब्बल १५ लाख…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.