Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

E-governance reforms winner : ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात कोण ठरले नंबर वन? CM फडणवीसांनी केली यादी जाहीर

ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात 150 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये गतिमान आणि नागरिकाभिमुख कार्य करणे अपेक्षित होते. 150 दिवसांच्या या प्रयत्नानंतर यामध्ये कोणी बाजी मारली हे आता समोर आले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 26, 2026 | 01:02 PM
CM Devendra Fadnavis announced the winners of the E-governance reform program on Republic Day 2026

CM Devendra Fadnavis announced the winners of the E-governance reform program on Republic Day 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम विजेता यादी जाहीर
  • CM देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केले विजेते
  • शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन
E-governance reforms winner : मुंबई : प्रशासकीय कामकाज सुधारण्यासाठी आणि अधिक पारदर्शी होण्यासाठी ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम राबवण्यात आला. या 150 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये गतिमान आणि नागरिकाभिमुख कार्य करणे अपेक्षित होते. 150 दिवसांच्या या प्रयत्नानंतर यामध्ये कोणी बाजी मारली हे आता समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन कोणता विभाग आपले कार्य करण्यात सर्वात यशस्वी ठरला आहे हे सांगितले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने (Republic Day 2026) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज त्यांचा निकाल हाती आला आहे.

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’ वर पोस्ट माहिती दिली आहे. राज्यातील नागरिकांना त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्याशुभेच्छा दिल्या असून, ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातील विजेत्या कार्यालयांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे करण्यात आले. कार्यालयाची वेबसाईट, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफीस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सऍप चॅटबॉट, AI व Blockchain चा शासकीय कामकाजात वापर आणि GIS चा कामात वापर अशा 7 सर्वंकष मुद्यांवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची निवड आज प्रजासत्ताक दिनी जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे, अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर निकाल जाहीर केला आहे.

हे देखील वाचा : महाराष्ट्र हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा…! CM फडणवीसांनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

काय आहे निकाल?

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्वोत्कृष्ट कार्यालये: –

  • जिल्हाधिकारी कार्यालय – जळगाव –
  • पोलिस अधीक्षक कार्यालय – ठाणे ग्रामीण –
  • महानगरपालिका – पनवेल –
  • पोलिस आयुक्त कार्यालय – नाशिक –
  • विभागीय आयुक्त कार्यालय – नागपूर –
  • पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक कार्यालय – नांदेड –
  • राज्यस्तरीय आयुक्तालय/संचालनालय – संचालक, तंत्र शिक्षण –
  • राज्यस्तरीय मंडळे, महामंडळे, प्राधिकरण – महाराष्ट्र सागरी मंडळ –
  • मंत्रालयीन विभाग – सार्वजनिक बांधकाम विभाग
हे देखील वाचा : पद्म पुरस्कारांतून भाजपची ‘केरळ’निवडणूक रणनीती; टीकाकारांच्या सन्मानातून भाजप नेमकं काय साधू पाहतयं?

पुढे देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले आहे की, उपरोक्त विविध संवर्गातील राज्यातील उत्कृष्ट कार्यालयांची नावे सोबत जोडली आहेत. (उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांची नावे दि. 8 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येतील.) 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या या सर्व कार्यालयांचे प्रमुख आणि त्यांच्या चमूचे हार्दिक अभिनंदन! सर्व विजेत्यांचा लवकरच राज्य शासनातर्फे गौरव करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे करण्यात आले. कार्यालयाची वेबसाईट, आपले सरकार… pic.twitter.com/lNajc9FRnC — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 26, 2026

Web Title: Cm devendra fadnavis announced the winners of the e governance reform program on republic day 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 01:02 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Republic Day 2026

संबंधित बातम्या

Girish Mahajan: “मुद्दामून नाव डावलण्याचा….”; डॉ. आंबेडकरांच्या नाव न घेतलेल्या गोंधळावर गिरीश महाजनांचे स्पष्टीकरण, म्हणाले..
1

Girish Mahajan: “मुद्दामून नाव डावलण्याचा….”; डॉ. आंबेडकरांच्या नाव न घेतलेल्या गोंधळावर गिरीश महाजनांचे स्पष्टीकरण, म्हणाले..

झेंडावंदनावेळी हृदयविकाराने पीएसआय मोहन जाधव यांचे निधन, उमरगा येथे उत्पादन शुल्क विभागातील घटना
2

झेंडावंदनावेळी हृदयविकाराने पीएसआय मोहन जाधव यांचे निधन, उमरगा येथे उत्पादन शुल्क विभागातील घटना

“बाबासाहेबांचं नाव भाषणात का नाही घेतलं?” सरकारी कर्मचारी गिरीश महाजनांवर संतापली, म्हणाली “सस्पेंड केलं तरी चालेल, पण…”
3

“बाबासाहेबांचं नाव भाषणात का नाही घेतलं?” सरकारी कर्मचारी गिरीश महाजनांवर संतापली, म्हणाली “सस्पेंड केलं तरी चालेल, पण…”

मालेगावमध्ये ध्वजारोहण कार्यक्रमाला गालबोट; परेड ग्राऊंडजवळ झाला भीषण स्फोट, 5 जण जखमी
4

मालेगावमध्ये ध्वजारोहण कार्यक्रमाला गालबोट; परेड ग्राऊंडजवळ झाला भीषण स्फोट, 5 जण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.