Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health News: जसलोक हॉस्पिटलमध्ये अति-लठ्ठ महिलेवर यशस्वी सर्जरी; पहिल्यांदाच एंडोस्कोपिक स्पाइन…

मूळची भारतीय असलेली आणि सध्या जर्मनीमध्ये राहणारी एक ४५ वर्षीय महिला वार्षिक सुट्टीसाठी मायदेशी परतली होती. पण, भारतात आल्यानंतर तिला अचानक पाठदुखीचा तीव्र त्रास होऊ लागला.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 23, 2026 | 09:20 PM
Health News: जसलोक हॉस्पिटलमध्ये अति-लठ्ठ महिलेवर यशस्वी सर्जरी; पहिल्यांदाच एंडोस्कोपिक स्पाइन…
Follow Us
Close
Follow Us:

भारतात पहिल्यांदाच एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीच्‍या माध्‍यमातून शस्त्रक्रिया
जसलोक हॉस्पिटलमध्ये अति-लठ्ठ महिला रुग्णावर सुरक्षित उपचार
४५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार

मुंबई: जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने ४५ वर्षीय महिलेवर यशस्‍वीपणे अत्यंत महत्त्वपूर्ण मोनोपोर्टल एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी केली आहे. या महिलेला पाठदुखीचा तीव्र त्रास होत होता, तसेच हालचाल देखील करता येत नव्‍हती, ज्यामुळे तिला हॉस्पिटलमध्‍ये दाखल करण्यात आले होते. ही महिला रुग्ण अति-लठ्ठ होती. तिचे वजन १२० किलो आणि बीएमआय ५२ होता, ज्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करणे अत्यंत जोखमीचे होते. उच्‍च बीएमआय असलेल्या रुग्णावर (Health News) सुरक्षितपणे शस्त्रक्रिया करण्याची भारतातील ही पहिली केस ठरली आहे, जेथे ही इंटरलॅमिनर एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया सुरक्षितपणे करण्‍यात आली.

मूळची भारतीय असलेली आणि सध्या जर्मनीमध्ये राहणारी एक ४५ वर्षीय महिला वार्षिक सुट्टीसाठी मायदेशी परतली होती. पण, भारतात आल्यानंतर तिला अचानक पाठदुखीचा तीव्र त्रास होऊ लागला. ही वेदना इतकी वाढली की तिला साधे उभे राहणे किंवा चालणे देखील कठीण झाले. प्राथमिक तपासणीत एल४-एल५ डिस्क हर्निएशनचे निदान झाले, ज्‍यामुळे नसांवर प्रचंड दाब येत असल्‍याचे निदर्शनास आले. सामान्यतः अशा केसमध्‍ये शस्त्रक्रिया केली जाते, पण तिच्या अति वजनामुळे शस्त्रक्रियेचा पर्याय नाकारला जात होता. परिणामी, ती जवळपास दोन महिने अंथरुणाला खिळून होती आणि प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. दीर्घकाळ हालचाल न करण्‍यासोबत जर्मनीला परतणे शक्य नसल्यामुळे तिची नोकरी जाण्याची भीती निर्माण झाली होती.

महाराष्ट्र सरकारच्या महालॅब्स कार्यक्रमातून ७.६ कोटींहून अधिक रुग्णांना लाभ, मोफत केले जाणार वेगवेगळ्या चाचण्यांचे निदान

त्यानंतर तिने जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याचे ठरवले, जेथे एंडोस्कोपिक स्पाइन टीमने तिच्या केसची सविस्‍तरपणे तपासणी केली. सर्जन्‍सनी स्‍पष्‍टपणे सांगितले की, मोनोपोर्टल एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीसाठी १ सेंटीमीटरपेक्षाही कमी आकाराचा छेद करावा लागतो. ही पद्धत शरीराची गुंतागुंतीची रचना असलेल्या रुग्णांसाठी देखील सुरक्षित आणि व्यवहार्य आहे, त्यामुळे ती अति-लठ्ठ असताना देखील उपचारामध्‍ये कोणताच अडथळा आला नाही. मेडिकल लिटरेचरचा अभ्यास केल्यावर निदर्शनास आले की, ती भारतातील सर्वाधिक बीएमआय असलेली पहिली रूग्‍ण आहे, जिच्‍यावर ही एंडोस्‍कोपिक शस्त्रक्रिया यशस्‍वीपणे करण्‍यात आली. या केसमधून किमान इन्‍वेसिव्‍ह स्‍पाइन केअरमध्‍ये जसलोक हॉस्पिटल नेतृत्‍व दिसून येते.

डॉ. मनिष कोठारी यांनी यशस्वीरित्या ही शस्त्रक्रिया केली आणि शस्त्रक्रियेसाठी भूल देण्याची जबाबदारी अॅनेस्थेसिया विभागाच्या अतिरिक्‍त संचालक डॉ. राजश्री देवपुजारी आणि अॅनेस्‍थेसियोलॉजीचे कन्‍सल्‍टण्‍ट डॉ. अनुराज जैन यांनी सांभाळली. शस्त्रक्रियेनंतर वेदनेपासून मोठा दिलासा मिळाल्याने महिला रुग्णाला दुसऱ्याच दिवशी डिस्चार्ज देण्यात आला. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तिने वजन कमी करण्‍यासाठी संतुलित आहाराचे सेवन व व्‍यायाम सुरू केला, ज्‍यामुळे पुढील दोन महिन्‍यांमध्‍ये तिचे वजन जवळपास २० किलो कमी झाले. आता ती जर्मनीला परतली असून पुन्‍हा कामावर जात आहे आणि आरोग्‍य उत्तम राखण्‍याची काळजी घेत आहे.

एंडोस्‍कोपिक स्‍पाइन सर्जरीचे कन्‍सल्‍टण्‍ट डॉ. मनिष कोठारी म्‍हणाले, ”अशा उच्‍च बीएमआय असलेल्‍या रूग्‍णावर शस्त्रक्रिया करताना शरीररचनेतील सूक्ष्म बदलांकडे सतत लक्ष देणे आणि वैद्यकीय उपकरणांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक होते. मोनोपोर्टल एंडोस्कोपिक पद्धतीमुळे आम्हाला प्रत्येक टप्प्यावर अचूकता आणि स्थिरता राखण्‍यास मदत झाली, ज्यामुळे नसांवरील दाब सुरक्षितपणे कमी करता आला आणि शरीरावर जखमेची खूण देखील अत्यंत कमी राहिली. महिला रूग्‍ण यशस्‍वी शस्त्रक्रियेनंतर लवकर चालू व हालचाल करू लागली, ज्‍यामधून सिद्ध होते की प्रगत तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे कौशल्य एकत्र आल्यास आव्‍हानात्‍मक केसेसमध्‍ये देखील यशस्‍वीरित्‍या उपचार करता येऊ शकतो.”

आता मसालेदार खाणे आरोग्यसाठी फायद्याचे! फक्त कोणते आहेत ते मसाले? जाणून घ्या

चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. मिलिंद खडके म्‍हणाले, ”या महिला रुग्णाचे वजन जास्त असल्यामुळे तिच्‍यावर शस्त्रक्रिया करणे अत्यंत जोखमीचे होते. असे असताना देखील जसलोक हॉस्पिटलमध्ये आम्ही सुरक्षितपणे व यशस्‍वीपणे किमान इन्‍वेसिव्‍ह उपचार करू शकलो. यासारख्‍या केसेसमधून गुंतागुंतीच्‍या स्‍पाइन केअरमध्‍ये आमचे कौशल्‍य व आत्‍मविश्वासासह करणाऱ्या उपचाराचा दर्जा दिसून येतो. या महिला रूग्‍णाला पुन्‍हा लवकर हालचाल करताना पाहिल्यानंतर आमचा विश्वास अधिक दृढ झाला आहे की, प्रगत एंडोस्‍कोपिक तंत्र शस्त्रक्रिया होऊ न शकणाऱ्या रूग्‍णांसाठी नवीन आशेचा किरण देऊ शकते.”

या यशामधून उच्‍च जोखीम असलेल्‍या रूग्‍णांमधील गुंतागुंतीच्‍या स्‍पाइन केसेसवर उपचार करण्‍यामध्‍ये जसलोक हॉस्पिटलचे कौशल्‍य दिसून येते. तसेच या केसमधून निदर्शनास येते की, प्रगत एंडोस्‍कोपिक तंत्र उपचार होऊ न शकणाऱ्या रूग्‍णांसाठी देखील उपयुक्‍त ठरू शकते.

Web Title: Endoscopic spine surgery was successfully on a morbidly obese woman at jaslok hospital mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 09:20 PM

Topics:  

  • Health News
  • Hospital News

संबंधित बातम्या

Nanded मध्ये ‘हिंद-दी-चादर’ शताब्दी कार्यक्रम; आरोग्य यंत्रणा सज्ज, १० लाखांहून अधिक भाविकांसाठी…
1

Nanded मध्ये ‘हिंद-दी-चादर’ शताब्दी कार्यक्रम; आरोग्य यंत्रणा सज्ज, १० लाखांहून अधिक भाविकांसाठी…

Global Health: कोरोनाव्हायरस नंतर ‘या’ भयानक व्हायरसने काढले डोके वर; 68 कोटी लोकांना संसर्ग, 2 लाख मृत्यू अन् जागतिक भीषण वास्तव
2

Global Health: कोरोनाव्हायरस नंतर ‘या’ भयानक व्हायरसने काढले डोके वर; 68 कोटी लोकांना संसर्ग, 2 लाख मृत्यू अन् जागतिक भीषण वास्तव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.