Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Health News: तळीये गावात गॅस्ट्रोची भीषण साथ! ५०० रुग्णांवर उपचार सुरू; ग्रामपंचायतीच्या कारभारावर संताप

Satara Health News : राजू काका भोसले हे सकाळपासूनच तळीये गावात प्रत्यक्ष फिरून परिस्थितीची पाहणी करत आहेत. रुग्ण व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत असून, साथीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधत आवश्यक उपाययोजना करण्यासाठी ते कसोशीने प्रयत्न करत आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 26, 2026 | 04:06 PM
Taliye Village, Gastro Outbreak, Satara Health News,

Taliye Village, Gastro Outbreak, Satara Health News,

Follow Us
Follow Us:
  • तळीये गावात गॅस्ट्रोची साथ पसरल्याने गावातील सुमारे ४०० ते ५०० रुग्णांवर विविध प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालयांत उपचार सुरू
  • परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राजू काका भोसले यांनी स्वखर्चाने बाटलीबंद पाणी व अन्नधान्य/बिस्किटांचे वाटप सुरू
  • ऐन साथीच्या काळात ग्रामपंचायत आणि स्थानिक आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारावर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त
Satara Health News:तळीये गावात गॅस्ट्रोची मोठी साथ पसरल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील सुमारे ४०० ते ५०० रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाठार स्टेशन प्राथमिक आरोग्य केंद्र, पळशी प्राथमिक आरोग्य केंद्र, पिंपोडे बुद्रुक ग्रामीण आरोग्य केंद्र तसेच किन्हई प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व युवा उद्योजक राजू काका भोसले यांनी तातडीने मदतीचा हात पुढे केला आहे. राजू काका भोसले यांच्या पुढाकारातून आणि स्वतःच्या खर्चातून तळीये गावात बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचे वाटप सुरू करण्यात आले असून, रुग्ण व ग्रामस्थांसाठी मोठ्या प्रमाणात बिस्किटांचेही वाटप करण्यात येत आहे.

‘श्रीमंतां’चा थाटच न्यारा! ढोल-ताशांचा गजर, ‘मोरया’चा जयघोष अन्…; ‘दगडूशेठ’ बाप्पांची वैभवशाली सांगता

विशेष म्हणजे, राजू काका भोसले हे सकाळपासूनच तळीये गावात प्रत्यक्ष फिरून परिस्थितीची पाहणी करत आहेत. रुग्ण व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत असून, साथीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधत आवश्यक उपाययोजना करण्यासाठी ते कसोशीने प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, राजू काका भोसले यांच्या सुविद्य पत्नी तथा जिल्हा परिषद सदस्य जयश्री काकी भोसले यांच्या माध्यमातूनही परिसरातील नागरिकांशी संपर्क आणि परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.

पीएम श्री शाळा भरते भाड्याच्या घरात; विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर

गावात मोठ्या संख्येने नागरिक आजारी पडल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असून, साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य तपासणी तसेच साथीचे नेमके कारण शोधून त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. दरम्यान, तळीये गावातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून पुढील काळात कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

 

 

Web Title: Severe gastro outbreak in taliye village over 400 patients under treatment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 04:06 PM

Topics:  

  • Health News
  • maharashtra news
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara DJ Dolby Crackdown: डॉल्बी जप्तीवरून खासदार विरुद्ध पालकमंत्री! साताऱ्यात डीजेच्या आवाजावरून राजकीय जुगलबंदी
1

Satara DJ Dolby Crackdown: डॉल्बी जप्तीवरून खासदार विरुद्ध पालकमंत्री! साताऱ्यात डीजेच्या आवाजावरून राजकीय जुगलबंदी

उत्पादनच्या धाडीनंतर बीट अंमलदारांवर कारवाई होणार का? विलासबाबा जवळ यांची मागणी
2

उत्पादनच्या धाडीनंतर बीट अंमलदारांवर कारवाई होणार का? विलासबाबा जवळ यांची मागणी

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
3

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

Health: ‘औषधांच्या गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची…’; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांनी दिले ‘हे’ स्पष्ट निर्देश
4

Health: ‘औषधांच्या गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची…’; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांनी दिले ‘हे’ स्पष्ट निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.