Shani Shingnapur administration bans devotees from going to Chauthara on Shani Amavasya
Shani Shingnapur News : अहिल्यानगर : शनिशिंगणापूर देवस्थानाचे दर्शन घेण्यासाठी फक्त महाराष्ट्रातून नाही संपूर्ण देशभरातून लोक येत असतात. शनि अमावस्येला भाविकांची अलोट गर्दी दर्शनसाठी येत असते. याच पार्श्वभूमीवर शनिशिंगणापूर प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शनी शीळेचे दर्शन घेत तेलाभिषेक करण्याची प्रत्येक भाविकाची इच्छा असते. मात्र एकाच दिवशी लाखो भाविक येत असल्यामुळे प्रशासनावर ताण येत असतो. यामुळे शनिअमावस्येच्या दिवशी चौथऱ्यावर चढण्यास भाविकांना बंदी घालण्यात आली आहे.
शनि अमावस्येला भाविकांची मोठी गर्दी होत असते. यंदा नेहमीपेक्षा जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शनिशिंगणापूर देवस्थानाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यावर्षी शनिशिंगणापूर मंदिरातील शिळेचे प्रत्येक भाविकाला चौथऱ्यावर चढून भाविकांना दर्शन घेता येणार नाही. शनिअमावास्येच्या दिवशी शनिचौथऱ्यावर भाविकांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. यामुळे काही भाविकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
येत्या शनिवारी शनिअमावास्या आहे. या निमित्ताने शनिशिंगणापूर येथील चौथऱ्यावर चढून भाविकांना दर्शन घेता येणार नाही. तसेच शिळेवर तेल वाहता येणार नाही. भाविकांच्या सुरक्षेसह गर्दीच्या पार्श्वभूमीवर शनिचौथऱ्यावर भाविकांना प्रवेश बंदी असणार आहे. शनिअमावास्येनिमित्त देश विदेशातून लाखो शनीभक्त शनिशिंगणापुरात दर्शनासाठी दाखल होतात. यावेळी शनिचौथऱ्यावर जाऊन भाविक स्वतः शनिमूर्तीला तेलाभिषेक करतात. मात्र यंदा प्रचंड गर्दी अपेक्षित असल्याने भाविकांचे दर्शन सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी २२ ऑगस्टच्या मध्यरात्री महाआरतीपासून ते 23 ऑगस्टपर्यंत शनिचौथ्यावर दर्शन आणि तेलाभिषेक बंद ठेवण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मावळमध्ये नदीकाठी महिला अडकली
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुफान पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर धरणे देखील भरली असून नदी नाल्यांना अक्षरशः पूर आला आहे. दरम्यान, मावळमध्ये देखील जोरदार पाऊस कोसळत आहे. यामध्ये एक महिला नदीकाठी अडकली होती. अथक प्रयत्नानंतर तिला वाचवण्यात यश आले आहे. मावळ तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत १९ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास गोंडुब्रे गावाजवळील नदीकाठी एक महिला अडकून पडली होती. तिच्या जीवघेण्या अवस्थेत दिलेल्या मदतीच्या आर्त हाकेला तळेगाव दाभाडे पोलीस व वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्या कार्यतत्परतेमुळे प्रतिसाद मिळाला. अखेर त्या महिलेचा जीव वाचवण्यात यश आले आहे.