Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shanishingnapur : शनि जयंतीला पोलीस प्रशासनाचे कौतुकास्पद नियोजन; शनिभक्तांकडून कौतुकाचा वर्षाव

Shanishingnapur : शनि जयंतीच्या औचित्याने देशभरातून आलेल्या लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि दर्शनासाठी पोलीस प्रशासनाने यंदा अत्यंत कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 17, 2026 | 12:54 PM
shani shingnapur news

shani shingnapur news

Follow Us
Follow Us:
  • शनि जयंतीला पोलीस प्रशासनाचे कौतुकास्पद नियोजन;
  • शनिभक्तांकडून कौतुकाचा वर्षाव
 

शनिशिंगणापूर/पोपट पिटेकर : शनि जयंतीच्या औचित्याने देशभरातून आलेल्या लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि दर्शनासाठी पोलीस प्रशासनाने यंदा अत्यंत कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. नेहमीप्रमाणे केवळ आदेश न सोडता, स्वतः पोलीस अधीक्षक मुक्कम सुदर्शन यांनी मैदानात उतरून सर्व व्यवस्था हाताळल्याने भाविकांना अत्यंत शिस्तबद्ध आणि सुलभ पद्धतीने दर्शन घेता आले. त्यांच्या या तत्परतेचे आणि संवेदनशीलतेचे शनिभक्तांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जात आहे.

स्वतः मैदानात उतरून सांभाळली धुरा

शनि जयंतीनिमित्त मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गर्दीचा ताण वाढू लागताच पोलीस अधीक्षक मुक्कम सुदर्शन यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेतली. व्हीआयपी संस्कृती बाजूला ठेवून ते थेट सामान्य भाविकांच्या रांगेत आणि गर्दीच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी स्वतः माईक हातात घेऊन नागरिकांना शांतता राखण्याचे आणि शिस्त पाळण्याचे आवाहन केले, ज्यामुळे गोंधळाची परिस्थिती क्षणात नियंत्रणात आली.

Bhimashankar Temple : मंदिर बंदीचा व्यावसायिकांना फटका; साडेतीन महिन्यांपासून अर्थचक्र ठप्प

तेल आणि पूजेच्या साहित्याचे केले सुयोग्य नियोजन

अशा मोठ्या उत्सवांमध्ये तेल वाहणे, हार-फुले अर्पण करणे यावरून बऱ्याचदा गर्दी खोळंबते आणि चेंगराचेंगरीची भीती निर्माण होते. हीच बाब ओळखून पोलीस अधीक्षकांनी विशेष लक्ष दिले. तेल आणि हार-फुले वाहण्याची प्रक्रिया सुरळीत केली, जेणेकरून कुठेही गर्दी रेंगाळणार नाही, रांगेतील अडथळे दूर करून प्रवाहितता राखली. वृद्ध, महिला आणि लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचे निर्देश कर्मचाऱ्यांना दिले.

भाविकांमधून उमटल्या सकारात्मक प्रतिक्रिया

पोलीस प्रशासनाच्या या ‘ॲक्शन मोड’मुळे लाखो भाविकांना कोणत्याही त्रासाशिवाय आणि मानाने दर्शन घेता आले. “पोलीस खात्याचे सर्वोच्च अधिकारी जेव्हा स्वतः उन्हातानात उभे राहून गर्दी नियंत्रित करतात, तेव्हा पोलिसांबद्दलचा आदर अधिक वाढतो,” अशा भावना अनेक भाविकांनी व्यक्त केल्या.शनि जयंती अत्यंत शांततेत आणि उत्साहात पार पाडल्याबद्दल पोलीस अधीक्षक मुक्कम सुदर्शन आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

बारामती तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; ‘या’ परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर

Web Title: Shanishingnapur police administrations commendable planning for shani jayanti shower of appreciation from shani devotees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 12:54 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Shani Shingnapur
  • Shani Shingnapur Temple

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: भीमा नदीला महापूर; श्रीगोंद्यातील आर्वी बेटाचा संपर्क तुटला, 200 ग्रामस्थ अडकले
1

Ahilyanagar News: भीमा नदीला महापूर; श्रीगोंद्यातील आर्वी बेटाचा संपर्क तुटला, 200 ग्रामस्थ अडकले

Ahilyanagar News : विजेच्या खांबाला हात लागल्याने साडेतीन वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू!
2

Ahilyanagar News : विजेच्या खांबाला हात लागल्याने साडेतीन वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू!

Shevgaon News : शेवगावातील गुटखा कारवाईवर संशय; ५६ हजारांचा मुद्देमाल दाखवून लाखोंचा साठा लपवल्याची चर्चा
3

Shevgaon News : शेवगावातील गुटखा कारवाईवर संशय; ५६ हजारांचा मुद्देमाल दाखवून लाखोंचा साठा लपवल्याची चर्चा

Ahilyanagar Crime: आलिशान कार, पांढरी पोती अन् 28 लाखांचा गुटखा; नगरमध्ये पोलिसांची धडाकेबाज कारवाई
4

Ahilyanagar Crime: आलिशान कार, पांढरी पोती अन् 28 लाखांचा गुटखा; नगरमध्ये पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.