Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Drought 2026: दुष्काळाचा हाहाकार! पाच दुष्काळ पाहिलेल्या ९५ वर्षीय वृद्धाची हृदयद्रावक हाक; ‘अशी परिस्थिती कधी…’

Maharashtra Drought 2026: अहिल्यानगरमध्ये भीषण दुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे नागरिकांसह जनावरांचे हाल होत आहेत. आयुष्यात पाच दुष्काळ अनुभवलेल्या ९५ वर्षीय वृद्धाने सध्याच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करत मदतीची आर्त हाक दिली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 17, 2026 | 03:49 PM
दुष्काळाचा हाहाकार! पाच दुष्काळ पाहिलेल्या ९५ वर्षीय वृद्धाची हृदयद्रावक हाक; 'अशी परिस्थिती कधीच पाहिली नाही'

दुष्काळाचा हाहाकार! पाच दुष्काळ पाहिलेल्या ९५ वर्षीय वृद्धाची हृदयद्रावक हाक; 'अशी परिस्थिती कधीच पाहिली नाही'

Follow Us
Follow Us:
  • अहिल्यानगरमध्ये दुष्काळाचा भीषण उद्रेक!
  • ५ दुष्काळ अनुभवलेल्या ९५ वर्षीय वृद्धाची हृदयद्रावक हाक
  • असा दुष्काळ कधीच पाहिला नाही, जनावरांसह माणसंही मरून जातील!
पोपट पिटेकर, अहिल्यानगर : एकीकडे सरकारी बैठकांचे सत्र, घोषणांचा सुकाळ आणि पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकींचे कागदी घोडे नाचवले जात असताना, दुसरीकडे शेतीच्या बांधावर मात्र भयाण वास्तव आ वासून उभे आहे. माझं वय ९५ वर्षे आहे, मी आतापर्यंत पाच दुष्काळ पाहिले. पण पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा असा भीषण दुष्काळ आयुष्यात कधीच पाहिला नाही! सरकारने वेळेवर पाणी आणि मदत दिली नाही, तर माणसं आणि गुरं-ढोरं मरून जातील, अशी उद्विग्न आणि आक्रमक हाक अहिल्यानगर जिल्ह्यातील 95 वर्षीय वृद्ध शेतकरी सुधाकर शिंदे यांनी दिली आहे. प्रशासनाच्या कागदी दाव्यांची पोलखोल करणाऱ्या या वास्तवदर्शी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील दुष्काळाची भीषणता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. (Maharashtra Drought 2026)

Nagpur News : करदात्यांना धाक नाही, विश्वासाचे बळ! जीएसटीचा पाया विस्तारण्यासाठी नवी मोहीम

जुन्या आणि आजच्या दुष्काळात मोठा फरक- आपल्या आयुष्यात तब्बल पाच मोठे दुष्काळ अनुभवणाऱ्या सुधाकर शिंदे यांनी जुन्या काळातील आणि आजच्या दुष्काळातील विदारक तफावत मांडताना काळजाला हात घातला. पूर्वी जेव्हा दुष्काळ पडायचा, तेव्हा कुठे ना कुठे पिण्याच्या पाण्याची सोय तरी असायची. पण आज परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, माणसांना प्यायला पाणी नाही आणि जनावरांना खायला चारा व प्यायला पाणी काहीच उरलेले नाही, अशा शब्दांत त्यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला.

अधिकारी बांधावर येतच नाहीत, मोबाईल ॲपचे काय करायचे?

सरकारकडून सध्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी आणि पंचनाम्याचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्ष शेतावर परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. सरकारी अधिकारी पिकांची नोंद घ्यायला बांधावर येतात का? यावर उत्तर देताना शिंदे म्हणाले कागदी घोडे अन् मोबाईलचा खेळ सरकारी अधिकारी गावात येतात पण शेतात येत नाहीत. ते म्हणतात ॲपने मोबाईलवर नोंद करा. आता माझ्यासारख्या 95 वर्षांच्या वृद्धाला मोबाईल चालवता येतो का? अधिकाऱ्यांनी स्वतः रानात येऊन पिकांची पाहणी व नोंद करायला हवी.

केवळ कागदावर पाहणी

जनावरांच्या गणतीबाबत सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, काल एक व्यक्ती आला होता. माझ्याकडे १० गुरं आहेत, त्यांनी नोंद केली आणि सांगितले की ‘मी आजच आलोय, उद्या येणार नाही’. अशा प्रकारे त्रोटक कामे करून अधिकारी निघून जातात; प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी बांधावर कोणीही थांबत नाही.

पिके पूर्णपणे उद्ध्वस्त

हरभऱ्याला भुसाही मिळेना- पावसाच्या अभावामुळे शेतातील पिके पूर्णपणे खलास झाली आहेत. शिंदे यांनी सांगितले की, शेतातून काढलेल्या हरभऱ्याच्या पिकातून एक-दोन पोती धान्य तर दूरच, पण जनावरांसाठी भुसासुद्धा निघत नाहीये. पिके वाळून गेल्याने शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे.

पालकमंत्र्यांच्या बैठका आणि वास्तवाची दरी- एकीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री आढावा बैठका घेऊन परिस्थिती सुरळीत असल्याचे भासवत आहेत, तर दुसरीकडे प्रत्यक्ष ग्रामीण भागात पाण्याचा थेंबही उपलब्ध नाही. सरकारी आकडेवारी आणि प्रत्यक्ष बांधावरील वास्तव यामध्ये प्रचंड दरी निर्माण झाली आहे.

…तर माणसं आणि गुरं मरून जातील!-सध्याची परिस्थिती अशीच राहिली आणि सरकारने तातडीने पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि आर्थिक मदत पोहोचवली नाही, तर येत्या काळात पाणी व चाऱ्याअभावी जनावरांसह माणसांचाही जीव जाईल, असा गंभीर इशारा या 95 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने दिला आहे. या हृदयद्रावक हाकेनंतर तरी शासन आणि प्रशासन जागे होऊन तातडीने मदत छावण्या व पाण्याचे टँकर सुरू करणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Car Fire Accident: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! तारळी नदी पुलाजवळ कारचा आगीचा भडका; पोलिसांच्या धाडसाने टळली मोठी दुर्घटना

Web Title: Ahilyanagar severe drought 95 year old farmer emotional appeal water scarcity maharashtra sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 03:49 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Maharashtra Drought 2026
  • Water Shortage

संबंधित बातम्या

Wardha News : दुष्काळ निवारणासाठी ‘जलतारा’ देणार बळ, प्रशासन सज्ज; साडे आठ लाख मनुष्यदिनची रोजगार निर्मिती
1

Wardha News : दुष्काळ निवारणासाठी ‘जलतारा’ देणार बळ, प्रशासन सज्ज; साडे आठ लाख मनुष्यदिनची रोजगार निर्मिती

Sambhajinagar News: ५ हजारांत दिवाळी कशी करायची? शेतकऱ्यांची चेष्टा थांबवून १ लाख द्या : रोहित पवारांची टिका
2

Sambhajinagar News: ५ हजारांत दिवाळी कशी करायची? शेतकऱ्यांची चेष्टा थांबवून १ लाख द्या : रोहित पवारांची टिका

Baramati: बारामतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; साठवण क्षमता वाढवण्यासाठी ॲड सुभाष ढोले नगरपरिषदेकडे मागणी
3

Baramati: बारामतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; साठवण क्षमता वाढवण्यासाठी ॲड सुभाष ढोले नगरपरिषदेकडे मागणी

Marathwada Drought Impact : गेवराईचे जिनिंग धोक्यात, दुष्काळामुळे कोट्यवधींच्या उलाढालीस ब्रेक
4

Marathwada Drought Impact : गेवराईचे जिनिंग धोक्यात, दुष्काळामुळे कोट्यवधींच्या उलाढालीस ब्रेक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.