• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Sharad Pawar Made A Statement About Who To Nominate From Indapur Nrdm

इंदापुरातून कोणाला उमेदवारी देणार? शरद पवारांनी केलं सूचक विधान

इंदापूरसह राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील उमेदवार ठरवताना इच्छुकांना विचारून नव्हे, तर कार्यकर्त्यांना विचारूनच उमेदवारीबाबतचा निर्णय घेतला जाईल, मात्र महाविकास आघाडीतील जागा वाटपाची प्रक्रिया संपल्यानंतर याबाबतचा योग्य निर्णय घेऊ, असे सूचक वक्तव्य पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गोविंद बाग या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी बोलताना केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 29, 2024 | 02:57 PM
इंदापुरातून कोणाला उमेदवारी देणार? शरद पवारांनी केलं सूचक विधान

सौजन्य - सोशल मिडीया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बारामती/अमोल तोरणे : राज्यात येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे. महाराष्ट्रातील जनतेचा विविध भागात आपणास मोठा प्रतिसाद मिळत आहे. इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. इंदापूरसह राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील उमेदवार ठरवताना इच्छुकांना विचारून नव्हे, तर कार्यकर्त्यांना विचारूनच उमेदवारीबाबतचा निर्णय घेतला जाईल, मात्र महाविकास आघाडीतील जागा वाटपाची प्रक्रिया संपल्यानंतर याबाबतचा योग्य निर्णय घेऊ, असे सूचक वक्तव्य पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गोविंद बाग या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी बोलताना केले. उमेदवारी देताना निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच उमेदवारी दिली जाईल, अशी पुष्टीही पवार यांनी यावेळी जोडली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असणारे आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने यांनी आपल्या समर्थकांसह शरद पवार यांची गोविंद बाग या निवासस्थानी भेट घेतली. इंदापूर तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते त्या ठिकाणी आले होते. यावेळी झालेल्या बैठकीत शरद पवार बोलत होते. आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने, दशरथ माने, अमोल भिसे, तेजसिंह पाटील, सागर मिसाळ, महारुद्र पाटील, अशोक घोगरे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी शरद पवार म्हणाले, होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात आशादायक चित्र आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने जागांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार संजय राऊत, नाना पटोले व जयंत पाटील यांना दिलेले आहेत, हे जागावाटप झाल्यानंतर आपल्या पक्षातील उमेदवारी बाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. पंतप्रधान लोकसभेला चारशे जागा येतील असे सांगत होते, मात्र त्यांना स्वबळावर सत्ता स्थापन करता आली नाही. आज महाराष्ट्रातील वातावरण बदलले आहे. यंदा आम्ही दहा जागा लोकसभेच्या लढविल्या, त्यातील आठ जागांवर विजय मिळाला, यंदा लोकांनीच बदल करायचा निर्णय घेतला होता. नेत्यांनी काही सांगितले तरी लोकांनी त्यांना जे योग्य वाटले तो निर्णय घेतला. बारामतीतही अनेक नेत्यांनी भाषणे केली, पण तुम्हीच ठरवलेले होते, दीड लाखांहून अधिक मताधिक्याने आपला उमेदवार विजयी झाला.

काही लोकांना आभाळाकडे बघून पाऊस पडेल की नाही ते समजते, आता अनेकांना वाटू लागले आहे की पाऊस पडेल त्यामुळे आपल्याकडील गर्दी वाढू लागली आहे. राज्यात कुठही गेलो तरी हजारोंच्या संख्येने लोक जमतात, लोकांनीच या निवडणूकीत जिंकायच ठरवले आहे, त्यामुळे यंदा चांगले निकाल लागतील यात शंका नाही.

महाविकास आघाडी तीन पक्षांची आहे, प्रत्येक तालुक्यात सर्वेक्षण होईल, इच्छुकांना नाही तर कार्यकर्त्यांना विचारुन मगच निर्णय घेतला जाईल, आगामी दहा दिवसात हे काम पूर्ण होईल. माझा अंदाज आहे की ६ ते १० ऑक्टोबर दरम्यान आयोग तारखा जाहीर करतील. १५ ते २० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल. या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसात आम्ही उमेदवार निश्चित करु. इंदापूरच्या बाबतीतही सर्वांशी विचारविनिमय करुन मगच निर्णय घेतला जाईल. यंदा इंदापूरमध्ये बदल घडेल अस वातावरण आहे, त्या मुळे निवडून येण्याची क्षमता विचारात घेत सर्वांना विश्वासात घेऊन अंतिम निर्णय घेऊ, अशी ग्वाही शरद पवार यांनी उपस्थितांना दिली.

आघाडी म्हणून लढणार असल्याने काही जागा मित्रपक्षांना द्याव्या लागणार आहेत, निवडणूकीत त्यांचेही काम करावे लागणार आहे. तुम्हाला तुमचे म्हणणे मांडायचा अधिकार आहे, पण इंदापूरचा पुढचा आमदार आपलाच असेल हे लक्षात घेत सर्वांनी कामाला लागा, असे आवाहन शरद पवार यांनी इंदापूरच्या कार्यकर्त्यांना केले.

दरम्यान यावेळी आप्पासाहेब जगदाळे, तेजसिंह पाटील, दशरथ माने, अशोक घोगरे यांनी आपल्या भाषणात इंदापूर मधील जनतेने शरद पवार यांनी आवाहन केल्यानंतर तोच आमदार निवडून दिला आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी ज्याने पक्षासाठी काम केले आहे, तोच उमेदवार इंदापूर मध्ये द्यावा, अशी मागणी यावेळी केली. आपण द्याल तो उमेदवार आम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून आणू, मात्र उमेदवार हा पक्षातीलच असावा, असा आग्रह यावेळी केला.

नको माजी, नको आजी, आम्हाला हवा नवीन बाजी…

इंदापूर तालुक्यातील शिष्टमंडळाने शरद पवार यांच्याकडे निष्ठावान कार्यकर्त्याला संधी देण्याची मागणी केली. नको माजी नको आजी आम्हाला हवा नवीन बाजी या शब्दात सोनाई उद्योगाचे प्रमुख दशरथ माने यांनी शरद पवार यांच्यापुढे आपल्या भावना मांडल्या. इंदापूर तालुक्यात आम्हाला दोन सासू असून लोकसभेच्या निवडणुकीत या दोन्ही सासवांनी आम्हाला मोठा त्रास दिला असून बूथ एजंट पळवण्याचे काम या दोन्ही सासवांनी केल्याची टीका माने यांनी हर्षवर्धन पाटील व दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता केली.

Web Title: Sharad pawar made a statement about who to nominate from indapur nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2024 | 02:57 PM

Topics:  

  • Harshvardhan Patil
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!
1

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Sanjay Raut News: प्रफुल पटेल म्हणजे शाहांचे ‘रिमोट कंट्रोल’!  संजय राऊतांचा गंभीर आरोप
2

Sanjay Raut News: प्रफुल पटेल म्हणजे शाहांचे ‘रिमोट कंट्रोल’! संजय राऊतांचा गंभीर आरोप

Third Mumbai Land Acquisition: तिसऱ्या मुंबईसाठीच्या भूसंपादन–भूवाटप धोरणास मान्यता, मुख्यमंत्र्‍यांचा महत्त्वाचा निर्णय
3

Third Mumbai Land Acquisition: तिसऱ्या मुंबईसाठीच्या भूसंपादन–भूवाटप धोरणास मान्यता, मुख्यमंत्र्‍यांचा महत्त्वाचा निर्णय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Chhattisgarh crime: ‘स्वतःला महादेवाला अर्पण करत आहोत’ म्हणत दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल; कारण काय?

Chhattisgarh crime: ‘स्वतःला महादेवाला अर्पण करत आहोत’ म्हणत दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल; कारण काय?

Feb 17, 2026 | 11:10 AM
अभ्यासासाठी पुस्तक उघडल्यानंतर लगेच झोप का येते? कारण वाचून तुम्हीसुद्धा व्हाल हैराण

अभ्यासासाठी पुस्तक उघडल्यानंतर लगेच झोप का येते? कारण वाचून तुम्हीसुद्धा व्हाल हैराण

Feb 17, 2026 | 10:59 AM
लवकराच बाजारात धुरळा उडवणार Brezza चे नवे मॉडेल, मिळू शकते अंडरबॉडी CNG Tank, अपडेट्स उडवतील झोप

लवकराच बाजारात धुरळा उडवणार Brezza चे नवे मॉडेल, मिळू शकते अंडरबॉडी CNG Tank, अपडेट्स उडवतील झोप

Feb 17, 2026 | 10:57 AM
संरक्षण ते तंत्रज्ञान! आज Modi-Macron भेटीत ‘या’ महत्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा; भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय

संरक्षण ते तंत्रज्ञान! आज Modi-Macron भेटीत ‘या’ महत्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा; भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय

Feb 17, 2026 | 10:46 AM
SL vs IRE : पथुम निस्सांकाच्या शतकाने चित्र पालटलं! ऑस्ट्रेलियाला दिला धक्का, श्रीलंकेने एकाच सामन्यात मोडले अनेक मोठे विक्रम

SL vs IRE : पथुम निस्सांकाच्या शतकाने चित्र पालटलं! ऑस्ट्रेलियाला दिला धक्का, श्रीलंकेने एकाच सामन्यात मोडले अनेक मोठे विक्रम

Feb 17, 2026 | 10:45 AM
Gold Price in India: रशियाच्या डॉलर भूमिकेमुळे सोन्याला धक्का; १ लाखांच्या खाली जाणार दर?

Gold Price in India: रशियाच्या डॉलर भूमिकेमुळे सोन्याला धक्का; १ लाखांच्या खाली जाणार दर?

Feb 17, 2026 | 10:45 AM
RTE News: सांगली शिक्षण विभागाची मोठी घोषणा; २०९७ जागांवर मिळणार मोफत प्रवेश, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

RTE News: सांगली शिक्षण विभागाची मोठी घोषणा; २०९७ जागांवर मिळणार मोफत प्रवेश, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

Feb 17, 2026 | 10:44 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.