डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांना पुढील दोन वर्षे आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचा सराव करण्यासाठी शरद पवारांची मदत केली (फोटो - टीम नवराष्ट्र)
Satara News : औंध : महाराष्ट्रात साखर कारखान्याचे मोठे जाळे आहे. कारखानदारांनी कारखाना कार्यक्षेत्रातील चांगले मल्ल दत्तक घेतले तर निश्चितच गुणवत्ता असलेले मल्ल आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी करतील असे मत त्यांनी व्यक्त केले. (Maharashtra News) डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांना पुढील दोन वर्षे आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचा सराव करणे आणि खुराकासाठी १२ लाख रुपयांचा धनादेश हर्षवर्धनचे प्रशिक्षक अर्जुनवीर काकासाहेब पवार यांचेकडे सुपूर्द केला यावेळी शासकीय कुस्ती प्रशिक्षक शिवाजी कोळी उद्योजक मोहसीन बागवान उपस्थित होते.
तुफानी ताकदीचा कुस्ती हा अत्यंत खर्चिक खेळ आहे. जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांना पैलवानांच्या अडीअडचणीची जाणीव आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे येणाऱ्या प्रतिभावंत होतकरू खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी केवळ कौशल्याची नव्हे, तर भक्कम आर्थिक पाठबळाचीही तितकीच गरज असते. आहार, परदेशी दर्जाचे प्रशिक्षण, सप्लिमेंट्स आणि वैद्यकीय सुविधा आदी सोईसुविधा उपलब्ध झाल्यास महाराष्ट्रातील मल्ल आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतील असा विश्वास खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.
हे देखील वाचा : अवकाळी पावसाचा पुणे जिल्ह्याला तडाखा; १२ तालुक्यांतील १०५ गावे बाधित, दोघांचा मृत्यू
पवार साहेबांनी शब्द खरा केला.
“राजकारणाच्या पलीकडे जाऊन खेळाडूंना आणि विशेषतः कुस्तीला राजाश्रय देण्याची खासदार शरद पवार यांची भूमिका संपूर्ण महाराष्ट्रासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिली आहे. आज त्यांनी दिलेला निधी केवळ पैशांच्या स्वरूपातील मदत नाही. चांगली कामगिरी करणाऱ्या होतकरू मल्लाच्या स्वप्नांना दिलेली मोठी ताकद आहे, असे मत अर्जूनवीर काकासाहेब पवार यांनी व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलासाठी 25 लाख
पुणे येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलामध्ये सराव करणाऱ्या मल्लांना अद्ययावत सोईसुविधा निर्माण व्हाव्यात.तालमीत मॅट्स आणि जिमच्या साहित्यात वाढ झाली पाहिजे.यामुळे भविष्यात आणखी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल घडतील ही दुरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून संकुलासाठी जाहीर केलेले २५ लाख रुपये देखील चेकच्या स्वरूपात अर्जूनवीर काकासाहेब पवार यांच्याकडे देण्यात आले आहेत.
हे देखील वाचा : खेडच्या पश्चिम पट्ट्यात अवकाळीचा हाहाकार, चिखलगाव परिसरात पिके जमीनदोस्त; शेतकऱ्यांकडून तातडीने पंचनाम्यांची मागणी
बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसची एन्ट्री
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशीकांत शिंदे म्हणाले की, “बारामती पोट निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार आहे. अजित पवारांच्या निधनानंतर आमच्या पक्षाने निर्णय घेतला की त्या ठिकाणी उमेदवार द्यायचा नाही. राहुरी आणि बारामती या दोन्ही ठिकाणी काँग्रेसने उमेदवार देणार असल्याचे समजते आहे. याबाबत काँग्रेस पक्षाच्या प्रांत अध्यक्ष यांच्याबरोबर चर्चा केली जाईल, कारण या दोन्ही जागा ह्या राष्ट्रवादीच्या आहेत त्यावर चर्चा करू आणि निर्णय घेऊ. राज्यसभेच्या वेळी देखील अनेक जण इच्छुक असतात मग आम्ही चर्चा करून त्यातून मार्ग काढतो यावेळी देखील चर्चा करून मार्ग काढू,” असं शशिकांत शिंदे यांनी सांगितलं आहे.






