Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोहित पवारांच्या मध्यरात्रीच्या नोटीसीवर शरद पवारांचं एकाच वाक्यात उत्तर, “म्हणाले सध्या देशात….”

एवढ्या रात्री नोटीस पाठवण्यामागे कोणता हेतू, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असताना, आता चक्क रोहित पवारांचे आजोबा व राष्ट्रवादीचे अध्यक्ष व नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Sep 29, 2023 | 11:22 AM
Offensive posts about NCP President Sharad Pawar and MLA Rohit Pawar; BJP office bearer arrested

Offensive posts about NCP President Sharad Pawar and MLA Rohit Pawar; BJP office bearer arrested

Follow Us
Close
Follow Us:

बारामती : देशात जेव्हापासून भाजपाचे सरकार आले आहे, तेव्हापासून केंद्रीय तपास यंत्रणा तसेच अन्य तपास यंत्रणा मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्या आहेत. दरम्यान, काल (गुरुवारी) बारामतीतून  (Baramati) एक मोठी व धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार व शरद पवारांचे नातू रोहित पवार यांना बारामती ॲग्रो (Baramati Agro) या प्लॅन्टवर रात्री दोन वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने (Maharashtra Pollution Department) नोटीस पाठवत कारवाई केली आहे. त्यामुळं आश्चर्य व्यक्त केले जात असून, एवढ्या रात्री नोटीस पाठवण्यामागे कोणता हेतू, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असताना, आता चक्क रोहित पवारांचे आजोबा व राष्ट्रवादीचे अध्यक्ष व नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. (sharad pawar one sentence reply to rohit pawar midnight notice said currently in the country)

मुंबई :  यांचे पुरोगामी विचार घेऊन महाराष्ट्रभर फिरणारे पक्षाचे युवा आमदार रोहित पवार यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न विद्यमान सरकारने केला आहे. कायद्याची पायमल्ली करून तसंच केंद्रीय यंत्रणेचा धाक दाखवून महाराष्ट्राच्या जनतेच्या मानगुटीवर बसलेल्या विद्यमान असंविधानिक सरकारचा जाहीर निषेध राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. महाराष्ट्रात आमदार रोहित पवारांची लोकप्रियता अनेक लोकांना बघवत नाही व त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेचा आड घेऊन राजकीय डाव साधण्यासाठी रोहित पवारांच्या कंपनीवर कारवाई मुख्यमंत्री शिंदे यांच्या सरकारने केल्याचा गंभीर आरोप तपासे यांनी केला आहे.

मी त्यावर काही बोलणार नाही…

आज बारामतीत शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यात त्यांना रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना शरद पवार यांनी अधिक भाष्य करणं टाळलं. बारामती अॅग्रो प्लांटवरील कारवाईवर सध्या बोलणार नाही, असं ते म्हणाले. त्यामुळं सर्वाच्या भुवया उंचावल्या आहेत. “मी कारवाईबाबत बोलणार नाही,” असं एका वाक्यात शरद पवार यांनी उत्तर दिले. तर दुसरीकडे राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता राज्य शासनाच्या एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

या सरकारचं विसर्जन होणार – महेश तपासे

महाराष्ट्र याला घाबरत नाही तुम्ही कितीही पुरोगामी विचारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी देखील आमचं मनोबल खच्चीकरण होत नाही आणि आता रोहित पवारांसोबत महाराष्ट्रातले लाखो तरुण या सरकारचं विसर्जन करण्यासाठी कामाला लागलेले आहेत. संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे व आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या सोबत जाण्याला विरोध दर्शवल्यामुळे सरकारमध्ये सामील झालेल्या अनेक आमदारांची गोची झाली आहे त्यांच्या मतदारसंघातील पक्षाचे कार्यकर्ते जैसे थे या परिस्थितीत आदरणीय पवार साहेबांसोबत राहिले. सरकारसोबत गेलेले अनेक आमदार पराभवाच्या छायेत असल्याचा दावाही महेश तपास यांनी केला.

72 तासांत प्लांट बंद करा…

दरम्यान, रोहित पवार (Rohit Pawar) यांना रात्री 2 वाजता नोटीस दिली असून 72 तासांत प्लांट बंद करण्याची सूचना नोटीसीच्या माध्यमातून दिली आहे. अशी माहिती रोहित पवार यांनी स्वतः ट्वीट करत दिली आहे. सध्या राज्यातील राजकारण पाहता, सूडाचे व कुरघोडीचे राजकारण सुरु आहे, त्याचाच एक भाग म्हणून ही कारवाई केली जात असल्याचं बोललं जात आहे.

सूडबुद्धीने कारवाई…

अजितदादा पवार शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर देखील राष्ट्रवादीचा जनाधार महाराष्ट्रात कमी झाला नाही, याचा दुःख भाजपला आहे. आणि म्हणूनच ही कारवाई केली असल्याचा आरोप तपासे यांनी केला. सूडबुद्धीने केलेल्या या कारवाईचे उत्तर बारामतीची जनता आणि महाराष्ट्रातले मतदार योग्य वेळी देणार अशी घोषणा महेश तपासे यांनी केली.

Web Title: Sharad pawar one sentence reply to rohit pawar midnight notice said currently in the country

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2023 | 11:22 AM

Topics:  

  • Mumbai
  • Navrashtra

संबंधित बातम्या

जोधपूरकडे निघालेलं एअर इंडियाचं विमानाच अचानक मुंबई विमानतळावर लॅडिंग; नेमकं काय घडलं?
1

जोधपूरकडे निघालेलं एअर इंडियाचं विमानाच अचानक मुंबई विमानतळावर लॅडिंग; नेमकं काय घडलं?

St Bus : गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांचा एसटीला उदंड प्रतिसाद; ५१०३ बस फुल्ल
2

St Bus : गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांचा एसटीला उदंड प्रतिसाद; ५१०३ बस फुल्ल

महाराष्ट्राची १.५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल,  MH 1st Conclave 2025 बनणार संवादाचे व्यासपीठ
3

महाराष्ट्राची १.५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल, MH 1st Conclave 2025 बनणार संवादाचे व्यासपीठ

Devendra Fadnavis : कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे, देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
4

Devendra Fadnavis : कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे, देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.