बारामती: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागावाटपाच्या हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप कधी पूर्ण होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यांदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. येत्या10दिवसांत महाविकास आघाडीचे जागावाटप पूर्ण होईल, असे शरद पवार यांनी म्हटलं आहे. यासोबत राष्ट्रवादीचा तिकीटवाटपाचा ‘फॉर्म्युला’ आणि महाविकास आघाडीच्या रणनीतीवरही त्यांनी भाष्य केलं आहे,
बारामतीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांचा चाचपणी सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्षातील इतर काही महत्त्वाचे नेते इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत. त्यानंतर कोणाला उमेदवारी द्यायची आणि कोणाला नाही याबाबत निर्णय घेतला जाईल.”
हेही वाचा:भगवान भालेराव यांची रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी; उल्हासनगर जिल्हा कार्यकारिणी
“महाविकासाघाडीतील तीन पक्ष एकत्र येऊन विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे कोणती जागा तीन पक्षांत कुणी लढवावी, यासंदर्भात विचारविनिमय सुरू आहे. जागावाटपाबद्दल निर्णय झाल्यानंतर कोणत्या जागेवर कोणाला उमेदवारी द्यायची, याचा निर्णय तो-तो पक्ष घेईल.येत्या 10 दिवसांत जागावाटपाचा निर्णय होईल. त्यानंतर आमचे सहकारी पक्ष आपली भूमिका मांडण्यास सुरूवात करतील, असेही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
“महाराष्ट्रात महाविकास आघाडीसाठी अनुकूल वातावरण आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा केवळ एक, राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले होते. पण, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 30 खासदार महाविकास आघाडीचे निवडून आले, म्हणजेच जनता परिवर्तन करण्यासाठी उत्सुक आहे. सरकार, भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी जनतेने आपली मानसिक तयारी सुरू केली आहे. असेही शरद पवार यांनी यावेळी नमुद केलं.
हेही वाचा:किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, पोटातील विषारी घाण होईल स्वच्छ