Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आज शरद पवारांच्या हस्ते मोदींना टिळक पुरस्कार देण्यात येणार; काँग्रेसची नाराजी तर संजय राऊतांचा पवारांना कोणता सल्ला? कसा असणार कार्यक्रम?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या पुणे दौऱ्यानिमित्त पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील सर्व प्रमुख रस्ते सकाळी 6 वाजल्यापासून बंद ठेवण्यात येणार आहेत. तर त्या विभागातील शाळा कॉलेज देखील बंद ठेवण्यात आलं आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्या  वेळी आंदोलनाचा इशारा दिल्याने पुणे पोलिसांकडून शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवार गटाच्या नेत्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 01, 2023 | 07:44 AM
आज शरद पवारांच्या हस्ते मोदींना टिळक पुरस्कार देण्यात येणार; काँग्रेसची नाराजी तर संजय राऊतांचा पवारांना कोणता सल्ला? कसा असणार कार्यक्रम?
Follow Us
Follow Us:

पुणे – आज देशाच्या राजकीय क्षेत्रात एक मोठी घडामोड घडत आहे. दोन विरोधक एका कार्यक्रमासाठी एकाच व्यासपीठावर येणार आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे पुणे (Pune) दौऱ्यावर आहेत. शरद पवारांच्या (sharad pawar) हस्ते मोदींना टिळक पुरस्कार देण्यात येणार आहे. (Pune Tilak Award) तसेच यावेळी पुणे मेट्रो आणि इतर विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या पुणे दौऱ्यानिमित्त पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील सर्व प्रमुख रस्ते सकाळी 6 वाजल्यापासून बंद ठेवण्यात येणार आहेत. तर त्या विभागातील शाळा कॉलेज देखील बंद ठेवण्यात आलं आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्या  वेळी आंदोलनाचा इशारा दिल्याने पुणे पोलिसांकडून शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवार गटाच्या नेत्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. (Sharad Pawar will give Tilak Award to Modi today; What is Sanjay Raut’s advice to Pawar if Congress is displeased? How will the program be)

बंडानंतर काका-पुतण्या पहिल्यांदाच एकत्र…

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. या कार्यक्रमाला अनेक आमदारांसह खासदार हजेरी लावणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असे दिग्गज नेते व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, अजित पवारांच्या बंडानंतर काका-पुतणे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येत आहेत.

विरोधकांमध्ये नाराजी…

पंतप्रधान मोदींच्या पुरस्कार सोहळ्यात शरद पवार हजर राहणार असल्याने विरोधी पक्षांमध्ये नाराजी आहे. तसेच या कार्यक्रमाला पवारांनी उपस्थिती लावू नये, असं काँग्रेसनं म्हटलं आहे. या देशाचं संविधान, लोकशाही आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांना धोका पोहोचला आहे. अशा व्यक्तीच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी उपस्थित न राहिलेलं बरं. ते उपस्थित राहिलेच तर त्यांनी पंतप्रधान मोदींची कानउघडणी करावी, असं देखील काँग्रेसनं म्हटलं आहे.

काय दिलाय राऊतांनी सल्ला

दरम्यान, पवारांच्या उपस्थितीवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. काँग्रेस व शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी या प्रकरणी पवारांना मोदींसोबत व्यासपीठ शेअर करण्यापूर्वी एकदा विचार करण्याचा सल्ला दिला आहे.

कसा असणार मोदींचा दौरा…

– सकाळी १० .१५ लोहगाव विमानतळावर आगमन
– सकाळी १०.४० कृषि महाविघालयाच्या मैदानवरील हेलिपॅडवर आगमन
– सकाळी १०.५५ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन
– सकाळी ११ ते ११. ३० वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात पुजा
– सकाळी ११ .४५ वाजता लोकमान्य टिळक पुरस्कारः स. प. महाविद्यालय (कार्यक्रम निमंत्रितांसाठी)
– दुपारी १२.४५ वाजता मेट्रोच्या दोन विस्तारित मार्गांचे लोकार्पण, पंतप्रधान आवास योजनेतील पुणे आणि पिंपरीतील चार हजार सदनिकांचे लोकार्पण, पीएमआरडीएच्या सहा हजार घरांचे भूमिपूजन (खुला कार्यक्रम)

Web Title: Sharad pawar will give tilak award to modi today what is sanjay raut advice to pawar if congress is displeased how will the program be

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2023 | 07:43 AM

Topics:  

  • maharashtra
  • MonsoonSession2023

संबंधित बातम्या

Mahape Jewellery Park: महाराष्ट्रात दागिने उद्योगाची मोठी झेप; २५ हजार कोटींची गुंतवणूक, १ लाख रोजगारांची अपेक्षा
1

Mahape Jewellery Park: महाराष्ट्रात दागिने उद्योगाची मोठी झेप; २५ हजार कोटींची गुंतवणूक, १ लाख रोजगारांची अपेक्षा

Ahilyanagar News: ‘सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे!’ भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरणी ठेवीदारांचा एल्गार
2

Ahilyanagar News: ‘सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे!’ भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरणी ठेवीदारांचा एल्गार

पुण्यातील समीर जैन यांची आर्थिक क्षेत्रात मोठी झेप! NJ Wealth सोबतच्या भागीदारीत २१५ कोटींचा AUM
3

पुण्यातील समीर जैन यांची आर्थिक क्षेत्रात मोठी झेप! NJ Wealth सोबतच्या भागीदारीत २१५ कोटींचा AUM

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे; मंत्री अतुल सावे यांचे आवाहन
4

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे; मंत्री अतुल सावे यांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.