sharad pawar press marathi news on alliance with uddhav Thackeray in bmc elections 2025
बारामती : बारामतीमध्ये जेष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या ऊसाच्या भावासह अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. शरद पवार यांनी बीडमधील कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होत असल्यावर देखील मत मांडले आहे. मात्र अशी परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रामध्ये नसल्याचे देखील ते म्हणाले आहेत. शरद पवार यांनी राज्यामध्ये सध्या सुरु असलेल्या मल्हार मटणाच्या वादावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. बीड हत्या प्रकरणावर आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर शरद पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, बीड जिल्ह्याला मी अनेक वर्ष ओळखतो. पण आज जी बीडची अवस्था आहे ती कधीही नव्हती. शांत, समन्वयाने सगळ्या रस्त्यांना घेऊन जाणारा असा बीड जिल्ह्याचा माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे. मी स्वत: जेव्हा त्या भागात लक्ष देत होतो, तेव्हा तिथे सहा-सहा सदस्य निवडून आले होते, तिथे एक प्रकारे सामंजस्याचं वातावरण होतं. दुर्दैवाने काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला गेले काही महिने बीडमध्ये दिसत आहेत, असा टोला शरद पवार यांनी नाव न घेता लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “माझं स्पष्ट मत आहे की राज्य सरकारने यात कोण आहे याचा विचार न करता जो कोणी कायदा हातात घेईल, वातावरण खराब करतो अशांच्या संबंधी अत्यंत सक्त धोरण आखण्याची गरज आहे. आणि बीडला पूर्वीचे वैबवाचे दिवस कसे येतील याची काळजी घ्यावी, हे सरसकट राज्यातील वातावरण असं आहे असं मान्य करणार नाही. पण काही ठिकाणी परिस्थिती काही बिघडली आहे. पण गैरफायदा घेणारे काही घटक आहे. अशांना सामोरे जाण्याचा निकाल राज्य सरकारने घ्यावा. सख्त कारवाई करावी, असा आक्रमक पवित्रा शरद पवार यांनी घेतला आहे.
खासदार शरद पवार यांना राज्यामध्ये सुरु असलेल्या मल्हार मटण सर्टिफिकेटबाबत देखील प्रश्न केला. भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी याबाबत कठोर भूमिका घेतली होती. हलाल मटण आणि मल्हार मटण असा वाद निर्माण झाला असून हिंदूंसाठी वेगळी मटणाची दुकानं असल्याची घोषणा त्यांनी केली. यामध्ये मल्हार सर्टिफिकेट देऊन फक्त हिंदू दुकांनामध्ये हिंदू लोकांना मटण दिले जाईल. याबाबत प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले की, सत्तेचा गैरवापर आणि लोकांमध्ये जात आणि धर्म यातील अंतर वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी. ‘राज्यासमोर दुसरे प्रश्न आहेत की नाही. हे काय राष्ट्रीय प्रश्न आहेत का? असे म्हणत शरद पवार यांनी मांडले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ऊसाच्या मुद्द्यावर देखील जेष्ठ नेते शरद पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, “उसाचं दर एकरी उत्पादन पाहता उसामध्ये साखर याचं प्रमाण वाढेल. उसाचा धंदा अधिक सोयीचा आणि परवडणारा होईल. हे चमत्कार होऊ शकतात. एआयमुळे होऊ शकतात. हे तंत्र आणण्याचा बऱ्याच दिवसापासून सुरू होता. मला आनंद आहे. दक्षिण महाराष्ट्रातील अनेक साखर कारखान्याने यात सहभागी होण्याची तयार दाखवली. त्यांच्या सूचनेनुसार आज बैठक होणार आहे. 300 प्रतिनिधी येतील. त्यांच्यासमोर हे तंत्र दाखवलं जाईल. हा क्रांतीकारक निर्णय महाराष्ट्रातून सुरू होईल,” असे स्पष्ट मत राज्यसभा खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.