Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shashikant Shinde : शशिकांत शिंदे शरद पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष, पक्षाच्या बैठकीत घोषणा

Shashikant Shinde NCP President : शरद पवारांनी भाकरी फिरवली असून शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जयंत पाटलांच्या राजीनाम्यानंतर आता पक्षाचा धुरा शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 15, 2025 | 04:50 PM
शशिकांत शिंदे शरद पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष, पक्षाच्या बैठकीत घोषणा (फोटो सौजन्य-X)

शशिकांत शिंदे शरद पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष, पक्षाच्या बैठकीत घोषणा (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Shashikant Shinde NCP President News in Marathi : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. जयंत पाटील यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवार यांनी आता शशिकांत शिंदे यांची पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.

शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. जयंत पाटलांच्या राजीनाम्यानंतर पक्षाची धुरा शशिकांत शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. शशिकांत शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. शशिकांत शिंदे हे शरद पवारांचे विश्वासू नेते मानले जातात. म्हणूनच त्यांना संधी मिळल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मंगळवारी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा करण्यात आली. मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर शशिकांत शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली.

गायमुख घाट रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नव्या उपाययोजना; महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शशिकांत शिंदे शरद पवारांसोबत आहेत. राष्ट्रवादी फुटीनंतरही त्यांनी शरद पवारांची साथ दिली. पक्ष संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांना मोठा अनुभव आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी ते एक आहेत.

शशिकांत शिंदे कोण आहेत?

शशिकांत शिंदे हे मूळचे जावळी तालुक्यातील हुमगाव येथील रहिवासी आहेत. ते वाणिज्य पदवीधर असून माथाडी कामगारांचे प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९६३ रोजी झाला असून त्यांचे वडील जयवंतराव शिंदे आणि आई कौशल्या शिंदे यांच्या सुसंस्कृत आणि प्रेमळ वातावरणात त्यांचे बालपण गेले.

ते लहान वयातच सामाजिक कार्य आणि राजकारणात सक्रिय झाले. १९९९ मध्ये शशिकांत शिंदे यांनी पहिल्यांदा जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि १२,००० मतांनी विजयी झाले. त्यांनी महाराष्ट्र राज्यातील कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचे जलसंपदा मंत्री म्हणून काम पाहिले आहे.

२००९ ते २०१४ पर्यंत त्यांनी कोरेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून काम केले. या निवडणुकीत त्यांनी शालिनीताई पाटील यांचा पराभव केला होता.

शशिकांत शिंदे हे दोन पंचवार्षिक जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले असून त्यानंतर ते दोन्ही पंचवार्षिक कालावधीसाठी कोरेगावचे आमदारही होते. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी पराभव केला होता.

शशिकांत शिंदे यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून भाजपचे महाआघाडीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढवली. मात्र त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर विधानसभा निवडणुकीत कोरेगाव मतदारसंघातून महेश शिंदेंविरोधात त्यांचा पराभव झाला होता. सध्या शशिकांत शिंदे हे विधान परिषद आमदार आणि शरद पवार गटाचे मुख्य प्रतोद आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती

Web Title: Shashikant shinde to be new president of ncp sharad pawar maharashtra after jayant patil resignation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2025 | 04:50 PM

Topics:  

  • jayant patil
  • Maharashtra Politics
  • Sharad Pawar
  • Shashikant Shinde

संबंधित बातम्या

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….
1

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण
2

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?
3

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?
4

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.