सांगली : शक्तिपीठ महामार्ग रद्दच करावा, सांगलीसह संपूर्ण कृष्णा वारणा काठ महापुरात बुडणार तो वाचविणे आणि इतर अन्य मागण्यासाठी शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी बुधगांव येथे शक्तिपीठ बाधित शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शक्तिपीठ बाधित शेतकरी बचाव कृती समितीचे महेश खराडे, उमेश देशमुख, सतीश साखळकर यांनी केले आहे.
या मेळाव्याला माजी खासदार राजू शेट्टी, खासदार विशाल पाटील, आमदार सतेज पाटील, माजी मंत्री बचू कडू, किसान सभेचे अजित नवले हे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत.यामुळे पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा पेटणार आहे. या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांशी प्रकल्प आहे. मात्र त्यासाठी सांगली कोल्हापूरमधील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होत आहे. स्वातंत्र्यदिनी हा मेळावा दुपारी बारा वाजता बुधगांव येथील इशिता मंगल कार्यालयात होणार आहे. मेळाव्यापूर्वी
‘तिरंगा झळकतो आमच्या शिवारात, शक्तिपीठ नको आमच्या वावरात” ही घोषणा देऊन सकाळी जिल्ह्यात सर्वत्र बाधित शेतीत तिरंगा फडकवण्यात येणार आहे. बुधगांव येथेही मेळाव्या पूर्वी झेंडावंदन करण्यात येईल त्यानंतर मेळाव्यास प्रारंभ होईल अशी माहिती देण्यात आली आहे.
शक्तिपीठ महामार्गाला सांगली जिल्ह्यातून प्रचंड विरोध आहे. जिल्ह्यात कुठेही शेतीची मोजणी होऊन दिलेली नाही अधिकाऱ्यांना पिटाळून लावण्यात आले आहे. मात्र तरीही सरकार हा महामार्ग रेटण्याचा प्रयत्न करत आहे. या महामार्गामुळे ऊस, द्राक्ष शेती उध्वस्त होणार आहे. त्याचबरोबर सांगली, सांगलीवाडी, कर्नाळ, पद्माळे, आदींसह कृष्णा आणि वारणा काठावरील अनेक गावे पाण्याखाली जाणार आहेत. बुधगांव ते दानोळी असा सुमारे १५ किमी उड्डाण पूल सांगलीवाडी मार्गे होणार आहे. या पुलाचा २० ते २५ फूट भराव असणार आहे, त्यामुळे सांगली शहरासह सर्व गावांना त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे शेती वाचवण्यासाठी हा संघर्ष सुरु आहे. या सर्व बाबींचा विचार राज्य सरकारने करावा या मागणीसह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच मेळाव्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. त्यांनी अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांचे राजकीय पुनर्वसन करण्याच्या निर्णयावर अंजली दमानिया यांनी निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, मला असं वाटतं की, ज्या पक्षाने 23 दिवसांपूर्वी त्यांच्यावर कारवाई केली होती आणि का आता त्यांनी अतिशय चुकीचं वर्तन केलं जे न शोभणारं होतं, असं सांगून ज्यांच्यावर कारवाई केली त्या सूरज चव्हाण यांना युवक अध्यक्षपदावरण सरचिटणीस पद जर मिळालं तर अजित पवारांच्या शब्दांवर आता लोक विश्वास कसा ठेवणार? असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे.
Web Title: Shetkari melava budhgaon against shaktipeeth highway raju shetty satej patil present