Municipal Elections News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. पक्षप्रमुखांपासून पदाधिकारी, कार्यकर्तेही तयार झाले आहेत. ‘स्वबळावर लढण्याचा’ नारा देत शिंदे गटाच्या शिवसेनेनेही तयारी सुरू केली आहे.
महायुती होणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी, प्रत्येक पक्ष आपापल्या स्तरावर निवडणुकीची तयारी सुरू ठेवत आहे. पुण्यातही शिंदे गटाने सर्वच महापालिका जागांवर लक्ष केंद्रित करत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. वेळ पडल्यास आम्ही स्वबळावर निवडणूक लढवण्यास तयार आहोत, असे स्पष्ट संकेत शिंदे गटाचे पुण्याचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी दिले आहेत.
ST च्या सर्व बस होणार इलेक्ट्रिक…; 10 वर्षात जुन्या बस जाणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकांसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत शिंदे गटाचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी पक्षाच्या तयारीबाबत माहिती दिली. या वेळी कार्यकर्त्यांनी शिंदे साहेबांना पुण्यात सेनेचा वाढता प्रभाव, माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश करण्याचा कल याबाबत माहिती दिली. अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटात सहभागी होण्यासाठी उत्सुक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
धंगेकर म्हणाले की, ‘पुणे महापालिकेतील सर्वच्या सर्व जागांवर लढण्याची आमची तयारी सुरू आहे. प्रत्येक प्रभागात उमेदवार उभे करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू असून, एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिल्यास आम्ही सर्व जागा स्वबळावर लढण्यास सज्ज आहोत.’
Monsoon Alert Update: ‘येत्या 4 दिवसांमध्ये राज्यात तीव्र…’; IMD ने दिला ‘हा’ महत्वाचा अलर्ट, कोकणात
पुण्यातील कार्यकर्ते १६५ जागांवर लढण्यासाठ सक्षम आहेत. सैन्य तयार आहे, फक्त आपल्या आदेशाची वाट पाहत आहेत. पक्षप्रवेशासाठी अनेक लोक संपर्क करत आहेत. बैठका देखील सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्यासाठी अनेक जण उत्सुक आबेत. त्यामुळे भविष्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश पाहायला मिळतील, अशी माहिती एकनाथ शिंदे यांना देण्यात आली आहे.