Mumbai Politics: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे या दोन बंधुंनी एकत्र येऊन निवडणूक लढावी, यासाठी ठाकरे गट आणि मनसे कडून प्रयत्न केले जात आहेत. पण दोन्ही ठाकरे बंधुंच्या युतीत खोडा घालण्यासाठी शिंदे गटाकडून रणनीती आखण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांच्यासोबत युती करण्यासाठी शिंदे गटाचे मंत्री उदय सामं यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे डिनर डिप्लोमसीची योजना आखत असल्याचीमाहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे, मुंबई शिवसेनेच्या ठाकरे ब्रँडला विशेष महत्त्व आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी, अशी दोन्ही ठाकरे बंधुंच्या चाहत्यांची इच्छा आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, यासाठी अनेकदा प्रयत्नही झाले. पण यंदा मुंबई महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही बंधुंनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी, यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न होताना दिसत आहे. पण शिंदे गटाकडून राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. राज ठाकरे शिंदेंसोबत गेल्यास त्यांना मतांचा फायदा होऊ शकतो. मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकत्र येण्याची इच्छा असली तरी वरिष्ठ पातळीवरील हालचालीही थंडावल्या आहेत. त्यामुळे शिंदे गटाकडून राज ठाकरेंना टाळी देण्यासाठी तयारी सुरू असल्याचे दिसत आहे.
‘लाडकी बहीण’नंतर राज्यातील महिलांसाठी सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय; आता महिलांना…
विधानसभा निवडणुकीत मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. मनसेचा तर एकही उमेदवार निवडणूक आला नाही. त्यामुळे ठाकरेंची प्रतिष्ठा जपण्यासाठी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधु एकत्र यावेत, अशी अनेकांची इच्छा होती. अनेक शहरांमध्ये कार्यकर्त्यांकडूनही सकारात्मक प्रतिसाद पाहायला मिळाला. पण त्याच काळात एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या घरी स्नेहभोजनासाठी गेले आणि या युतीच्या चर्चांमध्ये खोडा पडला.
या सगळ्यात, उदय सामंत यांनीदेखील राज ठाकरे यांना संपर्क साधल्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्यामुळे ठाकरे बंधुच्या युतीच्या चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच शिंदे गटाचे राज ठाकरेंसोबत प्रयत्न सुरू केले. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची विचारधार एकच असल्याचे सांगत सामंत यांच्याकडूनही राज ठाकरेंसोबतच्या युतीचे संकेत दिले जाऊ लागले.
Pune Big Breaking: पुण्यात पावसाचा जोर वाढला; खडकवासल्यातून १५ हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू
त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीदेखील राज ठाकरेंची भेट घेतली. तेव्हापासून ठाकरे बंधुंच्या युतीच्या चर्चांना ब्रेक लागल्याची चर्चा सुरू झाली.पण या सगळ्या घडामोडींमध्येही ठाकरे गट राज ठाकरेंसोबतच्या युतीसाठी आशादायी होता. आता शिंदे गटाने युतीसंदर्भात हालचाली सुरू केल्याने राज ठाकरे एकनाथ शिंदेंना प्रतिसाद देणार की उद्धव ठाकरेंना, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.