खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला (फोटो- ani)
पुणे: Monsoon Update: पुणे शहराला सकाळपासून जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. पुणे शहर आणि उपनगरात अति ते अति मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान खडकवासला धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. खडकवासला धरण क्षेत्रातून रात्री 9.30 वाजल्यापासून 15 हजार १५ हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
🛑🛑 महत्वाची सूचना🛑🛑#खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून #मुठानदी पात्रामध्ये रात्री ९.३० वाजता १५ हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी- श्वेता कुऱ्हाडे,संनियंत्रण अधिकारी, मध्यवर्ती नियंत्रण कक्ष पुणे#Punerain#REDALERT pic.twitter.com/LlPFFHW0GY
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) June 19, 2025
धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने मुठा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. पुण्यातील प्रसिद्ध असा बाबा भिडे पूल देखील पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे.
पुण्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने अनेक भागात पाणी साचले आहे. कात्रज, धनकवडी, सिंहगड रस्ता या भागात पाणी साचल्याने वाहतुकीवर काही अंशी परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. तसेच काही घरांमध्ये देखील पाणी शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे.
नदीपात्रात नागरिकांनी उतरू नका, नदीकाठच्या लोकांनी सतर्कता बाळगा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पावसाचा जोर खडकवासला धरण क्षेत्रात कायम राहिल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानेही पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
मुळा-मुठा नदीत वाहून जाणाऱ्या एकाला मिळाले जीवनदान
राज्यामध्ये मान्सून पावसाचे जोरदार पुनरागमन झाले आहे. यापूर्वी राज्यात तुफान अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य जनतेचे मोठे नुकसान देखील झाले होते. यानंतर पावसाने काही काळ विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा तुफान बॅंटिंग करण्यास सुरुवात केली आहे. तुफान पावसामुळे दुर्घटना देखील घडत आहेत. पुण्यात एक व्यक्ती मोटारसायकलसह बंधाऱ्यात वाहून जाताना पोलिसांनी त्याला वाचवले आहे. नवाज खुर्शीद कोतवाल (वय 38 वर्ष रा. तुकाराम नगर, चंदन नगर पुणे) असे प्राण वाचवण्यात आलेल्याचे नाव आहे.
कौतुकास्पद! पुणे पोलिसांमुळे मुळा-मुठा नदीत वाहून जाणाऱ्या एकाला मिळाले जीवनदान
मुळा मुठा नदीवरील पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याची माहिती खराडी पोलीस ठाण्यास मिळाली असता, पोलीस मुळा मुठा नदीवरील बंधाऱ्यावरील पुलावरील रस्ता बंद करण्यासाठी गेले, तेथे एक जण मोटरसायकलसह बंधाऱ्यावर मध्यभागी अडकल्याचे दिसून आले. त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी फायर ब्रिगेडला तात्काळ कळविले, परंतु पाण्याचा प्रवाह वाढत होता तो पाण्यात वाहून जाण्याची शक्यता आहे.