
Shirur Gram Panchayat Administrator, Gajanan Patil ZP CEO Pune,
शिरूर तालुक्यातील ७१ मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर अखेर प्रशासकांची नियुक्ती.
पुणे जिल्हा परिषदेचे CEO गजानन पाटील यांनी जारी केले नियुक्तीचे अधिकृत आदेश.
पंचायत समिती विस्ताराधिकारी व अंगणवाडी पर्यवेक्षिकांकडे सोपवली प्रशासकाची धुरा.
Shirur News: शिरूर तालुक्यातील मुदत संपलेल्या तब्बल ७१ ग्रामपंचायतींवर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी प्रशासक नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत. यावेळी ग्रामपंचायतींवर नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांमध्ये पंचायत समितीचे विस्ताराधिकारी तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिकांचा समावेश करण्यात आला आहे. एका प्रशासकाकडे लांब अंतरावरील सात ते आठ गावांचा पदभार देण्यात आला आहे.
शिरूर तालुक्यातील मुदत संपलेल्या तब्बल ७१ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी याबाबत प्रशासक नियुक्तीचे आदेश काढले असून, प्रशासकांचा कार्यकाळ पुढील सहा महिने किंवा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत असणार आहे. या प्रशासकांमध्ये पंचायत समितीचे विस्ताराधिकारी आणि अंगणवाडी पर्यवेक्षिकांचा समावेश करण्यात आला आहे.
Parbhani Medical College: डॉ. विश्वजित पवार यांच्याकडे परभणी वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठातापदा
मात्र, एका प्रशासकाकडे त्यांच्या प्रशासकीय कामांसह शिरूर तालुक्यातील लांब अंतरावरील अनेक ग्रामपंचायतींचा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे गावातील विकासकामांना किती चालना मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर संबंधित सरपंचांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा मुदत संपल्यामुळे नव्याने पंचायत समितीचे विस्ताराधिकारी आणि अंगणवाडी पर्यवेक्षिकांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
काही प्रशासकांकडे २० ते २५ किलोमीटर अंतरावरील एकापेक्षा अधिक गावांचा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना प्रत्येक गावासाठी पुरेसा वेळ देणे अशक्य होणार नाही, मात्र यामुळे ग्रामपंचायतींच्या स्थानिक विकासकामांना तसेच विविध योजनांच्या मंजुरीला काहीसा ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
प्रशासकीय अधिकारीच प्रशासक असल्याने त्यांना काही कामांसाठी शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारण्याची वेळ येणार नाही, हे निश्चित असले तरी नवीन प्रशासकांच्या नियुक्तीमुळे गावांच्या विकासात काय भर पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Tharala Tar Mag Serial: ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्याच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन
विस्ताराधिकारी किसन खोडदे – धामारी, पाबळ, मुखई, हिवरे, गणेगाव खालसा, पिंपळे खालसा.
अंगणवाडी पर्यवेक्षिका गायत्री धावडे – आपटी व वाघाळे.
विस्ताराधिकारी मुकुंद देंडगे – करंदी, केंदूर, निमगाव म्हाळुंगी, वाडा पुनर्वसन व वरुडे.
विस्ताराधिकारी रघुनाथ पवार – आलेगाव पागा, उरळगाव, टाकळी भीमा, दहिवडी, पारोडी व इनामगाव.
अंगणवाडी पर्यवेक्षिका राणी कांबळे – गणेगाव दुमाला व नागरगाव.
अंगणवाडी पर्यवेक्षिका रंजना सोनवणे – सादलगाव.
विस्ताराधिकारी बाळू गावडे – कवठे येमाई, कारेगाव, कोंढापुरी, मलठण, मिडगुलवाडी, कान्हुर मेसाई, सविंदणे, आमदाबाद.
विस्ताराधिकारी रामेश्वर राठोड – कोरेगाव भीमा, डिंग्रजवाडी, पिंपळे जगताप, सणसवाडी, तळेगाव ढमढेरे, वढू बुद्रुक, विठ्ठलवाडी.
विस्ताराधिकारी विष्णू गाडीलकर – आंधळगाव, न्हावरे, शिक्रापूर, गुनाट, निमोणे, वाडगाव रासाई, शिरसगाव काटा.
विस्ताराधिकारी संतोष सोनटक्के – बुरुंजवाडी, कोळगाव डोळस, गोलेगाव व खंडाळे.
विस्ताराधिकारी संभाजी घोडे – चांडोह, निमगाव दुडे, पिंपरखेड, फाकटे, वडनेर खुर्द व रावडेवाडी.
अंगणवाडी पर्यवेक्षिका मीना वायाळ – चिंचणी व बाभूळसर बुद्रुक.
अंगणवाडी पर्यवेक्षिका नंदा पाटोळे – पिंपळसुटी.
अंगणवाडी पर्यवेक्षिका अपर्णा ऊनकुले – मोटेवाडी व शिंदोडी.
विस्ताराधिकारी पूनम मराठे – भांबर्डे, मोराची चिंचोली, निमगाव भोगी, पिंपरी दुमाला व बाभूळसर खुर्द.
विस्ताराधिकारी स्नेहल माकर – जातेगाव बुद्रुक, दरेकरवाडी, जातेगाव खुर्द, कुरुळी व निर्वी.
अंगणवाडी पर्यवेक्षिका पल्लवी देशमुख – खैरेनगर व खैरेवाडी.
अशा प्रकारे ७१ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.