Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uddhav Thackeray : ‘लाडक्या कंत्राटदारांनी अर्थसंकल्प गिळला’; अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर ठाकरेंची कडाडून टीका

राज्य सरकारकडून केवळ महाराष्ट्र खड्ड्यात घालण्याचं काम सुरू झालंय. लाडकी बहीण योजनेने हा अर्थसंकल्प गिळला, अशा शेलक्या शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Mar 10, 2025 | 07:49 PM
'लाडक्या बहिणींनी अर्थसंकल्प गिळला'; अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर ठाकरेंची कडाडून टीका

'लाडक्या बहिणींनी अर्थसंकल्प गिळला'; अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर ठाकरेंची कडाडून टीका

Follow Us
Follow Us:

विधानसभा निवडणूक काळात वारेमाप जाहिराती दिल्या. शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र आजच्या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला आणि सामान्य जनतेची घोर निराशा झाली आहे. सरकारने जाहीर केलेला हा अर्थसंकल्प हा अंत्यत बोगस आहे. या अर्थसंकल्पातून राज्यातील जनतेच्या हाती काहीच लागले नाही. केवळ थापा मारण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र कर्जबाजारी झाला आहे. राज्य सरकारकडून केवळ महाराष्ट्र खड्ड्यात घालण्याचं काम सुरू झालंय. लाडक्या कंत्राटदारांनी हा  अर्थसंकल्प गिळला आहे, अशा शेलक्या शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे.

पाच वर्षांत जीवनावश्यक वस्तूच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या नाहीत. तर शेतकऱ्यांच्या विजेच्या थकबाकीचे काय करणार ? हे स्पष्ट केले नाही तर शेतकऱ्यांसाठीच्या कर्जमाफी योजनेबाबत घोषणा केली नाही. मुंबईसाठी 64 हजार कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. ही कामे सर्वसामान्यासाठी नाहीत तर केवळ हे सर्व कामे गुत्तेदारासाठी (कॉन्ट्रॅक्टर) आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे केली.

शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याऐवजी 24 तास वीज द्यावी, अशी मागणी आहे. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. एकीकडे मेट्रोवर खर्च केला जातोय, मग बेस्टवर का केला जात नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित करीत महायुती सरकारच्या कारभारावर टीका केली.

या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफी यांनी केली आहे का? शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी झालेली नाही. प्रत्येकाला अन्न आणि निवारा कधी देणार? तुमचं सरकार स्थिर असताना जीवनावश्यक वस्तू स्थिर कधी ठेवणा? आजच्या अर्थसंकल्पामध्ये काय आहे? सामान्य माणसासाठी, काही नाही पण कॉन्ट्रॅक्टरसाठी खूप काही आहे. लाडक्या बहिणींसाठी नाही तर कंत्राटदारांवर जास्त लक्ष आहे, म्हणून हा अर्थसंकल्प कंत्राटदारांनी गिळला, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

दोन विमानतळ जोडण्याचे कामही सरकार करणार म्हटले आहेत. पण हे अदानीचं काम आहे. तुम्ही तुमच्या मालकाची काम करणार आहात का? शेतकऱ्यांना मोफत विजेची घोषणा केली. पण आता शेतकऱ्यांना बिल यायला लागली त्याच तुम्ही काय करणार आहात? थापानामा किंवा झोलानामा म्हणा. त्यांनी 2024 निवडणुकीत बोलले होते, त्यातील एक गोष्ट तरी आज केलीय का? असा सवालही ठाकरेंनी उपस्थित केला. अत्यंत बोगस अर्थसंकल्प आहे. असा अर्थसंकल्प गेल्या दहा वर्षात पाहिला नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Web Title: Shiv sena chief uddhav thackeray criticize maharashtra budget 2025 maximum funds spent on the ladki bahin yojana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2025 | 05:46 PM

Topics:  

  • Budget 2025
  • Maharashtra Assembly Budget Live
  • maharashtra budget session
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
1

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’
2

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका
3

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘;  राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार
4

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘; राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.