Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवसेनेचे मंत्री आठवड्यातून तीन दिवस जनतेच्या भेटीला, जाणून घ्या कधी आणि कुठे?

राज्यातील जनतेच्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्यासाठी शिवसेनेचे मंत्री जनतेच्या भेटीला येणार आहेत. नागरिकांसाठी बाळासाहेब भवन येथे अर्ज उपलब्ध केले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 03, 2025 | 04:56 PM
शिवसेनेचे मंत्री आठवड्यातून तीन दिवस जनतेच्या भेटीला (फोटो सौजन्य-X)

शिवसेनेचे मंत्री आठवड्यातून तीन दिवस जनतेच्या भेटीला (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

राज्यातील गोरगरीब जनतेच्या, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्यासाठी शिवसेनेचे मंत्री जनतेच्या भेटीला येणार आहेत. शिवसेना पक्ष मध्यवर्ती कार्यालय, बाळासाहेब भवन येथे दर आठवड्याला सोमवार ते बुधवार असे तीन दिवस तीन सत्रांमध्ये शिवसेना मंत्री जनतेच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. नागरिकांसाठी बाळासाहेब भवन येथे अर्ज उपलब्ध केले आहेत. तसेच गुगल फॉर्मच्या माध्यमातून देखील ऑनलाईन अर्ज सादर करावेत, त्यानुसार मंत्र्यांच्या भेटीची वेळ दिली जाईल, असे शिवसेनेने निवेदनाद्वारे म्हटले आहे.

शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार बाळासाहेब भवनात शिवसेना मंत्री जनतेची गाऱ्हाणी ऐकून घेणार आहेत. याचबरोबर पक्ष कार्यकर्त्यांनाही या तीन दिवसांत थेट मंत्र्यांना भेटता येणार आहे. शिवसेनाप्रमुख हिंदुह्रयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण अशी शिकवण होती. याच विचाराने मंत्र्यांनी काम करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्यातील गोरगरिब जनतेचे गाव, तालुका पातळीवरील तसेच मंत्रालय संबंधित अडचणी आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिवसेनेचे ११ मंत्री आठड्यातील तीन दिवस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असतील.

बाळासाहेब भवनमध्ये सोमवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत सामान्यांना भेटतील. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे जनतेची गाऱ्हाणी ऐकतील. सायंकाळी ४ ते ७ या वेळेत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे सर्वसामान्यांच्या अडचणी जाणून घेतील.

बाळासाहेब भवन येथे मंगळवारी सकाळी ९ ते ११ या गृहराज्य मंत्री, महसूल राज्यमंत्री, पंचायत राज, अन्ननागरी पुरवठा आणि औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांची सामान्यांना भेट घेता येईल. सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत वित्त, नियोजन, कृषी मदत व पुनर्वसन, विधी न्याय आणि कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची भेट घेता येईल. त्याच दिवशी सायंकाळी ४ ते ७ यावेळेत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे मंत्री जनतेच्या समस्या जाणून घेतील.

बुधवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांना भेटता येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांना भेटता येईल. त्यानंतर सायंकाळी ४ ते ७ या वेळेत पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि रोजगार हमी योजना, फलोत्पादन खार भूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले या दोन मंत्र्यांना भेटता येईल, असे शिवसेना सचिव संजय मोरे यांनी निवेदनाद्वार म्हटले आहे. मंत्री महोदयांना कामानिमित्त भेटीसाठी य़ेणाऱ्या नागरिकांसाठी पक्ष कार्यालयात अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या अर्जातील माहिती सविस्तर भरुन आणि कामाच्या विषयाचा उल्लेख करुन मंत्र्यांची भेट घ्यावी, असे आवाहन पक्ष सचिव संजय मोरे यांनी केले आहे. माहिती भरण्याचे अर्ज गुगल फॉर्मवर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, असे मोरे यांनी म्हटले आहे.

शिवसेना मंत्र्यांना भेटण्याचे वेळापत्रक

स्थळ – शिवसेना पक्ष मध्यवर्ती कार्यालय, बाळासाहेब भवन, मुंबई

सोमवार

सकाळी ९.०० ते ११.०० वा :- मंत्री उदय सामंत

सकाळी ११.०० ते दुपारी २.०० वा :- मंत्री प्रताप सरनाईक

सायं. ४.०० ते ७.०० वा :- मंत्री दादा भुसे

मंगळवार

सकाळी ९.०० ते ११.०० वा :- मंत्री योगेश कदम

सकाळी ११.०० ते दुपारी २.०० वा :- आशिष जयस्वाल

सायंकाळी ४.०० ते ७.०० वा :-
मंत्री संजय शिरसाट
मंत्री संजय राठोड

बुधवार

सकाळी ९.०० ते ११.०० वा :- मंत्री शंभूराज देसाई
सकाळी ११.०० ते दुपारी २.०० वा :- मा. मंत्री प्रकाश आबिटकर

सायंकाळी ४.०० ते ७.०० वा :-
१) मा. मंत्री गुलाबराव पाटील
२) मा. मंत्री भरतशेठ गोगावले

Web Title: Shiv sena ministers to meet the public three days a week shiv sena party office organized at balasaheb bhavan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2025 | 04:56 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • maharashtra
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी
1

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
2

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…
3

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
4

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.