Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विनोद तावडेच नाही तर एकनाथ शिंदेंचा हा माणूस पोलीस बंदोबस्तात पैसे वाटतो; संजय राऊत यांनी नावच जाहीर करून टाकलं

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. पक्ष बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला असून राज्यात खळबळ माजली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Nov 19, 2024 | 03:44 PM
विनोद तावडेचं नाही तर एकनाथ शिंदेंचा हा माणूसही पैसे वाटतो; संजय राऊत यांनी थेट नावच जाहीर करून टाकलं

विनोद तावडेचं नाही तर एकनाथ शिंदेंचा हा माणूसही पैसे वाटतो; संजय राऊत यांनी थेट नावच जाहीर करून टाकलं

Follow Us
Close
Follow Us:

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबईतील एका हॉटेलमध्ये विरोधी पक्ष बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला असून या घटनेमुळे राज्यात खळबळ माजली आहे. दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. केवळ विनोद तावडेच नाही तर एकनाथ शिंदे यांचा माणूसही पोलीस बंदोबस्तात पैसे वाटत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

भारतीय जनता पक्षाने कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी नालासोपारा विरारमध्ये जे घडलं आहे ते कॅमेरासमोर घडलं आहे. खुलासे कसले करता. भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे. भाजपचा या निवडणुकीतला खेळ संपला आहे. भाजप पक्षाच्या राष्ट्रीय महासचिवाकडे पाच कोटी रुपये पकडण्यात आले. हॉटेलमध्ये हे सुरू होतं.बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना अडवून ठेवलं. त्यांच्या अंगावर पैसे फेकले. त्यांना हॉटेलमध्ये कोंडून ठेवलं. याच्यावर भाजप आता काय खुलासा करणार, असा सवालही त्यांनी केला आहे.

महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारसंघात १५-२० कोटी रुपये आचारसंहिता लागू होण्याआधी पोहोचले. नाशिकमध्येही भाजप आणि एकनाथ शिदें गटाच्या माणसांकडूनही पैसे आता जप्त करण्यात आले आहेत. ठाण्यातून पैसे वाटपासाठी खास माणसांच्या नेमणुका केल्या आहेत. ठाण्याच्या बाजूला इशान्य मुंबई आहे. तिथे राम नेफाळे नावाचा एक माणूस आहे. शिंदेंचा हा माणूस आहे. राम नेफाळे हा माणूस रात्री ११ नंतर पैसे घेऊन जातो आणि् त्या भागातल्या मतदारसंघात पैसे वाटप करून पोलीस बंदोबस्तात परत ठाण्यात जातो असा, गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

23 तारखेनंतर या राम नेफाळेचं काय करायचं हे मी ठरवणार आहे. राम नेफाळेंसारख्या पैसे वाटप करणाऱ्या १८ लोकांची माझ्याकडे नावं आहेत. तर विनोद तावडे स्वत: पैसे वाटतायेत हे आश्चर्य. आमच्या बॅगा तपासतात, खिसे तपासतात. हेलिकॉप्टर विमानं तपासतात, घरात येतात, वाहने तपासतात. निवडणूक आयोगाने जो आमच्या मागे ससेमीरा लावला आहे. तो या भाजप आणि शिंदे गटाच्या माणसांच्या मागे लावला असता तर किमान महाराष्ट्राच्या तिजोरीत १००० कोटी रुपये जमा झाले असते.

विनोद तावडे यांच्याकडे १५ कोटी रुपये होते

विनोद तावडे यांच्याकडे १५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम होती, असं मी ऐकडल आहे. त्यातील फक्त ५ कोटी रुपये सापडले. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी समाज हिताचं काम केलं आहे, ते पण निवडणुकीत. सध्याची विधानसभा निवडणूक कोणत्या पद्धतीने लढवली जात आहे, हे यावरून स्पष्ट होतं आहे. यावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे सायंकाळी ५ वाजता माध्यमाशी संवाद साधणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Web Title: Shiv sena mp sanjay raut serious allegations on bjp leader vinod tawde and eknath shinde after money distribution during election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2024 | 03:16 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • sanjay raut on BJP
  • Vinod Tawde

संबंधित बातम्या

BJP President: राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये हालचालींना वेग; महाराष्ट्रातील ‘हे’ नाव आघाडीवर, RSS ची भूमिका काय?
1

BJP President: राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये हालचालींना वेग; महाराष्ट्रातील ‘हे’ नाव आघाडीवर, RSS ची भूमिका काय?

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?
2

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.