शिंदे गटाकडून ठाकरे गटावर टीका (फोटो सौजन्य-X)
डोंबिवलीतील सुनिल नगर येथील गार्डनमधील वाचनालयावरूनचा वाद चांगलाच पेटला आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक नितीन पाटील यांनी सुनिल नगरमध्ये सुरु असलेलया अनधिकृत बांधकामांवर ठाकरे गटाला लक्ष्य केले आहे. ६५ बेकायदा इमारत बांधकाम प्रकरणी बोलणारे या बेकायदा बांधकामांवर का बोलत नाहीत. की तेपण त्यात सामिल आहेतअशी घणाघाती टिका केल्यानंतर आत्ता शिवसेना ठाकरे गट यावर काय प्रतिक्रिया देते ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
डाेंबिवलीतील सुनिलनगरमध्ये कवित्री बहिणाबाई चौधरी गार्डनमध्ये तयार करण्यात येणाऱ्या वाचनालयावरुन शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार जुंपली आहे. लहान मुलांसाठी असलेल्या या बगिच्यात वाचनालय झाले तर लहान मुले काय करतील ? आम्ही अजिबात वाचनालय होऊ देणार नाही. याला स्थानिक नागरीकांचा प्रचंड विरोध आहे. अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाची आहे. तर नागरीकांच्या सोयी सुविधांसाठी सुसज्ज वातानुकूलीत आधुनिक वाचनालय आम्ही तयार करतोय खासदारांची २५ लाखाचा निधी दिला आहे. काही लोकांचे पोट दुखते आहे. ते लोक अनधिकृत जाहिराती आणि वाचनालयावर का बोलत नाही असा शिवसेना शिंदे गटाचे नितीन पाटील यांनी केला आहे. मात्र आत्ता या मुद्यावर डोंबिवलीत राजकीय वातावरण तापले आहे.
डोंबिवलीतील सुनिलनगर येथील कवियत्री बहिणाबाई चौधरी उद्यानात प्रस्तावित असलेल्या एका वाचनालयावरुन शिवसेना ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने आले आहेत. ठाकरे गटाने नागरीकांसाठी वाचनालय होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. तर नागरीकांसाठीच आम्ही वाचनालय करतोय ते होणारच अशी भूमिका शिंदे गटाने घेतली आहे. या मुद्यावर आरोप प्रत्यारोप करताना शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक नितिन पाटील यानी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे सुनिल नगरचे माजी नगरसेवकांचे नाव न घेता ठाकरे गटाला लक्ष्य केले आहे. आज डोंबिवली शहरात ६५ बेकायदा इमारतीचा विषय गाजतो.
सुनील नगर येथील नाल्याच्या आजूबाजूला अनधिकृत बांधकामा सुरू आहेत. त्यांना ते दिसत नाही का ? कोण प्रतिनिधी आहे. सुनिल नगरच्या नाल्याच्या आजूबाजूला काय चाललेले आहे. कोण जबाबदार आहे ? कोण आहे तिथला लोकप्रतिनिधी ? बघा त्यामुद्यावर काही बोलत नाहीत ? सुनिलनगरात चांगले रस्ते झाले आहेत. कॉंक्रिटीकरण झाले आहे. गटारे झाली आहेत. गॅस लाईन टाकून दिली आहे. हे सर्व काम खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले आहे. नितीन पाटील यांच्या विधानानंतर आत्ता शिवसेना ठाकरे गटाची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.