मुंबई : माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी शिवसेना भवनात (Shivsena Bhavan) पदाधिकारी यांची महत्त्वाची बैठक (Meeting) बोलावली आहे. दुपारनंतर या बैठकीला सुरुवात होईल. आगामी मुंबई पालिका निवडणुकीच्या धरतीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. सर्वच पक्षांनी पालिका निवडणुकीसाठी (BMC Election) जोरदार मोर्चबांधणीला सुरुवात केली आहे. तसेच भाजपाने सुद्धा कोणत्याही परिस्थितीत पालिकेवर झेंडा फडकवायचा आहे, या इराद्याने पेटून उठले आहेत. दरम्यान, पालिका निवडणुकीत भाजप मनसेबरोबर युती करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिंदे फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्यासाठी तसेच आगामी निवडणुकातील रणनिती ठरविण्यासाठी आजची सेना भवनातील बैठक महत्त्वाची आहे.
[read_also content=”लसीकरणासाठी घाई करू नये ; डॉ. प्रशांत उटगे यांचे गोपालकांना आवाहन https://www.navarashtra.com/pune/paschim-maharashtra/pune/do-not-rush-to-get-vaccinated-dr-prashant-utges-appeal-to-the-cowherds-nrab-325304.html”]
दरम्यान, पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची महाविकास आघाडीची बैठक झाली होती. (Shivsena, NCP and Congress Meeting) आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यामुळं पालिकेत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवतील असं बोललं जात आहे. दरम्यान, सध्या जे सुरु आहे ते जनता उघड्या डोळयांनी पाहत आहे, त्यामुळं जनता वेळे आल्यावर याचे उत्तर देईल, असं उद्धव ठाकरेंनी म्हचलं आहे.