Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivsena News: शिंदे गटाच्या बड्या नेत्याचे राजकीय निवृत्तीचे संकेत…? नेमकं काय आहे कारण

संजय शिरसाट यांचा महापालिकेतील नगरसेवक पदापासून राजकीय प्रवास हा सुरू झाला तो आज राज्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री पदापर्यंत येऊन पोहोचला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 04, 2025 | 04:44 PM
Shivsena News: शिंदे गटाच्या बड्या नेत्याचे राजकीय निवृत्तीचे संकेत…? नेमकं काय आहे कारण
Follow Us
Close
Follow Us:
  • आपण आता थांबण्याचा विचार करत आहोत- संजय शिरसाट
  • संजय शिरसाट यांचे पुत्र  सिद्धांत शिरसाट यांचे भावी महापौर उल्लेख असलेले बॅनर्स
  • कन्या हर्षदा शिरसाट यादेखील राजकारणात सक्रीय

Shivsena News: शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट गेल्या काही दिवसांपासून राजकीय संन्यास घेण्याचा विचार जाहीरपणे बोलून दाखवत आहेत. संजय शिरसाट यांनी आतापर्यंत अनेकदा ” आपण आता थांबण्याचा विचार करत आहोत.” असं म्हणत आपले विचार उघडपणे जाहीर कार्यक्रमांमध्ये बोलून दाखवले आहेत. राज्यात महायुतीची सत्ता असतानाही राज्याचे सामाजिक न्याय मंत्री पद असताना संजय शिरसाट यांना राजकीय संन्यास घेण्याचा विचार का करत आहे, असा प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे. अशातच कालच्या नांदेड दौऱ्यावर असताना संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा आपल्या राजकीय निवृत्तीवर भाष्य केलं आहे.

Maharashtra Local Body Election Date : अखेर निवडणुकीचं बिगुल वाजलं, 2 डिसेंबरला मतदान; वाचा A टू Z माहिती

नांदेड दौऱ्यावर असताना संजय शिरसाट यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता, शिरसाट म्हणाले की,’ मला निश्चितच थांबायचं आहे. पण निवडणुकीला अजून चार वर्षे शिल्लक असल्याने आताच त्याचा विचार कशाला करायचा,’ अस म्हणत त्यांनी यावर अधिक भाष्य करण मात्र टाळलं आहे. दरम्यान, येत्या काही दिवसात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यातच संजय शिरसाट यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांचे भावी महापौर असा उल्लेख असलेले बॅनर्सही झळकू लागले आहेत. त्यामुळे शिवसेनेतील इच्छुकांमध्ये चलबिचल वाढली आहे. त्यातच इतर माजी महापौर आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजीचा सूरही होता.

याशिवाय त्यांच्या कन्या हर्षदा शिरसाट यादेखील राजकारणात सक्रीय होऊ लागल्या आहेत. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची राजकीय इच्छाशक्ती पाहता शिरसाट यांनी राजकीय निवृत्तीचा विचार करत आहेत का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. कुटुंबातील मुलांचा राजकीय प्रवास अधिक सुकर व्हावा आणि त्यांना संधी मिळावी म्हणून शिरसाट राजकारणातून निवृत्त होण्याचा विचार करत असल्याच बोलले जात आहे.

संजय शिरसाट यांचा महापालिकेतील नगरसेवक पदापासून राजकीय प्रवास हा सुरू झाला तो आज राज्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री पदापर्यंत येऊन पोहोचला आहे. सलग तीन कार्यकाळ आमदार आणि सध्या मंत्री असलेले संजय शिरसाट यांना अलीकडच्या काळात “आता थांबावे” असे वाटू लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यांच्या या भावनेमागे कुटुंबातील पुढील पिढीला म्हणजे मुलाला आणि मुलीला  राजकारणात स्थान मिळावे, हे प्रमुख कारण असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Maharashtra Politics: “… तुम्हाला उडवून देऊ”; कॉँग्रेस खासदाराची मोदी-फडणवीसांना धमकी; राज्यात खळबळ

सिद्धांत शिरसाट यांनी मात्र या बॅनरबाबत आपल्याला काहीही माहित नसल्याचे सांगत स्पष्टीकरण दिले. “महापौरपदाबाबतचा निर्णय आमचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील,” असे सांगत माजी महापौर आणि इच्छुकांनी परिस्थिती संतुलित ठेवण्याचा प्रयत्न केला. संजय शिरसाट यांच्या संभाव्य राजकीय निवृत्तीच्या चर्चांमुळे आणि त्यांच्या कुटुंबातील दुसरी पिढी सक्रिय होण्याच्या हालचालींमुळे शिवसेनेत (शिंदे गट) वर्षानुवर्षे कार्यरत असलेल्या स्थानिक नेत्यांमध्ये काहीसे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे.

Web Title: Shivsena news signs of political retirement of the top leader of the shinde group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2025 | 04:44 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Sanjay Shirsat
  • shivsena

संबंधित बातम्या

Palghar : डहाणूतील ‘त्या’कुटुंबांची नितेश राणेंनी घेतली भेट
1

Palghar : डहाणूतील ‘त्या’कुटुंबांची नितेश राणेंनी घेतली भेट

Prakash Surve Statements: ‘मराठी माझी आई आहे, आई मेली तरी चालेल..’; वादग्रस्त वक्तव्यानंतर प्रकाश सुर्वेंचा जाहीर माफीनामा
2

Prakash Surve Statements: ‘मराठी माझी आई आहे, आई मेली तरी चालेल..’; वादग्रस्त वक्तव्यानंतर प्रकाश सुर्वेंचा जाहीर माफीनामा

Maharashtra Politics: महायुती तुटणार? “… त्यांचे उपकार विसरू नका”; NCP चा आमदार थोरवेंना इशारा
3

Maharashtra Politics: महायुती तुटणार? “… त्यांचे उपकार विसरू नका”; NCP चा आमदार थोरवेंना इशारा

५ ते ८ नोव्हेंबरदरम्यान उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांची संवाद, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सेनेचा ‘दगाबाज रे’ अभियान
4

५ ते ८ नोव्हेंबरदरम्यान उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांची संवाद, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सेनेचा ‘दगाबाज रे’ अभियान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.