कल्याण : कल्याण पश्चिम (Kalyan West) येथील दुर्गाडी गणेश घाटावरील (Durgadi Ganesh Ghat) केंद्रीय मंत्री कपिल पाटील (Union Minister Kapil Patil) यांचे बॅनर (Banner) कुणी अज्ञात इसमाने फाडल्याने (Tore Down) भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये (BJP Workers) संतापाचे वातावरण आहे (atmosphere of anger). आज केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते खासदार निधीतून (MP Fund) साकारण्यात आलेल्या कल्याण मधील विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात येणार आहे.
दुर्गाडी गणेश घाट परिसरात सुशोभीकरनाच्या कामाचे लोकार्पण व भूमिपूजन आज केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वीच कुणी अज्ञात इसमाने त्याच्या उद्घाटनचा बॅनर फाडल्याचे समोर आले आहे.
[read_also content=”जीवावर बेतणारी बातमी! नियमांना फासला जातोय उघड-उघड हरताळ, मेळघाटात प्रवासी वाहनातून धोकादायक प्रवास https://www.navarashtra.com/crime/breaking-news-rules-are-being-flouted-dangerous-travel-by-fewer-passenger-vehicle-in-melghat-amravati-nrvb-372327.html”]
याप्रकरणी स्थानिक माजी नगरसेवक वरूण पाटील यांनी सांगीतले, चांगल्या कामाचे बॅनर फाडले याचं दुःख आहे. कपिल पाटील यांच्या हस्ते रविवारी कल्याण मधील विविध विकास कामांचा लोकार्पण होणार आहे. त्यांनी कल्याण मधील रस्त्यांसाठी कोट्यवधीचा निधी दिलाय.
विकास कामे होतायत त्यामुळे काही विघ्नसंतोशी असंतुष्ट लोकांनी हे कृत्य केलंय असा आरोप केला. नवा बॅनर लावून हे उद्घाटन कार्यक्रम परत होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
[read_also content=”साप्ताहिक राशीभविष्य : २६ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२३, कसे असतील या महिन्याचे शेवटचे चार दिवस, वाचा हा आठवडा कसा जाईल https://www.navarashtra.com/lifestyle/weekly-horoscope-26-february-to-4-march-2023-how-will-the-last-four-days-of-this-month-be-read-how-this-week-will-go-nrvb-372336.html”]