Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

म्हाडाच्या घरांना अल्प प्रतिसाद! मुंबईतील सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक, मुदतवाढ देण्याची शक्यता

लॉटरीतील सर्वात कमी किमतीचे घर पीएमजीपी मानखुर्द येथे असून त्याची किंमत २९ लाख ३७हजार रुपये आहे, तर सर्वात महागडे घर ताडदेवच्या क्रिसेंट टॉवरमध्ये असून त्याची किंमत ६ कोटी ८२ लाख रुपये आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 27, 2026 | 12:30 PM
म्हाडाच्या घरांना अल्प प्रतिसाद! मुंबईतील सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक, मुदतवाढ देण्याची शक्यता

म्हाडाच्या घरांना अल्प प्रतिसाद! मुंबईतील सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक, मुदतवाढ देण्याची शक्यता

Follow Us
Close
Follow Us:

मुंबईमध्ये आपले हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. यामुळे सर्व सामान्य म्हाडाच्या लॉटरीची वाट पाहतात, मात्र यंदाच्या म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करण्याची मुदत अवघे चार दिवस शिल्लक असून आतापर्यंत अनामत रकमेसह केवळ २४,८२१ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी यंदाच्या लॉटरीत कमी घरे आणि किमती जास्त यामुळे सर्वसामान्यांनी म्हाडाच्या घरांना अल्प प्रतिसाद दिला आहे. म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठी म्हाडाकडे लाखोंच्या संख्येने अर्ज येतात. मुंबई मंडळातर्फे मे २०२३ मध्ये ४०८३ घरांसाठी काढलेल्या सोडतीसाठी १ लाख १९ हजार २७८ अर्जदारांनी, तर सप्टेंबर २०२४ मध्ये काढलेल्या २०३० घरांच्या सोडतीसाठी १ लाख १३ हजार ८११ अर्जदारांनी अनामत रकमेसह अर्ज केले होते. २६४० घरांसाठी शनिवारी सायंकाळपर्यंत ३९,९८६ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी केवळ २४,८२१ जणांनी अनामत रक्कम भरली आहे. इतकी कमी अर्ज संख्या पाहता अर्ज करण्यासाठी म्हाडाकडून मुदतवाढ मिळण्याची चिन्हे आहेत. मात्र म्हाडा घरांच्या किमती कमी करणार का, याकडे अर्जदारांचे लक्ष लागले आहे.(फोटो सौजन्य – istock)

Ladki Bahin Yojna: खात्यात ३००० रुपये जमा होणार? पण ‘या’ त्रुटी असल्यास लाभापासून मुकणार; लाडक्या बहिणींनो, तातडीने करा ‘हे’ काम

लॉटरीतील सर्वात कमी किमतीचे घर पीएमजीपी मानखुर्द येथे असून त्याची किंमत २९ लाख ३७हजार रुपये आहे, तर सर्वात महागडे घर ताडदेवच्या क्रिसेंट टॉवरमध्ये असून त्याची किंमत ६ कोटी ८२ लाख रुपये आहे. लॉटरीमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी केवळ १४५ घरे उपलब्ध आहे. अल्प उत्पन्न गटासाठी ८५८ घरे असली, तरी त्याच्या किमती कोट्यवधींच्या घरात आहेत, वरळीत अल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या सदनिकेची किमत चक्क २ कोटी ९ लाख रुपये आहे. घरांच्या किमती पाहून सर्वसामान्यांना घाम फुटला असून कोणत्या योजनेत अर्ज भरायचा असा प्रश्न त्याना पडला आहे. त्यामुळे म्हाडाची घरे खरंच परवडणारी आहेत का, असे म्हणायची सर्वसामान्यांवर वेळ आली आहे. अल्प प्रतिसाद पाहता मंडळाला नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीला मुदतवाढ देण्याची नामुष्की मंडळावर ओढवल्याचेही सूत्रांनी सांगितले, मुदतवाढीबाबत मंगळवारपर्यंत निर्णय होण्याची शक्यता असल्याचेही सूत्रांनी सागितले.

मुंबई-पुणे प्रवास आता सुपरफास्ट! ‘मिसिंग लिंक’चे ९९% काम पूर्ण; १ मे रोजी मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

१,१३,८११अर्जदारांनी अनामत रकमेसह सप्टेंबर २०२४ मध्ये काढलेल्या २०३० घरांच्या सोडतीसाठी अर्ज केले होते.१,१९,२७८ अर्जदारांनी मुंबई मडळातर्फे में २०२३ मध्ये ४०८३ घरांसाठी काढलेल्या सोडतीसाठी अर्ज केले. ३९,९८६ २६४० घरांसाठी शनिवारी सायंकाळपर्यंत अर्ज प्राप्त झाले.-२४,८२१ अर्ज चार दिवस शिल्लक असून आतापर्यंत अनामत रकमेसह प्राप्त झाले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Short response to mhada houses only four days left to apply for mumbai draw possibility of extension

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • MHADA Homes
  • MHADA Lottery 2026
  • Mumabi

संबंधित बातम्या

Mumbai News: पालिकेच्या मुदतठेवींत मोठी घट! तीन वर्षांत तब्बल ८ हजार कोटी रुपयांच्या निधीवर मारला डल्ला
1

Mumbai News: पालिकेच्या मुदतठेवींत मोठी घट! तीन वर्षांत तब्बल ८ हजार कोटी रुपयांच्या निधीवर मारला डल्ला

मुंबईतील ९० टक्के रिक्षा थांबे गायब! संपूर्ण शहरात २.६० लाख रिक्षा, १८ हजार टॅक्सी; पण थांब्यांची संख्या फक्त ७२४
2

मुंबईतील ९० टक्के रिक्षा थांबे गायब! संपूर्ण शहरात २.६० लाख रिक्षा, १८ हजार टॅक्सी; पण थांब्यांची संख्या फक्त ७२४

रेल्वेस्थानकांतील स्तनपान केंद्रांची झाली कचराकुंडी! कुर्ल्यात गुटखा बहाद्दरांनी केंद्र ‘लाल’ रंगाने रंगवले,दिशादर्शक फलकांचा अभाव
3

रेल्वेस्थानकांतील स्तनपान केंद्रांची झाली कचराकुंडी! कुर्ल्यात गुटखा बहाद्दरांनी केंद्र ‘लाल’ रंगाने रंगवले,दिशादर्शक फलकांचा अभाव

दक्षिण विभागातील पाणीपुरवठा बंद! पाणी जपून वापरण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे मुंबईकर नागरिकांना आवाहन
4

दक्षिण विभागातील पाणीपुरवठा बंद! पाणी जपून वापरण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे मुंबईकर नागरिकांना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.