Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MHADA Lottery 2026 : तीन वेळा मुदतवाढ देण्याची वेळ का आली? म्हाडाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाच्या सोडतीकडे डोळे लावून बसलेल्या लाखो अर्जदारांना यंदा अर्जप्रक्रियेतील अडथळ्यांचा सामना करावा लागला. पुणे मंडळाच्या ४ हजार ४६२ घरांसाठी तब्बल ३ वेळा मुदतवाढ देण्याची वेळ आली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 02, 2026 | 02:10 PM
तीन वेळा मुदतवाढ देण्याची वेळ का आली? म्हाडाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

तीन वेळा मुदतवाढ देण्याची वेळ का आली? म्हाडाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Follow Us
Follow Us:
  • म्हाडाच्या पुणे मंडळासाठी ४,४६२ घरांची सोडत
  • अर्जप्रक्रियेला तांत्रिक अडचणींमुळे तीन वेळा मुदतवाढ
  • घरांसाठी तब्बल ३ लाख १ हजारांहून अधिक अर्ज दाखल
पुणे : सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाच्या सोडतीकडे डोळे लावून बसलेल्या लाखो अर्जदारांना यंदा अर्जप्रक्रियेतील अडथळ्यांचा सामना करावा लागला. पुणे मंडळाच्या ४ हजार ४६२ घरांसाठी तब्बल ३ वेळा मुदतवाढ देण्याची वेळ आली. अखेर ३१ ऑक्टोबरला नोंदणी आणि अर्जविक्री प्रक्रिया संपली जरी असली, तरी या संपूर्ण प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमुळे म्हाडाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक अर्जदारांनी म्हाडाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

 

पुणे मंडळाच्या १५ टक्के एकात्मिक आणि २० टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत या घरांची सोडत जाहीर करण्यात आली होती. २४ ऑगस्टपासून अर्जप्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीपासूनच अर्जदारांना विविध अडचणींचा सामना करावा लागला. त्यातच १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान महाआयटी प्रणाली बंद पडल्याने कागदपत्र पडताळणीचे काम ठप्प झाले. परिणामी, अर्जदारांचा वेळ वाया गेला आणि मंडळाला तिसऱ्यांदा मुदतवाढ द्यावी लागली. नियोजनातील त्रुटींचा फटका मात्र घरासाठी प्रयत्न करणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागला.

३० ऑक्टोबंरपर्यंत एकूण ३ लाख १ हजार ५८६ अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी २ लाख ४५ हजार २३२ अर्जदारांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले आहेत. म्हणजेच ४ हजार ४६२ घरांसाठी लाखो नागरिकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. कागदपत्र पडताळणी आणि अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदारांची संख्या अडीच लाखांहून अधिक होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा : घरच्यांपासून लपवून गहुंजेच्या आलिशान सोसायटीत वास्तव्य; लंडनहून आलेल्या तरुणीचा दुर्दैवी अन् रहस्यमय अंत!

तीन वर्षांत यंदा म्हाडाच्या घरांसाठी विक्रमी नोंदणी!

म्हाडाच्या पुणे मंडळाच्या घरांच्या सोडतीला गेल्या तीन वर्षांत सातत्याने वाढता प्रतिसाद मिळत आहे. २०२४ मध्ये ३ हजार ६६२ घरांसाठी ७१ हजार ६४२ हून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. २०२५ मध्ये ४ हजार १८६ घरांसाठी २ लाख १५ हजार ८४७ अर्ज दाखल झाले. तर २०२६ मध्ये ४ हजार ४६२ घरांसाठी तब्बल ३ लाख १ हजार ५८६ नागरिकांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी २ लाख ४५ हजार २३२ अर्जदारांनी अनामत रकमेसह अर्ज निश्चित केले आहेत. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वाधिक नोंदणी झाली असून, म्हाडाच्या घरांसाठी नागरिकांचा वाढता कल अधोरेखित झाला आहे.

हे सुद्धा वाचा : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा संताप अनावर, पतीवर चाकूने हल्ला; मुकुंदवाडीतील घटनेनं खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: म्हाडाच्या पुणे मंडळाच्या सोडतीत किती घरांचा समावेश आहे?

    Ans: म्हाडाच्या पुणे मंडळाच्या सोडतीत एकूण ४ हजार ४६२ घरांचा समावेश आहे.

  • Que: डाच्या घरांसाठी एकूण किती अर्ज दाखल झाले आहेत?

    Ans: ३० ऑक्टोबरपर्यंत एकूण ३ लाख १ हजार ५८६ अर्ज दाखल झाले असून, त्यापैकी २ लाख ४५ हजार २३२ अर्जदारांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले आहेत.

  • Que: म्हाडाच्या अर्जप्रक्रियेला तीन वेळा मुदतवाढ का द्यावी लागली?

    Ans: अर्जप्रक्रियेत तांत्रिक अडचणी आल्या होत्या. विशेषतः १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान महाआयटी प्रणाली बंद पडल्याने कागदपत्र पडताळणीचे काम ठप्प झाले. त्यामुळे तीन वेळा मुदतवाढ द्यावी लागली.

Web Title: Applicants have raised questions regarding mhadas functioning nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 02:01 PM

Topics:  

  • MHADA Homes
  • MHADA Lottery
  • pune news

संबंधित बातम्या

Pune: युवा खेळाडूंचा जलवा! DSP करंडक स्पर्धेत ढोले-पाटील अकादमीची विजयाची हॅट्रिक; ‘या’ संघाचा दारुण पराभव
1

Pune: युवा खेळाडूंचा जलवा! DSP करंडक स्पर्धेत ढोले-पाटील अकादमीची विजयाची हॅट्रिक; ‘या’ संघाचा दारुण पराभव

Pune Metro Line 3: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! ३ नोव्हेंबरला शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन
2

Pune Metro Line 3: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! ३ नोव्हेंबरला शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन

Rain Update: बारामतीसह इंदापूरच्या बहुतांश भागात पावसाने झोडपले, द्राक्ष-डाळिंब बागांवर संकटाचे सावट
3

Rain Update: बारामतीसह इंदापूरच्या बहुतांश भागात पावसाने झोडपले, द्राक्ष-डाळिंब बागांवर संकटाचे सावट

कागदपत्र पडताळणीसाठी नागरिकांची पायपीट, 228 नवमतदारांना 70 किलोमीटर दूरची नोटीस; ग्रामस्थांचा संताप
4

कागदपत्र पडताळणीसाठी नागरिकांची पायपीट, 228 नवमतदारांना 70 किलोमीटर दूरची नोटीस; ग्रामस्थांचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.