Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश! ठाकुर्ली रेल्वे फाटक ते म्हसोबा चौक उन्नत मार्गाची उभारणी होणार

श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. याचे कारण म्हणजे आता लवकरच ठाकुर्ली रेल्वे फाटक ते म्हसोबा चौक उन्नत मार्गाची उभारणी होणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 21, 2025 | 08:49 PM
ठाकुर्ली रेल्वे फाटक ते म्हसोबा चौक उन्नत मार्गाची उभारणी होणार

ठाकुर्ली रेल्वे फाटक ते म्हसोबा चौक उन्नत मार्गाची उभारणी होणार

Follow Us
Close
Follow Us:
  • ठाकुर्ली रेल्वे फाटक ते म्हसोबा चौक उन्नत मार्गाची उभारणी होणार
  • श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश
  • या प्रकल्पाचा एकूण खर्च ६०.५३ कोटी रुपये
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील महत्त्वाचा ठाणे-कल्याण वाहतूक मार्ग सुकर करण्यासाठी ठाकुर्ली रेल्वे फाटक ते म्हसोबा चौकादरम्यानचा उर्वरित उन्नत मार्ग आणि १५ मीटर रुंद रस्ता विकसित करण्याचे काम गतीमान झाले आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ६०.५३ कोटी रुपये असून, एमएमआरडीएकडून ३६ कोटी रुपयांची निविदा जाहीर करण्यात आली आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

या प्रकल्पासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत असून, दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या या महत्त्वाच्या मार्गाला आता गती मिळणार आहे. यासाठी खासदार शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

Nitin Gadkari on AI Agriculture: शेतकऱ्यांसाठी ‘वरदान’ ठरणार एआय; कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून कृषी उत्पादनात वाढ होणार

मतदारसंघातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना वेग

खासदार डॉ. शिंदे यांच्या पुढाकारातून कल्याण लोकसभा मतदारसंघात रस्ते काँक्रीटीकरण, कल्याण-शिळफाटा मार्ग, पलावा उड्डाणपूल, मुंब्रा वाय-जंक्शन, कल्याण रिंग रोड, मोठागाव-मानकोली उड्डाणपूल यांसह अनेक मोठे प्रकल्प मार्गी लागले आहेत. यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होत असून, नागरिकांच्या प्रवासात मोठ्या प्रमाणावर सुलभता निर्माण झाली आहे.

नवीन उन्नत मार्गाची वैशिष्ट्ये

ठाकुर्ली लेव्हल क्रॉसिंग ते मानपाडा चौकादरम्यान उन्नत मार्ग (फ्लायओव्हर) आणि १५ मीटर रुंद जोडरस्ते विकसित केले जातील. परिसरातील वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेला वाहतूक ताण, वारंवार होणारा विलंब आणि अपघाताचा धोका कमी करण्यासाठी हा प्रकल्प निर्णायक ठरणार आहे. ठाकुर्ली, मानपाडा, डोंबिवली परिसरातील नागरिकांना अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ वाहतूक मिळण्यास मोठी मदत होईल.

Pandharpur Local Body Election: मंगळवेढा नगरपालिकेत सोमनाथ आवताडे बिनविरोध विजयी; प्रभाग ३ मध्ये भाजपचे खाते उघडले

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

उन्नत मार्ग:

लांबी – 360 मीटर

रुंदी – 7.5 मीटर

जोडरस्ता:

लांबी – 1050 मीटर

रुंदी – 7.5 / 8.5 मीटर

प्रकल्पाचे फायदे

  • वाहतुकीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार
  • प्रवासातील वेळेची बचत
  • वाहतूक कोंडी व विलंब कमी होणार

स्थलांतर व पुनर्वसन

या प्रकल्पामध्ये काही घरांचे तोडकाम आवश्यक असून, संबंधित बाधित कुटुंबांचे बीएसयुपी योजनेअंतर्गत योग्य पुनर्वसन केले जाणार आहे. या प्रक्रियेला आधीच गती देण्यात आली आहे.

Web Title: Shrikant shinde thakurli railway gate to mhasoba chowk elevated road will be constructed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 08:49 PM

Topics:  

  • kalyan
  • kalyan dombivali news
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

उल्हासनगरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतून ३५७८ परवडणारी घरे; ७२३ कोटींच्या गृहनिर्माण महाप्रकल्पाला हिरवा कंदील
1

उल्हासनगरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतून ३५७८ परवडणारी घरे; ७२३ कोटींच्या गृहनिर्माण महाप्रकल्पाला हिरवा कंदील

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक
2

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

KDMC News : कल्याणमधील ‘या’ भागात रस्ते आणि नाल्यांची दुरावस्था, नागरीकांनी समस्या मांडताच माजी नगरसेवकांनी केला पाहणी
3

KDMC News : कल्याणमधील ‘या’ भागात रस्ते आणि नाल्यांची दुरावस्था, नागरीकांनी समस्या मांडताच माजी नगरसेवकांनी केला पाहणी

शिवसैनिकांनो गाफील राहू नका, 128 जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी करा; खासदार बारणे यांच्या सूचना
4

शिवसैनिकांनो गाफील राहू नका, 128 जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी करा; खासदार बारणे यांच्या सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.