Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dagdusheth Halwai Visarjan Miravnuk : ही शान कोणाची… श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाप्पाची! श्री गणनायक रथातून थाटात निघणार बाप्पा!

Dagdusheth Halwai Visarjan Miravnuk : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा हा अत्यंत लोकप्रिय आहे. दगडूशेठ बाप्पाची विसर्जन मिरवणूक देखील लोकप्रिय असून यंदा श्री गणनायक रथातून बाप्पाची मिरवणूक निघणार आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 04, 2025 | 06:52 PM
Shrimant Dagdusheth Halwai Visarjan Miravnuk 2025 in Sri Gananyaka Rath pune news

Shrimant Dagdusheth Halwai Visarjan Miravnuk 2025 in Sri Gananyaka Rath pune news

Follow Us
Close
Follow Us:

Dagdusheth Halwai Visarjan Miravnuk : पुणे : पुण्यातील गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणूक ही अत्यंत लोकप्रिय असून लाखो भाविक हा सोहळा पाहण्यासाठी येत असतात. अगदी परदेशी पाहुणे देखील हा उत्सव पाहण्यासाठी पुण्यामध्ये दाखल होतात. मानांच्या पाच गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक ही नेहमी चर्चेचा विषय ठरत असते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने उत्सवाच्या १३३ वे वर्षे आहे. यानिमित्ताने गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक मोठ्या उत्साहात काढली जाणार आहे. अनंत चतुर्दशीला शनिवार, दिनांक ६ सप्टेंबर रोजी थाटात दगडूशेठ बाप्पा निघणार आहे. यंदा श्री गणनायक रथामध्ये दगडूशेठ चे गणपती बाप्पा विराजमान होणार असून आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली.

सलग तिसऱ्या वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दुपारी ४ वाजता बेलबाग चौकातून मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे. यंदाची प्रतिकृती असलेल्या केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराच्या विषयाप्रमाणे सांगता मिरवणूक रथाची मांडणी करण्यात आली आहे. दक्षिण भारतीय शैलीतील रथाची निर्मिती करण्यात आली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

दक्षिण भारतात जसा लाकडाचा रथ साकारला जातो, तसा हा रथ तयार करण्यात आला आहे. रथावर ज्याप्रमाणे सप्तरंगांची उधळण केली जाते, तशीच इथेही करण्यात आली आहे. श्री पद्मनाभ स्वामी हे श्री विष्णूंचे मंदिर असल्यामुळे रथावर ४ गरुडमूर्ती लावण्यात आल्या आहेत. त्यापैकी २ मूर्ती ६ फूट उंचीच्या तर २ मूर्ती ३ फूट उंचीच्या आहेत. रथाचा आकार १६ बाय १६ फूट असून उंची २४ फूट इतकी आहे. रथावर झुंबरे, एलईडी व पार लाईटचे फोकस लावण्यात येणार आहेत. कलादिग्दर्शक विनायक रासकर यांनी हा रथ साकारला आहे.: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३३ व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाच्या सांगता मिरवणुकीकरीता श्री गणनायक रथाची अंतिम टप्प्यात तयारी सुरु आहे.

सांगता मिरवणुकीबाबत माहिती देताना सुनील रासने म्हणाले, “मिरवणुकीत मानवसेवा रथ व त्यामध्ये सनई-चौघडा अग्रभागी असणार आहे. मिरवणुकीत स्वरूपवर्धिनीचे पथक, केरळचे चेंदा मेलम पथक असा लवाजमा असेल. तसेच पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त देखील मोठया संख्येने सहभागी होणार आहेत.” अशी माहिती सुनील रासने यांनी दिली.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

भाऊसाहेब रंगारी ‘श्री गणेश रत्न रथातून होणार सहभागी

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक आकर्षक पद्धतीने सजवलेल्या ‘श्री गणेश रत्न रथा’मधून निघणार आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजता टिळक पुतळा येथून या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी दिली.पुनीत बालन म्हणाले, ‘‘दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पाची विसर्जन मिरवणूक लक्षवेधक अशीच असेल. पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या हस्ते सकाळी साडेसात वाजता अनंत चतुर्दशीची पूजा संपन्न होईल. त्यानंतर आठ वाजता रत्न महालातून निघून बाप्पाचा ‘श्री गणेश रत्न रथ’ विसर्जन मिरवणुकीसाठी मंडईतील टिळक पुतळ्याकडे मार्गस्थ होईल. टिळक पुतळा येथे प्रथा परंपरेनुसार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टकडून मानाच्या पाचही गणपतींना पुष्पहार घातला जाईल.

Web Title: Shrimant dagdusheth halwai visarjan miravnuk 2025 in sri gananyaka rath pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 06:52 PM

Topics:  

  • dagdusheth halwai
  • Ganesh Chaturthi 2025
  • pune news

संबंधित बातम्या

‘अतिवेग, हेल्मेट अन्…’; भारतात दरवर्षी अपघातांमध्ये ‘इतक्या’ जणांचा मृत्यू; काय सांगतो UNICEF चा अहवाल?
1

‘अतिवेग, हेल्मेट अन्…’; भारतात दरवर्षी अपघातांमध्ये ‘इतक्या’ जणांचा मृत्यू; काय सांगतो UNICEF चा अहवाल?

खरंच फेरीवाले आत्मनिर्भर होणार? नऊ महिने बंद असलेली स्वनिधी योजना सुरू; बँकांकडून योग्य प्रतिसाद नाही
2

खरंच फेरीवाले आत्मनिर्भर होणार? नऊ महिने बंद असलेली स्वनिधी योजना सुरू; बँकांकडून योग्य प्रतिसाद नाही

Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया
3

Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

मुलांना तंत्रज्ञानाचे ‘गुलाम’ बनू न देता, त्याचा ‘मालक’ बनायला शिकवा; शिक्षक अमोल हंकारे यांचा मोलाचा सल्ला
4

मुलांना तंत्रज्ञानाचे ‘गुलाम’ बनू न देता, त्याचा ‘मालक’ बनायला शिकवा; शिक्षक अमोल हंकारे यांचा मोलाचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.