Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील धरणांमध्ये साचलेला गाळ काढल्यास पूरपरिस्थिती नियंत्रणात येईल – शशिकांत शिंदे

ढगफुटी आता सर्रास व्हायला लागली आहे. त्यामुळे मदत करण्यासाठी एका दिवसाचा अतिवृष्टीचा निकष लागू होत नाही. त्यामुळे ढगफुटीसंदर्भात निकष बदलले गेले पाहीजेत, असेही आमदार शशिकांत शिंदे म्हणाले.

  • By Vivek Bhor
Updated On: Aug 22, 2022 | 10:34 PM
राज्यातील धरणांमध्ये साचलेला गाळ काढल्यास पूरपरिस्थिती नियंत्रणात येईल – शशिकांत शिंदे
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यातील (Maharashtra State) अनेक धरणांमध्ये (Dams) गाळ (silt) साचलेला आहे. कोयनासारखी (Koyna) अनेक धरणे आहेत जी ऑगस्टमध्येच भरायला लागली आहेत. धरणांचा पाणीसाठा कमी होतोय, धरणात गाळ असल्यामुळे पुढील वर्षी मार्चमध्येच दुष्काळाची (drought) समस्या जाणवू शकेल. धरणांमधील गाळ कमी केला तर अतिवृष्टीनंतरची पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही. हा विषय सरकारने गांभीर्याने घ्यावा अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी केली (mla shashikant shinde demanded that the government should take this issue seriously).

ढगफुटी आता सर्रास व्हायला लागली आहे. त्यामुळे मदत करण्यासाठी एका दिवसाचा अतिवृष्टीचा निकष लागू होत नाही. त्यामुळे ढगफुटीसंदर्भात निकष बदलले गेले पाहीजेत, असेही आमदार शशिकांत शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी दहीहंडी उत्सवाला ऑलिम्पिकमध्ये नेऊ, गोविंदांना शासकीय नोकरीत आरक्षण देऊ. उल्हासनगरमध्ये एका मद्यपीने दोरखंडावरुन हंडी फोडली. पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपीने कोर्टात सांगितले की शासकीय नोकरी मिळावी म्हणून त्याने असे कृत्य केले. आता शासकीय नोकरी कोणत्या थराला द्यायची, हे अजून ठरायचं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये निर्णय जाहीर करण्याची स्पर्धा लागलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी देखील सरकारने चढाओढ करावी, असा टोला आमदार शशिकांत शिंदे यांनी लगावला.

केंद्राने इतर राज्यांना मदत केली आहे. पण मागील महाविकास आघाडी सरकार त्यांच्या विचारांचे नसल्यामुळे दुजाभाव दाखवला गेला असेल. पण आता ईडीच्या माध्यमातून का असेना नवीन सरकार आणले आहे. त्यामुळे केंद्रातून आता महाराष्ट्रासाठी जास्तीत जास्त मदत आणणे आवश्यक आहे. यावेळी महाराष्ट्राबाबत दुजाभाव केला जाऊ नये, अशी अपेक्षाही आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली.

Web Title: Silt accumulated in the dams in the state is removed the flood situation will be under control mla shashikant shinde nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2022 | 10:34 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly Session
  • MLA Shashikant Shinde

संबंधित बातम्या

महाराष्ट्र विधीमंडळाच्या मर्यादांचे वारंवार होतंय उल्लंघन! कधी फ्री स्टाईल मारहाण तर कधी हनी ट्रपचे आरोपसत्र
1

महाराष्ट्र विधीमंडळाच्या मर्यादांचे वारंवार होतंय उल्लंघन! कधी फ्री स्टाईल मारहाण तर कधी हनी ट्रपचे आरोपसत्र

Opposition Leader : विधानसभेमध्ये विरोधकांना राहिला नाही आवाज? यंदाचे पावसाळी अधिवेशनही विरोधी पक्षनेत्यांशिवाय
2

Opposition Leader : विधानसभेमध्ये विरोधकांना राहिला नाही आवाज? यंदाचे पावसाळी अधिवेशनही विरोधी पक्षनेत्यांशिवाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.