raksha bandhan
मुंबई – ‘श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे…, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे’ सध्या श्रावण महिना सुरु आहे. या महिन्यापासून हिंदूंच्या सणांना सुरुवात होते. या महिन्याच्या शेवटी सण म्हणजे उद्या बहिण-भावाच्या अतुट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन…(Raksha Bandhan 2023) या सणानिमित्त बाजारपेठा सजल्या आहेत. मात्र यंदा रक्षाबंधनाच्या वेळेबाबत लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कारण कोणत्या मुहूर्तावर हा सण साजरा करायचा, याबाबत लोकांच्या मनात गोंधळ आहे. (Since tomorrow is Bhadrakal, what time should Raksha Bandhan be celebrated? Is this the right time?)
सुपर-ब्ल्यू चंद्राचे दर्शन होणार
उद्या सायंकाळी ६:४० वा. चंद्र पूर्वेला उगवेल. उत्तररात्री ५:१९ वा. पश्चिमेला मावळेल. तसेच, चंद्र पृथ्वीच्या जवळ ३ लक्ष ५७ हजार १८२ किलोमीटर अंतरावर येणार आहे. आकाश निरभ्र असेल, तर बुधवारी ३० ऑगस्ट रोजी रात्रभर आकाशात सुपर ब्ल्यूमूनचे साध्या डोळ्यांनी दर्शन घेता येणार आहे. ज्या इंग्रजी महिन्यात दोन पौर्णिमा येतात, त्या दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्रास ‘ब्ल्यू मून’ म्हणतात, असे त्यांनी सांगितले. बुधवार ३० ऑगस्ट रोजी रात्री आपणास सुपर-ब्ल्यू मूनचे दर्शन होणार आहे.
दिवसभर सण साजरा करता येणार
दरम्यान, उद्या भद्राकाळ आहे. त्यामुळे रक्षाबंधन नेमके किती वाजता करायचे याबाबत लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. कोणी बुधवारी सकाळी 10 च्या अगोदर राखीचा सण साजरा करण्याबद्दल बोलत आहेत, तर काही लोक रात्री 9 नंतर रक्षाबंधन साजरे करणार आहे अशी चर्चा आहे. मात्र उद्या दिवसभर हा सण साजरा करता येणार आहे. दरम्यान, बुधवारी आपल्याला सुपर-ब्लूमूनचे दर्शन होणार आहे. यानंतर पुढच्या वर्षी २०२४ मध्ये १८ सप्टेंबरला सुपर मूनचे दर्शन होणार आहे, असे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले आहे.