मुंबई – महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने शुक्रवारी काढली आहे. मात्र त्याचवेळी मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा मात्र वाढवण्यात आली आहे. त्याशिवाय जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षाही ‘जैसे थे’ ठेवण्यात आली आहे. महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा काढत शिंदे सरकारनं विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. यानंतर विरोधकांच्या प्रतिक्रिया येणं क्रमप्राप्त आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांची देखील सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. यावर या दोघांच्याही प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. दरम्यान, सुरक्षा काढून घेतल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
[read_also content=”राज्यातील प्रकल्प बाहेर जाणं हे दुर्दैव, सॅफ्रन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारवर घणाघात https://www.navarashtra.com/maharashtra/chhagan-bhujbal-reaction-about-removing-police-security-nrsr-340055.html”]
मविआमधील बड्या नेत्यांचा सुरक्षा शिंदे-फडणवीस सरकारने काढून घेतल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. महाविकास आघाडीमधील या नेत्यांची काढली सुरक्षा यंत्रणा मागील काही दिवसांपूर्वी ठाण्याचे ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या सुरक्षेयंत्रनेत कपात केली होती. त्यांतर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची सुरक्षा देखील कपात केली होती. खासदार विनायक राऊत यांच्या सुरक्षेत सुद्धा कपात करण्यात आली होती, त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने मविआमधील नेत्यांना धक्का देत अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. दरम्यान, शुक्रवारी आणि एक धक्का देत खालील नेत्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली.
महाविकास आघाडीमधील ‘या नेत्यांची’ काढली सुरक्षा यंत्रणा
छगन भुजबळ, नितीन राऊत, नाना पटोले, जयंत पाटील, सतेज पाटील, संजय राऊत, बाळासाहेब थोरात, वरुण सरदेसाई, धनंजय मुंडे, भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार, नवाब मलिक, नरहरी झिरवळ, सुनील केदार व डेलकर परिवार दरम्यान, यानंतर मविआ नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. जे लोक समाजकारणात आणि राजकारणात पुढे येऊन काम करत असतात अशा लोकांना पोलीस सुरक्षा (Police Security) दिली जाते. अचानक त्यांची सुरक्षा काढणे योग्य नाही, असे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सुचविले आहे. सुरक्षा काढली याबाबत काहीही बोलणार नाही, आरोप करणार नाही, मात्र गृहमंत्री असताना हल्ला झाला, त्यावेळी अनेक अडचणी आल्या, त्यामुळे ज्यांची ज्यांची सुरक्षा काढली त्याबाबत पुनर्विचार करणं आवश्यक आहे, असं भुजबळ (Chhagan Bhujbal On Police Security) यांनी सांगितलं आहे. तर कुणाला सुरक्षा देणं, न देणं ही जबाबदारी सरकारची आहे. कोणताही अनुचित घटना घडू नये याची काळजी सरकारने घ्यावी. सरकारने आमची सुरक्षा कमी केली, त्याला विरोध करण्याचं आमचं कारण नाही. सरकारला वाटतेय की आम्हाला सुरक्षा द्यायची गरज नाही, तर आम्हाला काहीही अडचण नाही. असं नाना पटोले म्हणाले.