Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sindhudurg News: सिंधुदुर्ग आरोग्य यंत्रणेत खळबळ! गर्भवती समजून उपचार मात्र पोटात निघाला ट्यूमर

सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे चुकीच्या निदानामुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. एका गर्भवती महिला म्हणून दाखल झालेलया एका महिलेच्या पोटात चक्क ट्युमर आढळले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 15, 2026 | 09:53 PM
सिंधुदुर्ग आरोग्य यंत्रणेत खळबळ! गर्भवती समजून उपचार मात्र पोटात निघाला ट्यूमर

सिंधुदुर्ग आरोग्य यंत्रणेत खळबळ! गर्भवती समजून उपचार मात्र पोटात निघाला ट्यूमर

Follow Us
Close
Follow Us:
  • सिंधुदुर्गातील वैद्यकीय आरोग्ययंत्रणेचे तीन तेरा वाजले
  • गर्भवती महिला म्हणून दाखल झालेल्या महिलेच्या पोटात चक्क ट्युमर
  • जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
संजय वालावलकर/ सिंधुदुर्ग: गर्भवती असल्याचे निदान करून दाखल करण्यात आलेल्या एका महिलाच्या पोटात प्रत्यक्षात बाळ नसून ट्यूमर असल्याचे उघड झाल्याने सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य यंत्रणेची गंभीर चूक समोर आली आहे. शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चुकीच्या निदानामुळे आरोग्य व्यवस्थेत एकच खळबळ उडाली आहे.

सदर महिला सिंधुदुर्ग रेल्वे स्थानक परिसरातून सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आली होती. येथे कार्यरत एका डॉक्टरांनी महिलेला गर्भवती असल्याचे निदान करून तातडीच्या उपचारासाठी तिला गोवा येथील बांबोळी मेडिकल कॉलेज येथे रेफर केले. मात्र, गोवा बांबोळी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर तिच्या पोटात बाळ नसून मोठा ट्यूमर असल्याचे स्पष्ट केले. या घटनेनंतर सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आरोग्य सेवांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Kolhapur Election Exit Polls: कोल्हापुरात भाजपच बॉस? एक्झिट पोलने उडवली सर्वांची झोप

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून अपघातग्रस्त रुग्ण असो वा गंभीर आजाराचे रुग्ण, मोठ्या प्रमाणावर गोवा बांबोळी येथे रेफर केले जात असल्याचे चित्र सातत्याने दिसून येत आहे. तज्ञ डॉक्टरांची कमतरता, अपुरी वैद्यकीय सुविधा, शिकाऊ डॉक्टरांवर अवलंबून असलेले उपचार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून रुग्णांकडे होणारे दुर्लक्ष, याबाबत रुग्णांच्या नातेवाईकांकडून सातत्याने तक्रारी केल्या जात आहेत.

कोणताही आजार असो, योग्य तपासणी आणि तज्ञ उपचारांची सुविधा नसल्यामुळे अनेक रुग्णांना महिनोन्‌महिने रुग्णालयात ठेवले जाते, मात्र त्यांची दखल घेतली जात नाही, असा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. या सततच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर, गर्भवती समजून उपचारासाठी पाठवण्यात आलेल्या महिलेच्या पोटात चक्क ट्यूमर आढळल्याची घटना आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणाचे गंभीर उदाहरण ठरत आहे.

PUNE NEWS : पुण्यातील दोघा भावांचे ‘लाठी-काठी’ पारंपरिक खेळात यश! नोंदवला खास वर्ल्ड रेकॉर्ड

या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, तसेच सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य सेवा तात्काळ सुधारण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: Sindhudurg government medical college tumor found in pregnant woman stomach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 09:53 PM

Topics:  

  • Pregnant woman
  • Sindhudurg
  • Sindhudurg News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.