(कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक )
कोल्हापुरात महायुतीची सत्ता येण्याचा अंदाज
आज 29 महानगरपालिकांसाठी पार पडले मतदान
एक्झिट पोलची आकडेवारी आली समोर
Kolahpur Election 2026: राज्यात आज 29 महानगरपालिकांसाठी मतदान पार पडले. राज्यात सर्वत्रच मतदानाची टक्केवारी घसरली असल्याचे दिसून आले आहे. मतदान करण्याचे आवाहन राजकीय पक्ष, महानगरपालिका प्रशासन यांच्याकडून करण्यात आले होते. दरम्यान मतदान झाल्यावर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. त्यानुसार कोल्हापुरात देखील कोणाची सत्ता येणार यांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, कोल्हापुरात कोणाची सत्ता येणार याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोल्हापुरात भाजप आणि शिवसेनेची सत्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार कोल्हापूर शहरात भाजप मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेना दुसऱ्या नंबरचा पक्ष ठरताना दिसून येत आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेत भाजपला 29 न ते 32 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 18 ते 21 जागा मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला 9 ते 11 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर कॉँग्रेसला 20 ते 23 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर शरद पवार यांच्या पक्षाला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. मनसेला 1 आणि ठाकरे गटाला 3 ते 4 जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
PMC Exit Polls 2026: पुणे ‘दादा’मुक्त होणार? ‘पुण्यनगरीत पुन्हा भाजपची सत्ता येण्याचा अंदाज
पुणेकर ‘दादां’ना फ्री करणार?
पुणे महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. प्रचार सभेत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रचारात रंगत आणली. नागरिकांना आश्वासने दिली गेली. मात्र आज मतदान झालयावर एक्झिट पोलनुसार पुणे शहरात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येताना दिसत आहे. तर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षांना मोठा धक्का बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
‘जनमत’च्या एक्झिट पोलनुसार पुण्यात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येण्याचा अंदाज आहे. तर अजित पवार आणि शरद पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पुणे शहरात भाजपला 90 ते 93 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर शिवसेनेला 6 जागा मिळण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
एक्झिट पोलनुसार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला 43 जागा तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला 8 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवारांनी दिलेली फ्री मेट्रोची घोषणा फारशी काम करताना दिसून येत नाहीये. मात्र एक्झिट पोलचे हे आकडे केवळ अंदाज आहेत. खरे निकाल उद्याच जाहीर होणार आहेत.






