
अटकेची कारवाई करण्याची मागणी
डॉक्टरांचे जिल्हाधिकाज्यांना निवेदन
पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप
सिंधुदुर्ग: कणकवली येथील नागवेकर यांच्या दवाखान्यामध्ये घडलेली घटना ही निंदनीय असून या घटनेची पोलिसांकडून योग्य ती चौकशी होताना दिसत नाही. तसेच आवश्यक ते कलम लावले गेले नाहीत. मांडवली करायला आलेल्या त्या व्यक्तीवर अटकेची कारवाई झाली नाही. या दृष्टीने आपण पोलीस आणि सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन म्हणून योग्य ती दखल घेऊन गुन्ह्यात समाविष्ट असलेल्या संबंधितांना अटक करून तत्काळ कारवाई करा. या घटनेची योग्य ती चौकशी करा महिला डॉक्टरांना सुरक्षा दृष्टीने डॉक्टर अॅक्ट चा वापर करा, अशा विविध मागण्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडत या घटनेच्या दृष्टीने येत्या २४ तासात योग्य ती दखल न घेतल्यास आम्हाला हा बंद कायम ठेवावा लागेल, वेळ पडल्यास महिला डॉक्टरांना उपोषणासही बसावे लागेल असा इशारा डॉक्टर संघटनेच्यावतीने दिला आहे. यावेळी जिल्ह्यातील तज्ञ डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉक्टर कायद्याची योग्य ती अमलबजावणी व्हावी..
कणकवली येथे नागवेकर दवाखान्यामध्ये घडलेल्या या घटनेच्या पाश्र्वभूमीवर रुग्णालयाची झालेली तोडफोड आणि जिल्ह्यातील अनेक डॉक्टराच्या दवाखान्याच्या दृष्टीने चाललेली चर्चा याबाबत सविस्तर माहिती देत जिल्हाधिकाऱ्याना या घटनेची गंभीर दखल घ्या, असे म्हणत संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
Sindhudurg : खाजगी रुग्णालये बंद, कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी
योग्य कारवाई करणार : जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन
वेळ पडल्यास महिला डॉक्टरांना मिळालेली वागणूक आणि जमावाकडून नागवेकर दवाखान्यात महिला डॉक्टरांसोबत झालेला प्रकार या दृष्टीने आम्हाला उपोषण करावे लागेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या घटनेव्या दृष्टीने योग्य ती कारवाई करा, असे निवेदन डॉक्टर असोसिएशनच्या वतीने व महिला डॉक्टर यांच्या वतीने जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांना सादर केले. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यानी पोलिस अधीक्षक मोहन दहीकर यांच्याशी काही चचाँ झाली असून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन यावेळी दिले.
पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप
या घटनेत पोलिसांनी बघायची भूमिका घेतली असून योग्य ती कारवाई झाली नाही, यामागे कोणाचा हात असावा का? अशी शंकाही जयेंद्र परुळेकर व अन्य डॉक्टर यांनी व्यक्त करत, यावेळी पोलिसांनी हवेत फायरिंग का केली नाही?, असा सवाल उपस्थित केला. याबाबत येत्या २४ तासांत योग्य ती कारवाई करून संबंधितांना अटक न झाल्यास आम्हा जिल्ह्यातील डॉक्टरांना हा बंद कायम ठेवावा लागेल.