Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बोगस बियाणेप्रकरणी एसआयटी गठित! शेतकऱ्यांच्या न्यायासाठी निर्णायक पाऊल; नुकसानीची होणार आता सखोल चौकशी

यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सोयाबीनच्या बोगस बियाण्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात चर्चेत आला. अनेक भागांमध्ये बियाण्यांची अपेक्षित उगवण न झाल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा आर्थिक फटका सहन करावा लागला. या प्रकाराविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलने, मोर्चे व निवेदने देऊन दोषींवर कारवाईची मागणी केली.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 08, 2026 | 11:06 AM
बोगस बियाणेप्रकरणी एसआयटी गठित! शेतकऱ्यांच्या न्यायासाठी निर्णायक पाऊल; नुकसानीची होणार आता सखोल चौकशी

बोगस बियाणेप्रकरणी एसआयटी गठित! शेतकऱ्यांच्या न्यायासाठी निर्णायक पाऊल; नुकसानीची होणार आता सखोल चौकशी

Follow Us
Follow Us:

अकोला जिल्ह्यात बोगस बियाणे अधिनियमान्वये दाखल झालेल्या गुन्ह्यांचा सखोल व योग्य पद्धतीने तपास करण्यासाठी पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशाने शुक्रवारी विशेष तपास पथक (एसआयटी) गठित करण्यात आले. या तपास पथकाच्या प्रमुखपदी अपर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पथकामध्ये सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी, अकोट उपविभागीय पोलिस अधिकारी, शहर विभाग अकोला, परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक आनंद कांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रभारी अधिकारी आर्थिक गुन्हे शाखा अकोला, आर्थिक गुन्हे शाखेतील दुय्यम अधिकारी तसेच संबंधित गुन्ह्यांचे तपास अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.(फोटो सौजन्य – istock)

नदी पोखरणारे रेतीमाफिया आता रडारवर! रॉयल्टीच्या दहापट दंडाची कारवाई; अवैध उत्खननाला शासनाचा दणका

जिल्ह्यातील एमआयडीसी, कोतवाली, रामदासपेठ, तेल्हारा, अकोट शहर, मूर्तिजापूर शहर, बार्शीटाकळी,बाळापूर आणि पातूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत जुलै महिन्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) तसेच बियाणे अधिनियम व जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत एकूण १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे मोठ्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित असून, त्यामध्ये अनेक स्तरांवरील साखळीचा समावेश असल्याने शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने हे प्रकरण अत्यंत संवेदनशील मानले जात आहे. त्यामुळे बोगस बियाणे निर्मिती, विक्री व पुरवठा करणाऱ्या संपूर्ण यंत्रणेचा शोध घेऊन विहित मुदतीत तपास पूर्ण करण्याचे निर्देश एसआयटीला देण्यात अहवाल वेळोवेळी पोलिस अधीक्षक कार्यालयास सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, तपासात कोणताही हलगर्जीपणा होणार नाही, याचीही स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.

यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सोयाबीनच्या बोगस बियाण्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात चर्चेत आला. अनेक भागांमध्ये बियाण्यांची अपेक्षित उगवण न झाल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा आर्थिक फटका सहन करावा लागला. या प्रकाराविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलने, मोर्चे व निवेदने देऊन दोषींवर कारवाईची मागणी केली होती. यानंतर कृषी विभागाने पुढाकार घेत जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये बियाणे कंपन्यांविरुद्ध १३ तक्रारी दाखल केल्या. आता या तक्रारींच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

Yavatmal New: शहरात नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा! प्रशासनाचे दुर्लक्ष; पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात

अकोला जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, पातूर, तेल्हारा, मूर्तिजापूर आणि अकोट तालुक्यांमध्ये आतापर्यंत ११ सोयाबीन बियाणे कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये ओसवाल सीड्स, विगर सीड्स, ईगल सीड्स, अॅश्युअर सीड्स, इनोव्हेज (पार्श्व जेनेटिक) सीड्स, ग्रीन गोल्ड सीड्स, दफ्तरी सीड्स, अंकुर सीड्स आणि बाफना सीड्स यांसह इतर कंपन्यांचा समावेश आहे. एसआयटीच्या तपासातून बोगस बियाण्याची निर्मिती, पुरवठा आणि विक्री करणाऱ्या संपूर्ण साखळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बोगस बियाणेप्रकरणी एसआयटी का गठित करण्यात आली आहे?

    Ans: बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि त्यामागील जबाबदार व्यक्ती किंवा यंत्रणेची चौकशी करण्यासाठी एसआयटी गठित करण्यात आली आहे.

  • Que: एसआयटीकडून कोणत्या बाबींची चौकशी केली जाणार आहे?

    Ans: बियाण्यांची गुणवत्ता, त्यांची विक्री व वितरण प्रक्रिया, संबंधित कंपन्या किंवा विक्रेते आणि शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या कारणांची सखोल चौकशी केली जाऊ शकते.

  • Que: बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे कोणते नुकसान होऊ शकते?

    Ans: बियाण्यांची उगवण क्षमता कमी असल्यास किंवा बियाणे निकृष्ट असल्यास पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू शकतो.

Web Title: Sit formed to probe bogus seeds case decisive step towards justice for farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 11:06 AM

Topics:  

  • Agricultural Crops
  • Seeds
  • Yavatmal

संबंधित बातम्या

नदी पोखरणारे रेतीमाफिया आता रडारवर! रॉयल्टीच्या दहापट दंडाची कारवाई; अवैध उत्खननाला शासनाचा दणका
1

नदी पोखरणारे रेतीमाफिया आता रडारवर! रॉयल्टीच्या दहापट दंडाची कारवाई; अवैध उत्खननाला शासनाचा दणका

Yavatmal New: थकबाकीच्या बोझ्यात शहराचा विकास! नगर परिषद-एमजेपीच्या आर्थिक कोंडीत शहराचे रस्त्यांची दुरवस्था
2

Yavatmal New: थकबाकीच्या बोझ्यात शहराचा विकास! नगर परिषद-एमजेपीच्या आर्थिक कोंडीत शहराचे रस्त्यांची दुरवस्था

Yavatmal New: शहरात नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा! प्रशासनाचे दुर्लक्ष; पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात
3

Yavatmal New: शहरात नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा! प्रशासनाचे दुर्लक्ष; पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात

Yavatmal News: निधीअभावी आशांच्या प्रशिक्षणाला ग्रहण! आरोग्य विभागावर होणार परिणाम; ३५४ नियुक्त महिला प्रशिक्षणाविना
4

Yavatmal News: निधीअभावी आशांच्या प्रशिक्षणाला ग्रहण! आरोग्य विभागावर होणार परिणाम; ३५४ नियुक्त महिला प्रशिक्षणाविना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.