Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Smart Meterवरून करवडी ग्रामस्थ आक्रमक; वीज कार्यालयात चार तास ठिय्या

Satara News : ओगलेवाडी येथील वीज वितरण कार्यालयावर ठिय्या आंदोलन छेडले. तब्बल चार तास चाललेल्या या आंदोलनामुळे कार्यालयाचे कामकाज विस्कळीत झाले होते.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 16, 2026 | 12:00 PM
Sit-in Protest at Oglewadi Power Distribution Office Over Smart Meters Satara News

Sit-in Protest at Oglewadi Power Distribution Office Over Smart Meters Satara News

Follow Us
Follow Us:
  • ओगलेवाडी येथील वीज वितरण कार्यालयावर ठिय्या
  • सहमतीशिवाय २०० मीटर बसवण्याचा आरोप
  • चौकशी व कारवाईचे लेखी आश्वासन
Satara News : कराड : स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत करवडी (ता. कराड) येथील ग्रामस्थांनी बुधवारी ओगलेवाडी येथील वीज वितरण कार्यालयावर ठिय्या आंदोलन छेडले. तब्बल चार तास चाललेल्या या आंदोलनामुळे कार्यालयाचे कामकाज विस्कळीत झाले होते.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, वीज वितरण कंपनीकडून कोणतीही पूर्वसूचना किंवा ग्राहकांची सहमती न घेता सुमारे २०० घरांमध्ये जुन्या मीटरऐवजी स्मार्ट मीटर बसवण्यात आले. या मनमानी कारभाराविरोधात संतप्त झालेल्या नागरिकांनी एकत्र येत कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ठिय्या देत जोरदार निदर्शने केली.

हे देखील वाचा : कोरेगावात शंभूराज देसाईंची ‘चाल’ सुरु; महेश शिंदेंसमोर पर्याय उभा करण्याची रणनिती तापली

स्मार्ट मीटरच्या विरोधात तालुक्यात आधीच असंतोष असताना करवडीतील ही घटना अधिकच चिघळली. काही ठिकाणी घरात कोणी नसताना परप्रांतीय कामगार येऊन मीटर बसवून जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. नादुरुस्त मीटरच्या नावाखाली सरसकट बदल करण्याचा प्रकार सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आंदोलनावेळी हिंदकेसरी संतोष वेताळ, सीमा घार्गे, शिवाजी चव्हाण, तुकाराम नलवडे, अमित डुबल यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी सहमतीशिवाय बसवलेले स्मार्ट मीटर तात्काळ काढून जुने मीटरच पुन्हा बसवावेत, अशी ठाम मागणी केली.

हे देखील वाचा :  बाबो! अक्षय्य तृतीयेपूर्वी सोने- चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ, ग्राहकांमध्ये खळबळ, काय आहेत आताचे दर?

दरम्यान, कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी आंदोलनस्थळी येऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, तसेच यापुढे ग्राहकांची संमती घेतल्याशिवाय स्मार्ट मीटर बसवले जाणार नाहीत, असे लेखी आश्वासन त्यांनी दिले. या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. मात्र, भविष्यात पुन्हा अशीच मनमानी झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Web Title: Sit in protest at oglewadi power distribution office over smart meters satara news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Satara News
  • smart meter

संबंधित बातम्या

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन
1

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन

Jalgaon News: जळगाव ZPमध्ये खळबळ! 71 कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व संशयास्पद, नोकरीवर टागंती तलवार
2

Jalgaon News: जळगाव ZPमध्ये खळबळ! 71 कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व संशयास्पद, नोकरीवर टागंती तलवार

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले
3

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी
4

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.