Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्टरोड की डंपिंग ग्राउंड? स्मार्टरोडचा बकालपणा ७ दिवसांत दूर करा, शिवसेनेचे आंदोलनाचा इशारा

कल्याणमध्ये मोठा गाजावाजा करत बांधण्यात येत असलेल्या कल्याण पश्चिमेतील स्मार्टरोड हा बकालपणाचा अड्डा झाला आहे. मुंबईतील मरीन ड्राईव्ह आणि नवी मुंबईतील पाम बीच रोडच्या धर्तीवर कल्याणातही एक सुंदर असा रस्ता असावा या दृष्टीकोनातून या स्मार्ट रोडला मंजुरी देण्यात आली होती. परंतु या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 25, 2024 | 04:17 PM
स्मार्टरोड की डंपिंग ग्राउंड? स्मार्टरोडचा बकालपणा ७ दिवसांत दूर करा, शिवसेनेचे आंदोलनाचा इशारा
Follow Us
Follow Us:

कल्याण : केडीएमसी प्रशासनाने आपल्या अब्रूचे धिंडवडे काढण्याचा चंग बांधला आहे की काय? असा प्रश्न निर्माण व्हावा असा संतप्त प्रकार समोर आला आहे. मोठा गाजावाजा करत बांधण्यात येत असलेल्या कल्याण पश्चिमेतील स्मार्टरोड हा बकालपणाचा अड्डा झाला असून हा बकालपणा ७ दिवसांत दूर करा अन्यथा शिवसेनास्टाईल आंदोलन करून हा रस्ता बंद करू आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी केडीएमसी प्रशासनाची असेल असा इशारा माजी सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी दिला आहे.

मुंबईतील मरीन ड्राईव्ह आणि नवी मुंबईतील पाम बीच रोडच्या धर्तीवर कल्याणातही एक सुंदर असा रस्ता असावा या दृष्टीकोनातून या स्मार्ट रोडला मंजुरी देण्यात आली. थोडेथोडके नव्हे तर तब्बल 60 कोटी रुपये खर्च करून कल्याण पश्चिमेच्या रौनक सिटी येथील रिंग रोड ते माधव संकल्प पर्यंत हा स्मार्ट रोड उभारण्यात येत आहे. या रस्त्याचे बहुतांशी काम पूर्ण झाले असून याठिकाणी आता आवश्यक सोयी सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. ज्यामध्ये सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, ई व्ही गाड्या चार्जर आदी सुविधांचा समावेश आहे.

यापैकी सायकल आणि जॉगिंग ट्रॅकचे काम पूर्ण झाले असून त्याजागी आता खाण्याच्या अनधिकृत गाड्या, फेरीवाले, अनधिकृत मंडप उभे राहिले असल्याचे सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी सांगितले. तर याहून कहर म्हणजे येथील गोदरेज हिलकडे जाणाऱ्या रस्त्यावर केडीएमसीच्या कचऱ्याच्या अनेक गाड्या उभ्या असून त्याठिकाणी रस्त्यावर सर्वत्र कचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचा धक्कादायक प्रकारही समेळ यांनी उघडकीस आणला आहे. ज्यामुळे इथल्या नागरिकांना नाक मुठीत धरून आणि फुटपाथ असूनही चालायला जागा नसल्याने जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागत आहे.

नागरिकांच्या करांमधून आलेल्या पैशांतून हा स्मार्ट रोड बांधण्यात येत असून केडीएमसी प्रशासन, प्रभाग अधिकारी, घनकचरा विभागाचे उपायुक्त यांना हा गलिच्छपणा दिसत नाही का ? की या सर्व अनधिकृत खाद्यपदार्थांच्या गाड्या, फेरीवाल्यांशी त्यांचे आर्थिक लागेबांधे असल्याने कारवाई केली जात नाहीये असे प्रश्नही समेळ यांनी उपस्थित केले आहेत.

तर केडीएमसी प्रशासनाने या स्मार्ट रोडवरील हा बकालपणा आणि गलिच्छपणा 7 दिवसांच्या आत दूर केला नाही तर आपण शिवसेना स्टाईल हा रस्ता बंद पाडू आणि त्याची संपूर्ण जबाबदारी केडीएमसी प्रशासनाची असेल अशा शब्दांत श्रेयस समेळ यांनी इशारा दिला आहे.

दरम्यान आधी शहर, स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी, मग रस्त्यांवरील खड्डे आणि आता स्मार्ट रोडवरील हा बकालपणा याद्वारे केडीएमसी स्वतःहून आपल्याच भोंगळ कारभाराचे धिंडवडे काढत आहे. ज्याला या शहरांतील जनता पार कंटाळून गेली आहेत. ज्यामुळे केडीएमसी प्रशासनाच्या या नाकर्तेपणाचे खापर आणि परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Smartroad or dumping ground get rid of the smart road congestion in 7 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2024 | 04:07 PM

Topics:  

  • kalyan
  • kalyan news update

संबंधित बातम्या

Kalyan News: मुलांसाठी खाऊ आणायला गेली अन् उघड्या वीजवाहिनीने घेतला जीव; पतीचा पोलिसांवरही गंभीर आरोप
1

Kalyan News: मुलांसाठी खाऊ आणायला गेली अन् उघड्या वीजवाहिनीने घेतला जीव; पतीचा पोलिसांवरही गंभीर आरोप

Kalyan Kinnar Mahotsav 2026 : समानता आणि समावेशकतेचा संदेश; कल्याणमध्ये ‘किन्नर महोत्सव 2026’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
2

Kalyan Kinnar Mahotsav 2026 : समानता आणि समावेशकतेचा संदेश; कल्याणमध्ये ‘किन्नर महोत्सव 2026’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

१५ वर्षीय मुलगी आणि ७ वर्षीय चिमुरडीवरील अत्याचाराने हादरले कल्याण; महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र पोलीस चौकीची मागणी
3

१५ वर्षीय मुलगी आणि ७ वर्षीय चिमुरडीवरील अत्याचाराने हादरले कल्याण; महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र पोलीस चौकीची मागणी

निर्लज्जतेचा कळस! ढाब्यावर भरपेट जेवली महिला अन् सीटच्या बाजूलाच केली लघुशंका, कर्मचारी संतापले; Video Viral
4

निर्लज्जतेचा कळस! ढाब्यावर भरपेट जेवली महिला अन् सीटच्या बाजूलाच केली लघुशंका, कर्मचारी संतापले; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.