Smt Kantaben Shantilal Gandhi School Kalyan restrict hindu students from wearing Tila
कल्याण : शाळांमधील गणशवेषावरुन अनेकदा वाद निर्माण होताना दिसत असतात. शाळांमध्ये धार्मिक बाब सांगणारे पेहराव करणे यावरुन वादंग निर्माण झाला आहे. याचबाबत कल्याणमधील शाळा वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकली आहे. कल्याणमधील श्रीमती कांताबेन शांतीलाल गांधी या शाळेने धार्मिक सहिष्णुता जपण्याच्या नावाखाली हिंदू विद्यार्थ्यांना टिळा किंवा टिकली लावण्यास प्रतिबंध लावला. यावरुन ही गांधी शाळा हिंदूच्या धार्मिक आस्था दुखावत असल्याचे समोर आले आहे.
कल्याणमधील श्रीमती कांताबेन शांतीलाल गांधी या शाळेने विद्यार्थ्यांनी टिळा,टिकली लावल्यास बंदी घातली आहे. त्याचबरोबर हातात धागा, बांगडी घातल्यास त्यांना शिक्षा देण्यास येईल असा अजब फतवा या शाळेने काढला. शाळेच्या नियमाविरोधात पालकांनी रोष व्यक्त केला असून नाराजी व्यक्त केली आहे. पालकांनी शाळेच्या या नियमांविरोधात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे तक्रार देखील दाखल केली. कल्याणमधील शाळेचा हिंदू विद्यार्थ्यांसाठी असलेल्या हा नियमांविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. यासाठी त्यांनी व्यवस्थापनासह मुख्यध्यापकांना धारेवर धरले. शाळेमधील परिस्थिती अनियंत्रित झाल्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील शाळेमध्ये दाखल करण्यात आला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शाळेमध्ये हिंदू विद्यार्थ्यांबाबत असा फतवा काढळ्यामुळे कल्याणमधील श्रीमती कांताबेन शांतीलाल गांधी या शाळेविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाने शाळेमध्ये जात व्यवस्थापनेला याबाबत जाब विचारला. यानंतर घाबरुन गेलेल्या व्यवस्थापनाने प्रकरणावर पांघरुन घालण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीचे कोणतेही नियम घातले नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न देखील शाळेकडून करण्यात आला. मात्र अखेर त्यांनी अशा प्रकारचे नियम काढले होते मात्र ते विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काढले असल्याचे कबुल केले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शाळेत धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी फक्त सूचना दिल्या असल्याचे शाळेने सांगितले. कडा व बांगडीने इजा होऊ नये यासाठी आम्ही ते बंद केलेले आहे त्याचबरोबर टिळा धागे यामुळे शाळेत धार्मिक वाद होत असल्याने त्यादेखील काढाव्या अशा सूचना पालकांना दिल्याचे शाळेचे म्हणणे आहे. शाळेचे सिक्रेटरी मनोहर पालन, स्वप्नाली रानडे रानडे शाळा डायरेक्ट आणि मुख्याध्यापक संजय पाटील यांनी त्यांची बाजू मांडली. दरम्यान हा प्रकार समजताच उद्धव ठाकरे गटाने शाळेत धाव घेत व्यवस्थापनाला जाब विचारला. शाळा प्रशासनाचे संचालक मुख्याध्यापक आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत ठाकरे गटा आक्रमक झाला. आम्ही इतर धर्माला सांगतो का टिळा किंवा टिकली लावा. त्यांच्यासाठी आमच्या धर्मावर बंदी का? असा थेट सवाल त्यांनी विचारला. आम्ही सर्व धर्माचा आदर करतो असे म्हणत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला.