ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतीच्या बांधावर (फोटो सौजन्य-X)
कर्जत : कर्जत तालुक्यात वादळी वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने भाताचे एक शेतात कोसळले आहे. शेतकऱ्यांच्या अगणित नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी सात्यत्याने होत होती आणि त्यानंतर रायगड जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने कर्जत तहसीलदार यांच्याकडून तालुक्यातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान अगदीच दुसऱ्याच दिवशी कृषी विभाग,महसूल विभाग आणि ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी शेताच्या बांधावर पोहचले असून प्रत्यक्ष २०८ महसुली गावामध्ये आणि आदिवासी वाड्यांमध्ये जाऊन पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे.
कर्जत तालुक्यात यावर्षी साधारण सात हजार हेटकरी जमिनीवर भाताची शेती खरीप हंगामात करण्यात आली आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यात दिलेल्या अंदाजाप्रमाणे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि भाताचे पीक जमिनीवर कोसळले. भाताच्या शेतीचे झालेले नुकसान आणि सुरु असलेला पाऊस लक्षात घेऊन भाताचे पीक आणखी एक दोन आठवडे पाण्यात राहण्याची भीती आहे. हे लक्षात घेऊन किसान क्रांती संघटना या संघटना आणि आरपीआय, भाजप या पक्षांनी शेतीचे पंचनामे करण्याची मागणी केली होती. त्यानंतर रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडून आदेश आल्यानंतर कर्जत तहसीलदर यांच्याकडून कृषी विभाग, महसूल विभाग आणि ग्रामपंचायत वोवीभाग यांची बैठक घेऊन पाणचनामे करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यावेळी तालुका पंचायत समितीचे गटविकासअधिकारी सुशांत पाटील,तालुका कृषी अधिकारी राजाराम शिंदे आणि निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत यांच्या उपस्थितीत भाताच्या शेतीच्या नुकसान बद्दल पंचनामे करण्याचं आराखडा त्यायर करण्यात आला होता.
त्यानुसार कर्जत तालुक्यातील सर्व २०८ गावातील भाताच्या शेतीचजि पाहणी तसेच आदिवासी वाड्यांमधील भाताची तसेच नाचणी वरी यांच्या शेतीच्या पिकाची पाहणी करून घटनास्थळी जाऊन पंचनामे देण्याचे आदेश २९ सप्टेंबर रोजी देण्यात आले. त्यानुसार आज सकाळ पासून कृषी अधिकारी, कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी, महसूल मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, तसेच कृषी विस्तर अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून शेत जमिनीचे पंचनामे करण्याचे काम सुरु झाले आहे.