Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“…म्हणून मलाही मुंबईत घर नाकारलं होतं”; पंकजा मुंडेंनी व्हीडिओ शेअर करत सांगितला अनुभव, कोणत्या कारणासाठी…

यावरुन आता वातावरण तापले असताना, यावर विविध प्रतिक्रिया येत असताना, आता आपणाला देखील मुंबईत फक्त मराठी आहे म्हणून घर नाकारल्याचं पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी धक्कादायक अनुभव व्हीडिओच्या माध्यमातून शेअर केला आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Sep 29, 2023 | 12:11 PM
“…म्हणून मलाही मुंबईत घर नाकारलं होतं”; पंकजा मुंडेंनी व्हीडिओ शेअर करत सांगितला अनुभव, कोणत्या कारणासाठी…
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – मुलुंडमध्ये मराठी माणसाला एका गुजराती सोसायटीत कार्यालय भाड्याने देण्यास नकार दिल्यानंतर भाषिक वाद व प्रांत वाद होण्याची शक्यता आहे. मुलुंड परिसरात मराठी भाषिकांना दुय्यम वागणूक दिल्यानंतर या प्रकरणात जाब विचारल्यावर मारहाण केल्याचाही आरोप तृप्ती देवरुखकर एकबोटे यांनी सोशल मीडियावर केला आहे. तसेच यावरुन आता वातावरण तापले असताना, यावर विविध प्रतिक्रिया येत असताना, आता आपणाला देखील मुंबईत फक्त मराठी आहे म्हणून घर नाकारल्याचं पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी धक्कादायक अनुभव व्हीडिओच्या माध्यमातून शेअर केला आहे.

केवळ मराठी म्हणून …

दरम्यान, सध्या मुलुंडमधील संतापजनक प्रकारवर संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना, माजी मंत्री व भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडेंनी देखील आपणालाही असाच अनुभव आल्याचं सांगितलं आहे. जेव्हा माझं सरकारी घर सोडून मला घर घ्यायचं होतं, तेव्हा हा अनुभव मलाही बऱ्याच ठिकाणी आला की मराठी माणसांना घर देत नाहीत. मी कधीही जातीवाद, धर्मवाद आणि भाषावाद याच्यावर टिप्पणी केली नाही. पण एक मुलगी जेव्हा एक रडून सांगत होती की, इथे मराठी माणसाला घर देत नाही किंवा मराठी माणूस येथे अलाउड नाही हे म्हणत, असताना तिच्यावर प्रकार झाला तो प्रकार मला अस्वस्थ करणार आहे, असं व्हीडिओमध्ये पंकजांनी म्हटलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

मुलुंड पश्चिम परिसरातल्या शिवसदन इमारतीमध्ये आपण भाड्यानं कार्यालयासाठी जागा पाहण्यास गेलेली असताना मालकानं आम्ही महाराष्ट्रीयन माणसाला कार्यालय देणार नाही असं सांगून धक्काबुक्की केल्याचा आरोप तृप्ती देवरुखकर एकबोटे यांनी केला आहे. तृप्ती देवरूखकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओनंतर चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे. तसेच विविध राजकीय पक्षातून संताप व्यक्त केला जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुलुंडमधील मनसेच्या कार्यकर्त्यांनी सदर व्यक्तीला जाब विचारला. यानंतर आज यावरुन राऊतांनी सरकारवर टीका केली आहे.

हा एवढा माज कोठून आला – संजय राऊत

दरम्यान, या प्रकारानंतर संजय राऊत यांनी ट्विट करत टीका केली आहे. “हा एवढा माज कोठून आला? मुलुंड मध्ये मराठी  जागा नाकारण्या पुरता हा विषय नाही.आणखी बरेच काही आहे.हा माज कोठून आला. याचे उत्तर एकनाथ शिंदे व त्यांच्या मींधे महा मंडळाने द्यायला हवे.भाजपने शिवसेना फोडली ती या मंडळींचा माज वाढवण्यासाठी.मराठी माणूस मिंधा करण्याचा हा डावउधळला जाईल. जे म्हणतात आमचीच शिवसेना खरी ते उघडे पडले.तृप्ती देवरुखकर यांचे अश्रू वाया जाणार नाहीत. जय महाराष्ट्र!” असं ट्विटमध्ये राऊतांनी म्हटलं आहे.

Web Title: So i too was denied a house in mumbai pankaja munde shared the video and shared the experience for what reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2023 | 12:11 PM

Topics:  

  • Mumbai
  • Navrashtra

संबंधित बातम्या

जोधपूरकडे निघालेलं एअर इंडियाचं विमानाच अचानक मुंबई विमानतळावर लॅडिंग; नेमकं काय घडलं?
1

जोधपूरकडे निघालेलं एअर इंडियाचं विमानाच अचानक मुंबई विमानतळावर लॅडिंग; नेमकं काय घडलं?

St Bus : गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांचा एसटीला उदंड प्रतिसाद; ५१०३ बस फुल्ल
2

St Bus : गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांचा एसटीला उदंड प्रतिसाद; ५१०३ बस फुल्ल

महाराष्ट्राची १.५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल,  MH 1st Conclave 2025 बनणार संवादाचे व्यासपीठ
3

महाराष्ट्राची १.५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल, MH 1st Conclave 2025 बनणार संवादाचे व्यासपीठ

Devendra Fadnavis : कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे, देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
4

Devendra Fadnavis : कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे, देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.