Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘प्रशासनात AI चा वापर करणारा सोलापूर जिल्हा देशात प्रथम’; जिल्हाधिकाऱ्यांचे विधान

प्राथमिक स्तरावर पुरवठा विभाग, शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास व पशुसंवर्धन या पाच विभागाचा समावेश करण्यात आला आहे. या पाच विभागाच्या अनुषंगाने कॉलिंग सेंटरमार्फत दररोज 15 ते 20 हजार नागरिकांना मोबाईलवर फोन केले जात आहे

  • By कृपादान आवळे
Updated On: May 03, 2025 | 10:48 AM
'प्रशासनात AI चा वापर करणारा सोलापूर जिल्हा देशात प्रथम'; जिल्हाधिकाऱ्यांचे विधान

'प्रशासनात AI चा वापर करणारा सोलापूर जिल्हा देशात प्रथम'; जिल्हाधिकाऱ्यांचे विधान

Follow Us
Follow Us:

सोलापूर : उडान 2025 अंतर्गत प्रशासकीय कामात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता(AI) कॉलिंग सेंटरद्वारे जिल्ह्यातील नागरिकांना फोन करून त्यांच्याकडून शासकीय योजनांच्या अनुषंगाने प्रश्न विचारून त्यांच्या विभागाकडे तक्रारी असतील तर त्याच्या डॅशबोर्डवर नोंदी घेतल्या जात आहेत. त्या नोंदीच्या आधारे संबंधित तालुकाप्रमुख व विभाग प्रमुख त्यांच्या तक्रारीचे निवारण आठ दिवसात करतील.

यातून संबंधित लाभार्थ्यांना शासकीय योजना व प्रशासकीय कामकाजचा लाभ गतिमान पद्धतीने मिळण्यास मदत होणार आहे. तरी सर्व संबंधित विभाग प्रमुख व तालुकाप्रमुख यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित उड्डाण 2025 अंतर्गत प्रशासनात AI वापर उद्घाटन तसेच प्रशिक्षण कार्यक्रम उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, प्राथमिक स्तरावर पुरवठा विभाग, शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास व पशुसंवर्धन या पाच विभागाचा समावेश करण्यात आला आहे. या पाच विभागाच्या अनुषंगाने कॉलिंग सेंटरमार्फत दररोज 15 ते 20 हजार नागरिकांना मोबाईलवर फोन केले जात असून, त्यातील सहा ते सात हजार कॉलवर नागरिक विचारलेला प्रश्नाचे उत्तरे देऊन संबंधित विभागाशी आपले मत मांडत आहे. त्यानुसार, डॅशबोर्डवर माहिती तयार होत असून कोणत्या विभागाशी जास्त तक्रारी आहेत.

तसेच कोणत्या ठिकाणी काय करणे आवश्यक आहे याची माहिती प्रशासनाला उपलब्ध होत असून त्यावर पुढील उपाययोजना करून शासकीय योजनांचा लाभ तसेच प्रशासकीय कामकाज अत्यंत गतिमान व सुलभ पद्धतीने करण्यासाठी याचा वापर करण्यास सुरुवात झालेली आहे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Solapur district is the first in the country to use ai in administration says district collector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 10:48 AM

Topics:  

  • district administration
  • Solapur News

संबंधित बातम्या

Solapur News :सोलापुरात मोठा उद्योग आणणार; तरुणांचे स्थलांतर थांबविण्याचे उदय सामंत यांचे आश्वासन
1

Solapur News :सोलापुरात मोठा उद्योग आणणार; तरुणांचे स्थलांतर थांबविण्याचे उदय सामंत यांचे आश्वासन

Solapur News :१६० हरकतींवर मंगळवारी सुनावणी; तीन तालुक्यांतील संस्थांवर प्रशासनाची नजर
2

Solapur News :१६० हरकतींवर मंगळवारी सुनावणी; तीन तालुक्यांतील संस्थांवर प्रशासनाची नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.