Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोहोळ तालुक्याचा समावेश अपर जिल्हाधिकारी कार्यालय पंढरपूरऐवजी सोलापूरमध्ये करावा; आमदार राजू खरे यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी

मोहोळ तालुक्याचा समावेश नव्या पंढरपूर अपर जिल्हाधिकारी कार्यालयात करण्याच्या प्रस्तावाला आमदार राजू खरे यांनी विरोध दर्शवला आहे. भौगोलिक आणि दळणवळणाच्या दृष्टीने सोलापूर हे अधिक सोयीचे असल्याने प्रशासनाने प्रस्तावात बदल करावा, अशी त्यांनी मागणी केली.

  • By विवेक
Updated On: Jul 02, 2026 | 09:23 PM
मोहोळ तालुक्याचा समावेश अपर जिल्हाधिकारी कार्यालय पंढरपूरऐवजी सोलापूरमध्ये करावा; आमदार राजू खरे यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी

मोहोळ तालुक्याचा समावेश अपर जिल्हाधिकारी कार्यालय पंढरपूरऐवजी सोलापूरमध्ये करावा; आमदार राजू खरे यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी

Follow Us
Follow Us:

मोहोळ, दादासाहेब गायकवाड : शासनाकडून नव्याने निर्मिती करण्यात येत असलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, पंढरपूर अंतर्गत मोहोळ तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, भौगोलिक आणि दळणवळणाच्या दृष्टीने मोहोळ तालुक्यातील जनतेसाठी पंढरपूरपेक्षा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय हे अधिक जवळचे आणि सोयीस्कर आहे. त्यामुळे मोहोळ तालुक्याचा समावेश पंढरपूर ऐवजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या थेट कार्यक्षेत्रात कायम ठेवावा, अशी मागणी मोहोळ विधानसभा मतदार संघाचे आमदार राजू खरे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आमदार राजू खरे यांनी महसूल मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. २३ जून २०२६ रोजीच्या प्रस्तावानुसार, सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांची पुनर्रचना सुचवण्यात आली आहे. यामध्ये नव्याने प्रस्तावित असलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, पंढरपूरच्या कार्यक्षेत्रात पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला, मंगळवेढा या तालुक्यांसह मोहोळ तालुक्याचाही समावेश करण्यात आला आहे.

​परंतु, प्रत्यक्षात मोहोळ तालुक्यातील नागरिकांसाठी पंढरपूर हे ठिकाण लांबचे असून दळणवळणासाठी अत्यंत त्रासाचे ठरणार आहे. याउलट सोलापूर शहर आणि जिल्हाधिकारी कार्यालय हे मोहोळच्या जनतेसाठी सर्व सोयी-सुविधांनी युक्त आणि जवळचे आहे. त्यामुळे जनतेचा होणारा मनस्ताप आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी प्रशासनाने या रचनेत बदल करणे गरजेचे आहे.

दिव्यांगांचा संताप अनावर! जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत लोटांगण; पोलिसांशी शाब्दिक चकमक

या पार्श्वभूमीवर, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडेही यासंबंधी योग्य ती कार्यवाही करण्याबाबत स्पष्ट केले आहे.

मोहोळ तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र १,४०८.४० चौ.किमी. असून २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,७६,९२० इतकी आहे. ही मोठी लोकसंख्या लक्षात घेता, प्रशासकीय सुलभतेसाठी मोहोळचा समावेश उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी आणि अक्कलकोट या तालुक्यांप्रमाणेच सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्यात यावा, अशी आग्रही मागणी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून केली जात आहे.

भोर नगरपरिषदेची सभा वादळी, नगरसेविकांच्या आरोपानंतर नगराध्यक्षांचा लेखी माफीनामा; नेमकं काय घडलं?

Web Title: Mla raju khare demands mohol taluka include solapur not pandharpur additional collector office

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 09:23 PM

Topics:  

  • Mohol News
  • pandharpur
  • Pandharpur News
  • Solapur
  • Solapur News

संबंधित बातम्या

Karmala News: करमाळ्यात दुर्दैवी घटना! विहिरीत पडून माय-लेकराचा अंत; गावावर शोककळा
1

Karmala News: करमाळ्यात दुर्दैवी घटना! विहिरीत पडून माय-लेकराचा अंत; गावावर शोककळा

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana: बारामती परिमंडळातील २ लाख शेतकऱ्यांना आता दिवसा मिळणार वीज
2

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana: बारामती परिमंडळातील २ लाख शेतकऱ्यांना आता दिवसा मिळणार वीज

Solapur News: घरकुलांना मुहूर्त कधी? पहिला हप्ता मिळूनही १५ महिन्यांपासून बांधकामे रखडली
3

Solapur News: घरकुलांना मुहूर्त कधी? पहिला हप्ता मिळूनही १५ महिन्यांपासून बांधकामे रखडली

आषाढी वारी संपताच अतिक्रमणांचे कमबॅक! पंढरपूर नगरपालिकेचा नुसताच दिखावा; फेरीवाल्यांनी पुन्हा रस्ते व्यापले
4

आषाढी वारी संपताच अतिक्रमणांचे कमबॅक! पंढरपूर नगरपालिकेचा नुसताच दिखावा; फेरीवाल्यांनी पुन्हा रस्ते व्यापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.