Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News: सोलापूर बाजार समितीपदी  काँग्रेसचे दिलीप माने यांची निवड

सभापती निवड झाल्यानंतर दिलीप माने म्हणाले, सचिन कल्याणशेट्टी यांनी हे पॅनेल उभा करुन निवडून आणलं. माझी निवड करण्यासाठी सर्वांना विश्वासात घेतलं

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 11, 2025 | 05:03 PM
Solapur News: सोलापूर बाजार समितीपदी  काँग्रेसचे दिलीप माने यांची निवड
Follow Us
Close
Follow Us:
सोलापूर: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने  यांची निवड करण्यात आली आहे. तर उपसभापती पदी भाजप नेते सुनील कळके यांची निवड झाली आहे. सभापती आणि उपसभापती दोन्ही पदासाठी एक-एक अर्ज आल्याने दोन्ही निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली आहे.
दोन वर्षांसाठी दिलीप माने यांच्याकडे राहणार सभापतीपद 
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी विरुद्ध आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनलमध्ये थेट लढाई झाली होती. या लढतीत आमदार सचिन कल्याणशेट्टी गटाचा एकतर्फी विजय झाला होता. त्यानंतर बाजार समितीच्या सभापतीपदी कोणाची निवड होणार याचीच चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु होती. आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत माजी आमदार दिलीप माने यांची सभापती पदी आणि भाजप नेते सुनील कळके यांची उपसभापती पदी निवड जाहीर करण्यात आली. सभापती आणि उपसभापतींची निवड होताच भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी दिलीप माने आणि सुनील कळके समर्थकांनी मोठा जल्लोष केला.
दिलीप मानेंकडून देवेंद्र फडणवीस यांच्यासह कल्याणशेट्टींचे आभार
सभापती निवड झाल्यानंतर दिलीप माने म्हणाले, सचिन कल्याणशेट्टी यांनी हे पॅनेल उभा करुन निवडून आणलं. माझी निवड करण्यासाठी सर्वांना विश्वासात घेतलं. सभापतीपदाचा मान मला सचिनदादांनी दिला. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. निश्चितपणे मी शेतकरी, व्यापाऱ्यांसाठी मी चांगल काम करेन. निवडणुकीच्या नियोजनचा भाग आहे, मिलीभगत नाही. मला दोन वर्षे आणि हसापुरे साहेबांना पुढचे दोन वर्षे असं ठरलेलं आहे. सचिनदादांनी सांगितलं त्याप्रमाणे आमचं नियोजन ठरलेलं आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला होता. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या श्री. सिद्धेश्वर विकास पॅनलने 18 पैकी 15 जागांवर विजय मिळवला होता. तर भाजप आमदार माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना पुन्हा एकदा पराभवाचा झटका बसलेला पाहायला मिळाला होता. 18 पैकी केवळ 3 जागांवर सुभाष देशमुख यांच्या श्री. सिद्धेश्वर परिवर्तन पॅनलचा विजय झाला होता. निर्णायक असलेल्या विविध कार्यकारी सोसायटी गटातील 11 पैकी 11 जागांवर कल्याणशेट्टी पॅनलचे एकहाती वर्चस्व मिळालं होतं. तर ग्रामपंचायतीतील 4 पैकी 3 जागांवर सुभाष देशमुखांच्या पॅनलने वर्चस्व सिद्ध केले होते.

Web Title: Solapur news congress dilip mane elected as solapur market committee member

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 05:03 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • devendra fadnavis

संबंधित बातम्या

“समाजाच्या सर्व घटकांपर्यंत सेवा, संवेदना आणि विकास पोहोचविण्याचा भाजपाचा प्रामाणिक संकल्प”,नरेंद्र पवारांचे आवाहन
1

“समाजाच्या सर्व घटकांपर्यंत सेवा, संवेदना आणि विकास पोहोचविण्याचा भाजपाचा प्रामाणिक संकल्प”,नरेंद्र पवारांचे आवाहन

Rahul Gandhi Yellow Book Protocol: राहुल गांधींंवर गुन्हा दाखल होणार? यलोबुक प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा आरोप
2

Rahul Gandhi Yellow Book Protocol: राहुल गांधींंवर गुन्हा दाखल होणार? यलोबुक प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा आरोप

‘आता लाजच कोळून प्यायली’, PM मोदींच्या आईच्या AI Video वरून राजकारण तापणार; भाजपने काँग्रेसवर थेट…
3

‘आता लाजच कोळून प्यायली’, PM मोदींच्या आईच्या AI Video वरून राजकारण तापणार; भाजपने काँग्रेसवर थेट…

उद्योग आणि गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य,पोषक इको सिस्टिम राज्यात उपलब्ध; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
4

उद्योग आणि गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य,पोषक इको सिस्टिम राज्यात उपलब्ध; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.