Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News: आजपासून दूध महाग; विक्री दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ, दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महाग

Solapur News ११ ऑगस्टपासून गाय आणि म्हशीच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ. दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीतही १० टक्क्यांपर्यंत वाढ होणार. मात्र, ग्राहकांना दूध महाग मिळणार असताना दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खरेदी दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 11, 2026 | 12:34 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Solapur News: पंढरपूर (वा.) डिझेलच्या वाढत्या किमती, वाहतूक खर्च आणि प्रक्रिया खर्चाचा वाढलेला भार लक्षात घेता राज्यातील सहकारी आणि खासगी डेअऱ्यांची शिखर संस्था असलेल्या दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने गाय आणि म्हशीच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ मंगळवार, ११ ऑगस्टपासून लागू होणार आहे. यासोबतच दुग्धजन्य उपपदार्थांच्या किंमतीतही १० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे.

मात्र, ग्राहकांना दूध महाग मिळणार असताना दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खरेदी दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. दूध संघांच्या हिताचा विचार झाला; मात्र दूध देणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष झाल्याची प्रतिक्रिया जिल्ह्यातील दूध उत्पादकांकडून व्यक्त होत आहे.

  • दरवाढीचा दुहेरी परिणाम
    गाय आणि म्हशीच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ
  • ११ ऑगस्टपासून नवीन दर लागू
  • दुग्धजन्य उपपदार्थांच्या दरात १० टक्क्यांपर्यंत वाढ
  • डिझेल आणि वाहतूक खर्च वाढल्याने दरवाढ
  • प्रक्रिया खर्चाचा वाढलेला भार
  • दूध खरेदी दर ‘जैसे थे’ असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी
  • चारा आणि पशुखाद्याच्या वाढत्या किमतींमुळे पशुपालक अडचणीत
सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध करणे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान बनले आहे. पशुखाद्य, कडबा, मका, सरकी पेंड, मिनरल मिक्स यासह इतर खाद्य घटकांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. उपलब्ध चाऱ्याचे दरही वाढल्याने तो विकत घेणे शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या अडचणीचे ठरत आहे.

Milk Price Hike: दूध दरवाढीचा सर्वसामान्यांच्या खिशाला फटका; गाई …

दूध उत्पादनासाठी लागणारा खर्च दिवसेंदिवस वाढत असताना ग्राहकांकडून मात्र दूध विक्री दर वाढवून अधिक पैसे घेतले जात आहेत. या दरवाढीचा लाभ दूध उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. दूध उत्पादन हा आता नफ्याचा नव्हे, तर तोट्याचा व्यवसाय बनत चालला असल्याची संतप्त प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

दूध खरेदी दर वाढविण्याची शेतकऱ्यांची मागणी

दुग्धविकास मंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करून दूध खरेदी दरात वाढ जाहीर करावी, अशी मागणी दूध उत्पादकांनी केली आहे. पशुखाद्याच्या वाढत्या किमती, चाऱ्याची टंचाई, औषधोपचार आणि मजुरीचा वाढलेला खर्च लक्षात घेता दूध उत्पादकांना प्रतिलिटर अधिक दर देणे आवश्यक असल्याचे मत दुग्ध व्यवसायाशी संबंधित शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

“ग्राहकांकडून वाढीव दर, मग शेतकऱ्यांना वाढ कधी?” असा सवाल आता दूध उत्पादकांकडून उपस्थित केला जात आहे.

A1 And A2 Milk : तुम्ही कोणतं दुध पिता A1 की A2 ? हा प्रकार नेमका आहे …

दूध भेसळीविरोधातील कारवाई कडक करण्याची मागणी

दूध भेसळीचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र असले तरी भेसळ करणाऱ्यांविरोधातील कारवाई आणखी कठोर करण्याची मागणी दूध उत्पादकांकडून होत आहे. भेसळखोरांविरोधात धडक मोहीम अधिक तीव्र केल्यास शुद्ध दूध उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य दर मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा दूध उत्पादकांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Solapur news milk prices hiked from today price increased by 2 per litre

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 12:34 PM

Topics:  

  • Milk Price Hike
  • Solapur
  • Solapur News

संबंधित बातम्या

Accident News: तीन महिन्यांपूर्वी बोहल्यावर चढला, पण संसार थाटण्याआधीच काळाने हिरावलं
1

Accident News: तीन महिन्यांपूर्वी बोहल्यावर चढला, पण संसार थाटण्याआधीच काळाने हिरावलं

Milk Price Hike: सामन्यांनी जगायचं कसं? 10 रुपये वाढ करण्याची मागणी, ‘या’ राज्यात युनियनचा आग्रह
2

Milk Price Hike: सामन्यांनी जगायचं कसं? 10 रुपये वाढ करण्याची मागणी, ‘या’ राज्यात युनियनचा आग्रह

Solapur News : मुख्यमंत्र्यांच्या आधी अधिकारी बांधावर! करंब्यात करपलेल्या पिकांची पाहणी; मदतीच्या घोषणेची प्रतीक्षा
3

Solapur News : मुख्यमंत्र्यांच्या आधी अधिकारी बांधावर! करंब्यात करपलेल्या पिकांची पाहणी; मदतीच्या घोषणेची प्रतीक्षा

Ganesh Festival : बाप्पाच्या उत्सवातून माणुसकीची सेवा! १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी, रक्तदानाचा संदेश
4

Ganesh Festival : बाप्पाच्या उत्सवातून माणुसकीची सेवा! १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी, रक्तदानाचा संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.