Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोलापूर ते मुंबई विमानसेवेच्या शुभारंभाने जिल्ह्याच्या विकासाला नवे पंख! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्गघाटन

सोलापूर ते मुंबई विमानसेवेच्या शुभारंभाने जिल्ह्याच्या विकासाला नवे पंख मिळाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या या ऐतिहासिक उपक्रमामुळे सोलापूरचा प्रगतीचा वेग आणखी वाढणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 15, 2025 | 09:17 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

राज्याच्या विकास प्रवासात एक नवा अध्याय सुरू करत सोलापूर ते मुंबई या थेट विमानसेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आला. सोलापूर विमानतळावर झालेल्या या भव्य सोहळ्यात स्टार एअरलाईन्सच्या विमानाला मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवून या नव्या सेवेची सुरुवात केली. यावेळी सोलापूर ते मुंबई या पहिल्या उड्डाणातील प्रवासी बसव गायकवाड यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बोर्डिंग पास देण्यात आला. सोलापूरकरांसाठी ही एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद घटना ठरली असून, या सेवेच्या प्रारंभामुळे सोलापूर जिल्ह्याला राज्याची राजधानी मुंबईशी थेट हवाई संपर्क मिळाला आहे. या सेवेमुळे व्यापार, उद्योग, शिक्षण, तसेच पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्राच्या रिअल इस्टेटमध्ये नव्या युगाची सुरुवात! मुंबई लवकरच भारताची ‘वॉटरफ्रंट राजधानी’ बनण्याच्या मार्गावर

कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, कुर्डुवाडी, पांगरी, वैराग आणि मोहोळ या ठिकाणी नव्याने उभारण्यात आलेल्या पोलीस स्थानकांच्या इमारतींचे ऑनलाईन उद्घाटनही केले. या नवीन इमारतींमुळे स्थानिक नागरिकांना अधिक चांगली सुरक्षा व्यवस्था मिळेल, तसेच पोलीस दलाला अधिक कार्यक्षमतेने काम करण्यास मदत होईल, असे त्यांनी यावेळी नमूद केले. याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यातील विविध विकासकामांचीही माहिती घेतली आणि अधिक गतीने प्रगती होण्यासाठी आवश्यक निर्देशही दिले.

सोलापूर विमानतळ प्राधिकरणाच्या सहव्यवस्थापक अंजनी शर्मा यांनी या कार्यक्रमात स्वागत आणि प्रास्ताविक करताना सांगितले की, जून २०२५ मध्ये सुरू झालेली सोलापूर-गोवा विमानसेवा यशस्वीपणे सुरू असून प्रवाशांकडून अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. या यशानंतर सोलापूर-मुंबई हवाई सेवा ही नवी दिशा ठरेल, असा त्यांचा विश्वास आहे. सोलापूरकरांना आता काही तासांत मुंबईला पोहोचण्याची सोय उपलब्ध झाली आहे, ज्यामुळे व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांसाठीही ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.

या कार्यक्रमात सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या “लाडक्या बहिणींसाठी दिवाळी किट” या विशेष सामाजिक उपक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला. या योजनेअंतर्गत अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागातील महिलांना मोफत अन्नधान्य व दिवाळी किट देण्यात येणार आहे. सणासुदीच्या काळात अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत असतात, अशावेळी अशा उपक्रमामुळे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास परत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील महिलांना सणाचा आनंद परवडेल अशा स्वरूपात मदत करणे हा आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सोलापूरसारख्या प्रगतीशील जिल्ह्याला मुंबईशी जोडणारी ही विमानसेवा हा विकासाच्या नव्या पर्वाचा प्रारंभ आहे. “हवाई सेवा म्हणजे केवळ प्रवासाची सोय नसून, ती आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक विकासाला चालना देणारी कडी आहे,” असे त्यांनी नमूद केले. या सेवेमुळे सोलापूरचा संपर्क केवळ मुंबईपुरता मर्यादित राहणार नाही, तर पुढे देश-विदेशातील शहरांशी जोडणी सुलभ होईल. त्यांनी सांगितले की, राज्य शासन ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांपर्यंत सर्व सुविधा पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे आणि सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलली जात आहेत.

पूरग्रस्तांच्या मदतीला धावले ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी’; समितीकडून CM Relief Fund ला 1 कोटींची मदत

यावेळी मुख्यमंत्र्यांनी सोलापूर विमानतळाच्या विस्तार आणि आधुनिकीकरणासाठीही आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, पुढील काळात सोलापूर विमानतळावरून इतर महत्त्वाच्या शहरांकडे देखील हवाई सेवा सुरू करण्याचा विचार सुरू आहे. सोलापूर जिल्ह्याच्या प्रगतीसाठी पायाभूत सुविधा, उद्योग, शेती आणि शिक्षण या क्षेत्रातही अधिक प्रकल्प राबवले जातील, असेही त्यांनी नमूद केले.

Web Title: Solapur to mumbai airoplane started

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2025 | 09:17 PM

Topics:  

  • Solapur

संबंधित बातम्या

Solapur Crime: सोलापूरात भोंदू बाबाचा कारनामा! जमिनीतून गुप्तधन काढून देतो म्हणत 1 कोटी 87 लाखांची फसवणूक
1

Solapur Crime: सोलापूरात भोंदू बाबाचा कारनामा! जमिनीतून गुप्तधन काढून देतो म्हणत 1 कोटी 87 लाखांची फसवणूक

Solapur Crime: लहान मुलाच्या गळ्याला चाकू लावून टाकला दरोडा, मारहाण करत सोने आणि पैसे लुटले, सोलापुरात दहशतीचे वातावरण
2

Solapur Crime: लहान मुलाच्या गळ्याला चाकू लावून टाकला दरोडा, मारहाण करत सोने आणि पैसे लुटले, सोलापुरात दहशतीचे वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.