मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटींचा निधी (फोटो- ट्विटर)
या आवाहनास प्रतिसाद देत तसेच सामाजिक उत्तरदायित्व व मानवतावादी भूमिकेतून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने शासनाची मंजुरी घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीस एक कोटी रुपयाच्या मदतीचा धनादेश दिनांक 14 ऑक्टोबर रोजी मंत्रालय येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जमा केल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूर मंदिर निधीच्या वतीने पंढरपूर देवस्थान समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹1,00,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!… pic.twitter.com/PI2ICxhA6O — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 14, 2025
यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अभिजीत पाटील, मंदिर समितीच्या सदस्य शकुंतलाताई नडगिरे, संभाजी शिंदे, ॲड माधवीताई निगडे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, अतुल शास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व विभाग प्रमुख राजेंद्र सुभेदार उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पावसाने कहर केला. बळीराजाचा हातातोंडाशी आलेला हात पावसाने हिरावून घेतला. हजारो हेक्टर जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान राज्य सरकारने २२०० कोटींची तातडीची मदत जाहीर केली होती. आता महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत ही मदत जाहीर केली.
पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “बुजलेल्या विहींरींसाठी ३० हजार रुपये दिले जाणार आहे. शेतकऱ्यांचे पिकांवर मुलाप्रमाणे प्रेम असते. शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. ४५ लाख शेतकऱ्यांचा विमा उतरवला आहे. दिवाळीआधी मदत देण्याचा प्रयत्न असणार आहे. अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.”
पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात येणार आहे. २९ जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे उभारली जाणार आहेत. बागायती शेतकऱ्यांना ३२ हजार ५०० रुपये प्रती हेक्टरी मदत केली जाणार आहे.