मुंबई लवकरच भारताची ‘वॉटरफ्रंट राजधानी’ बनण्याच्या मार्गावर
मुंबई लवकरच भारताची ‘वॉटरफ्रंट राजधानी’ बनण्याच्या मार्गावर आहे. बांद्रा–कुर्ला कॉम्प्लेक्सच्या बाजूने उभा राहणारा नवीन वॉटरफ्रंट बेल्ट शहरातील व्यस्त व्यावसायिक क्षेत्र आणि लक्झरी निवासी क्लस्टरशी जोडला जाईल. रिअल इस्टेट डेव्हलपर्सच्या संघटनेने या प्रकल्पाला ‘बांद्रा बे’ असे नाव दिले असून, अंदाजे १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रीमियम विकास क्षमता असलेले अल्ट्रा-लक्झरी प्रकल्प येथे राबविण्याची योजना आहे.
लाइटहाऊस लक्झरी आणि सीआरई मॅट्रिक्स यांनी तयार केलेल्या विश्लेषणात्मक अहवालात “बांद्रा बे: मुंबईतील सर्वात आयकॉनिक वॉटरफ्रंट गुंतवणूक का?” या मुद्द्यावर सखोल चर्चा केली आहे. अहवालानुसार, अंदाजे ८ दशलक्ष चौ.फु. प्रीमियम निवासी आणि रिटेल प्रकल्पांचा विकास येथे होणार आहे, ज्यामुळे लक्झरी जीवनशैलीला नव्याने व्याख्यायित केले जाईल.
अहवालाचे अनावरण महाराष्ट्र शासनाचे माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. कार्यक्रमाला म्हाडाचे उपाध्यक्ष व सीईओ संजीव जैस्वाल, मिलिंद बोरिकर, हिरानंदानी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी, डी एल एचचे अध्यक्ष विजय ठक्कर, एलिमेंट्स रिऍल्टीचे पार्टनर श्यामल मोदी, ईन्स्पिरा रिऍल्टीचे संचालक आयुष अग्रवाल, गुरुकृपा रियलकॉन् चे संचालक महेश पटेल आणि एक्सेल ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र वोरा उपस्थित होते. या अहवालाचे सादरीकरण लाइटहाऊस प्रॉपटेकचे फाऊंडर सुमेश मिश्रा आणि सीआरई मॅट्रिक्सचे सीईओ अभिषेक किरण गुप्ता यांनी केले.
अहवालानुसार, ‘बांद्रा बे’ १४० एकर मास्टर-प्लॅन्ड लक्झरी वॉटरफ्रंट रीडेव्हलपमेंटच्या माध्यमातून मुंबईच्या खास बे-साईड ठिकाणावर उभे राहील. दुबईच्या पाम जुमेरिया किंवा सिंगापूरच्या मरीना बेसारख्या जागतिक प्रकल्पांशी तुलना करता, बांद्रा बे गुंतवणूकदारांना लक्झरी, कनेक्टिव्हिटी आणि दीर्घकालीन मूल्य निर्मितीचा अद्वितीय अनुभव देईल.
अहवालानुसार, बांद्रा बे विकासाचे नऊ महत्त्वाचे घटक आहेत – स्ट्रॅटेजिक स्थान, पिढीजात मूल्य, आयकॉनिक सी-फेसिंग आर्किटेक्चर, एलिट एक्सक्लुसिव्हिटी, आंतरराष्ट्रीय सोयी, जागतिक मागणी, शाश्वततेवर आधारित डिझाइन, मर्यादित पुरवठा आणि उच्च किंमत प्रीमियम. बांद्रा बेच्या वॉटरफ्रंट रेसिडेन्सेससाठी साधारण १५–२०% प्रीमियम किंमत अपेक्षित आहे.
धक्कादायक! जत पालिकेच्या निवडणूक यादीत बोगस मतदार; जमदाडे गटाने केली पत्रकार परिषदेत पोलखोल
बांद्रा बे परिसरात पायाभूत सुविधा, कोस्टल रोड, सी लिंक, मेट्रो, अटल सेतु पुल, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, बुलेट ट्रेनसह अनेक मल्टी-मोडल नेटवर्क विकसित झाले आहेत. या सुविधांमुळे बांद्रा बे एक कनेक्टेड शहरी केंद्र म्हणून उभा राहणार आहे. आगामी पाच वर्षांत येथे ७ दशलक्ष चौ.फु. ग्रेड ए ऑफिसेस जोडले जातील, ज्यामुळे लक्झरी निवासीांची मागणी वाढेल आणि या परिसराचे मूल्य अधिक वाढेल.
श्री आशिष शेलार म्हणाले, “बांद्रा परिसर मुंबईच्या शहरीकरणाच्या व्याख्येला नव्याने परिभाषित करण्यास सज्ज आहे, आणि बांद्रा–कुर्ला कॅचमेंट जागतिक दर्जाच्या टाउनशिपमध्ये रुपांतरित होऊ शकते, ज्यात पायाभूत सुविधा, संस्कृती आणि नवोन्मेष यांचा समावेश असेल. मुंबई, जागतिक दर्जाची शहर म्हणून, जगातील जीवन, काम आणि मनोरंजनाचे ठिकाण बनत आहे. मुंबईची क्षमता शाश्वत नियोजनाबद्दल सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे आणि ही शहरी उत्कृष्टतेसाठी नवीन मानक स्थापित करेल.”